श्रीकेशवस्वामी - भाग ३

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद १६ वे

सद्गुरु जो हरी । गेलों त्याच्या घरी । तेणें ब्रह्म-हिरा । दाखवीला ॥१॥

अमोलिक हीरा । स्वरूपें निर्मीला । सबाह्य बहुला । तेज फांके ॥२॥

हिरा यासी कांही । पाठी-पोट नाहीं । अवघाची पाही । तेजोरूप ॥३॥

निजप्रभा-दिप्ती । फांके आत्मज्योती । तेणें हें त्रिजगतीं । ढवळली ॥४॥

बिंबेंवीण चोख । तेज अलौकीक । रत्न अमोलीक । काय सांगो ॥५॥

निजरूपे-किळा । फांकती निर्मळा । तेणें सूर्यकळा । लोपलीया ॥६॥

लोपला शशांकु । वन्ही हरपला । पूर्ण प्रकाशला । ब्रह्मपणीं ॥७॥

जयापासीं हिरा । असे अखंडीत । तोची भाग्यवंत । तिही लोकीं ॥८॥

प्रेम-मोल घेती । हिरा हाती देती । उधारा न सांगती । घड गोष्टी ॥९॥

केशव म्हणे चित्त । समर्पिलें त्यासी । तेणें तजोराशी । समर्पीलें ॥१७॥

० पद १७ वें

ब्रह्मादिकां न कळे अंत रे । श्रुतिशास्त्रें परतली जेथें रे ॥ध्रु॥

सिद्धांतांचा न चढे हात रे । बळीय तेथें रीघाले संत रे ॥१॥

बळीये नाहीं सज्जनापरतें । ज्याचें बळ सकळां वरूतें ॥

परतें जिहीं केलें रे अहंते । हृदयींच ठेवीले निरूतें ॥२॥

जेथें हेतुलक्षण न चाले । तेथें संत सर्वांगी रिघाले ॥

निज० पदीं तद्रूप जाले । ब्रह्मानंदे सर्वदा निवाले ॥३॥

ब्रह्मानंद हृदयीं भोगिती । तेणें सुखें सर्वदा डुल्लती ॥

सद्गुरुकृपें केशव निश्र्चिती । सहजीं सहज लाधली हे स्थिती ॥४॥

० पद १८ वें

गुरूनें गुज सांगतां श्रवणीं । निजरूप देखीलें नयनी ॥ध्रु॥

आतां सय्ये करूं मी काय वो । दुजें मज न दिसे माय वो ॥१॥

दृश्यें भास मोडला सकळ । निजतत्त्व कोंदलें निःखळ ॥२॥

गुरुकृपें केशवीं विश्र्वासू । अंतर्बाह्य परिपूर्ण प्रकाशू ॥३॥

० पद १९ वें

आसनी, शयनी, भोजनी, गमनीं । रूप रे तुझें पाहें मी नयनीं ॥ध्रु॥

आणीक कांहीं नेणें मी केशवा । ध्यान रे तुझें लागलें माधवा ॥१॥

कर्म, धर्म राहिले सकळ । ध्यातां तूझी मूर्ती हे केवळ ॥२॥

केशव-प्रभु मानस-मोहना । आवडी तुझी लागली नयना ॥३॥

० पद २० वें

अष्टभाव मंचकु साजिरा । वरी शांतिसेज हे अवधारा ॥ध्रु॥

विज्ञान-पुष्प अरळ निर्धारा । तेथें स्वामी पहुडला सोयरा ॥

तेथें माझ्या स्वामीचें पहुडणें । जेथें नाहीं दृश्याचें देखणे ॥१॥

स्वानुभूती स्वामीची अंतुरी । अखंड प्रेमरळी याते करी ॥

क्रीडेलागीं अलक्ष वोवरी । आत्मक्रीडा होतसे अंतरीं ॥२॥

चैतन्याचे दीपक लाविती । स्वानंदाचीं भूषणें शोभती ॥

सहजाचे उपभोग भोगती । आपेआप स्वलीळा रमती ॥३॥

स्वबोधाचीं कपाटें दीधलीं । माजी प्रकृति पुरुष ते येकलीं ॥

आत्मसुख-भोगासी राबलीं । गुरुकृपें केशवें वंदिली ॥४॥

० पद २१ वें

वंदुनि गुरुरायाचीं पाउलें । समाधि-सेजेवरी मी पहुडलें ॥

तेथें एक नवल म्यां देखिलें । वाटे मज-माजी मी भेटलें ॥१॥

तेथींचे सुख सांगतां साजनी । मौन्य पडलें चौघींच्या वदनी ॥ध्रु॥

पाहतां कांही न दिसे तंव डोळा । हरपली दीप्तीसी दीपकळा ॥

कळा-कळातीत हो सोहळा । सहजीं सहज होतसे अवलीळा ॥२॥

मज मी वो भेटली आपण । हेंही तेथें राहिलें स्फुरण ॥

सद्गुरुकृपें केशवीं परिपूर्ण । तेथें कवणां भेटे वो कवण ॥३॥

० पद २२ वें

पायाळें हे साधिलें निजधन । गुरुकृपा घालुनी अंजन ॥ध्रु॥

बळी जिहीं देहासी दीघलें । तेणें वस्तु साधीलें आपण ॥१॥

जुनाट ठेवा पूर्वजीं ठेविला । महायत्न करूनी साधीला ॥२॥

गुरुकृपें केशवीं साधिलें । आत्मधन अवघेंचि लाधलें ॥३॥

० पद २३ वें

साफल्य जन्म जालें । नाम वाचेसि आलें ।

स्वरूप लक्षितांची । भवदुःख हें गेलें ॥१॥

सदगुरूनाथ देवा । तुझी फावली सेवा ।

माझाचि मजमाजी । मज लाधला ठेवा ॥ध्रु॥

देहींच देहभाव । जाला निःशेष वावो ।

स्वसुख भोगितांची । नाहीं मीपणा ठावो ॥२॥

मुळींच द्वैत नाहीं । ऐसें बिंबले पाहीं ।

केशवीं प्राप्ति झाली । पूर्ण तूझिया पायीं ॥३॥

० पद २४ वें

जो संसारसागरी तारी । जो काळाचें भय निवारी ।

जो अज्ञान संकटी तारी । जो अच्युतानंत अविकारी गे बाई ये ॥१॥

तो गुरु निजजनक माझा । देव त्याविना नाहीं दुजा ।

त्याचे चरण चुरीन वोजा । नित्य हृदयीं करीन त्याची पुजा ग बाई ये ॥ध्रु॥

जो अप्रांत चित्-दातारू । नाहिं त्याविण कांहीच थोरू गे बाई ये ॥२॥

जे साराचें सार निर्मळ । जें क्षराक्षराचें मूळ ॥

जें निष्कंप नित्य निष्कळ । जें केशवाचें गुह्य केवळ गे ॥३॥

० पद २५ वें

निजबोधाची दिवटी लावी । देव प्रत्यक्ष नयनीं दावी ॥ध्रु॥

या गुरूसी काय बा द्यावें । आम्ही उतराई काश्यानें व्हावें ॥१॥

सिद्धस्वरूप चोरलें होतें । तें उमगलें याचेनि हातें ॥२॥

स्वामी केशवाचा कृपाळू खरा । येणें भेटविलें विश्र्वंभरा ॥३॥

० पद २६ वें

भवभंजन सद्गुरूनाथ । तेणें मस्तकीं ठेविला हात ॥१॥

माझा घोत अवघा केला ॥ माहां शुन्यासी ग्रासुनि ठेला ॥ध्रु॥

स्थूल-सूक्ष्म-देह द्वय नासी । मी-तूंपण लावुनि ग्रासीं ॥२॥

म्हणे केशव आनंदराशी । आम्ही काय म्हणावें त्यासी ॥३॥

० पद २७ वें

विश्र्वभक्षक तक्षक पाहीं । त्यासि भक्षक कोण्हीच नाहीं ॥१॥

त्यासी भक्षुनि येणे माय । मज रक्षिले सांगो काय ॥ध्रु॥

पिंड ब्रह्मांड वदनीं घाली । त्याची जाळुनी रक्षा केली ॥२॥

म्हणे केशव सदगुरुराजा । माय-बाप तूं कृपाळु माझा ॥३॥

० पद २८ वें

हात माथां पडतां पाहे । देहपात होउनि जाय ॥१॥

तरी आनंद होतो माय । तें मी नवल सांगों काय ॥ध्रु॥

प्राप्तिवांचुनि आनंद होणें । ऐसें बोलतां लाजिरवाणें ॥२॥

गुरुकृपें केशवि खूण । स्वयं आनंदसागर पूर्ण ॥३॥

० पद पद २९ वें

कानिं रिघतां ज्याचें वचन । जालों त्रैलोक्याचा कान ॥१॥

त्याचा महिमा वानूं काय । तोचि बाप तोचि माय ॥ध्रु॥

जेणें अवलोकितां डोळा । जालों रवि-चंद्राचा डोळा ॥२॥

जेणें हृदयी धरितां पाहे । जालों वेदाचें हृदय ॥३॥

ज्याचा माथां पडतां हात । सकळ मजमाजी मी सकळांत ॥४॥

म्हणे केशव ज्याचे भेटी । जीव ईश्र्वर दोन्ही घोटीं ॥५॥

० पद ३० वें

माझा डोळा अवघा घेसी । तुझा डोळा सगळा देसी ॥१॥

तरि मी पाय वंदिन तुझे । पुढें नाचेन बरव्या वोजें ॥ध्रु॥

डोळा घालुनि डोळ्यामाजी । येकडोळाचि नांदवी आजी ॥२॥

डोळियासी देउनि डोळा । म्हणे केशव करि सोहळा ॥३॥

० पद ३१ वें

भवसागर तरावया । स्वसंवेद्या सद्गुरुराया ॥ध्रु॥

तुझें नाम धरिलें कंठी । तेणें तरलों उठाउठीं ॥१॥

श्रुतिसारा विश्र्वंभरिता । गुण-निर्गुण-भेदरहिता ॥२॥

म्हणे केशव सुखैकघना । आदिरूपा देव-निधाना ॥३॥

० पद ३२ वें

काना वाटे दाउनि देवो । डोळां दिसे तें केलें वावो ॥१॥

काना वाटे देउनि देणें । कान नाहिंच केलें येणें ॥ध्रु॥

कानडोळा दोन्ही उडवी । देणें घेणें अवघेंचि बुडवी ॥२॥

केशव स्वामींचे ऐसें देणें । कान नाहिंच केला येणें ॥३॥

० पद ३३ वे

गुप्त होतें ते प्रगट केलें । सेखीं गुप्त करुनी ठेविलें ॥१॥

माझा गुप्त लिंग तो गुरू । प्राणसखा गुप्तेश्र्वरू ॥ध्रु॥

गुप्त प्रगट म्हणतां नये । ऐसें गुप्तचि केलें पाहे ॥२॥

केशवस्वामी अखंड गुप्त । स्वानुभवें जाला क्लुप्त ॥३॥

० पद ३४ वें

वेदशास्त्रें म्हणती गुप्त । ते गुरुनें केलें क्लुप्त ॥१॥

आम्ही तेणेंचि जालों तृप्त । नाहिं सांगिजे संतें वृत ॥ध्रु॥

वृत्तिवांचुनि तृप्त झालों । तृप्त होउनि ठाइं निवालों ॥२॥

गुरुकृपें केशवी प्राप्ती । प्राप्ती गा्रसुनि स्वयंभ तृप्ती ॥३॥

० पद ३५ वें

हातिं धरुनी दिधलें नसे । परी हाता आले असे ॥१॥

नवल सद्गुरुचें देणें । ज्याचें भरूनी घ्यावें तेणें ॥ध्रु॥

देणें घेणें कांहिंच नाही । ऐसें देणें दिधले पाहीं ॥२॥

केशवस्वामी ऐसा देतो । घेउं जाणे तो घेणेंचि होतो ॥३॥

० पद ३६ वें

विश्र्वे गिळिलें जेणें सापें । तो सांपचि गिळिला बापें ॥१॥

आम्ही निर्भय झालों आतां । हात बहुथोरांचा माथा ॥ध्रु॥

हातें सौंसाराचा घात । हातें प्रगट केला नाथ ॥२॥

हातें सुखरूप झालों पाहीं । हातें तारलों संदेह नाहीं ॥३॥

हातें हातींच दिधला देवो । देव रूपाचि त्याचा देहो ॥४॥

केशा म्हणे तो सदगुरुमूर्ती । हातीं घेती ते तद्रुप होती ॥५॥

० पद ३७ वें

ज्याच्या पायांची होतां भेटी । जन्ममरणासी पडली तुटी ॥१॥

त्याच्या स्वरूपीं घाला मिठी । कीं ती व्यर्थचि मायिक गोष्टी ॥ध्रु॥

आळिंगितां ज्याचे आंग । माझें आंगचि जालें अनंग ॥२॥

केशव म्हणे उठाउठीं । जावें विरोनि त्याच्या पोटी ॥३॥

० पद ३८ वें

प्रेम देउनि वेधिलें मन । मन वेधुनि फुंकिले कान ॥१॥

कानावाटे दाविलें ज्ञान । ज्ञानें केले समाधान ॥ध्रु॥

ज्ञानस्वरूप तो मी देवो । मज दावुनि हरिला देहो ॥२॥

देव केले तो निजदेव माझा । म्हणे केशव सद्गुरुराजा ॥३॥

० पद ३९ वें

दीनबंधु सुखैकघना । करी पालट माझ्या मना ॥१॥

कृपाळु वा सद्गुरुनाथा । तुझ्या चरणीं मी ठेविन माथा ॥ध्रु॥

माझें मीपण अवघें हरी । मज आपणऐसें करी ॥२॥

सांगे केशव जीवाचा भाव । देइं अक्षय ० पदिं मजला ठाव ॥३॥

० पद ४० वें

श्रुति-शास्त्र परतें जें की । हातीं आणुनि दिधलें तें की ॥१॥

काय द्यावें तुजलागुनी । उदराच्या शिरोमणी ॥ध्रु॥

बुद्धिबोधें बोधुनि नीकी । केलें परमानंदे सुखी ॥२॥

म्हणे केशव सद्गुरुनाथा । पाइं धनिवरि ठेविन माथा ॥३॥

० पद ४१ वें

गुरु गुरु गुरु गुरु करितों मी । झोंबोनि चरणा धरितों मी ॥१॥

माय-बाप तूं धनि माझा । पाळक कुतरा मी तूझा ॥ध्रु॥

थापटुनि झणिं निजहातें । अखंड सावध करि मातें ॥२॥

केशवकवि म्हणे दातारा । स्व० पदीं देईं मज थारा ॥३॥

० पद ४२ वें

विवेकसिंधूची चिद्रत्नें । लेवविलीं मज यत्नें ॥१॥

तो जम आठवतो गुरुराजा । प्राणविसांवा माझा ॥ध्रु॥

अखंड देउनियां स्मरणासी । द्वैतभयासी नाशी ॥२॥

अक्षय प्राप्तीचा निजदाता । केशव जनिता आतां ॥३॥

० पद ४३ वें

आनंद केला बा गुरुराया । हरिली सकळही माया ॥१॥

चिंता ममता हे तंव नेणें । ब्रह्मचि हें मी जाणे ॥ध्रु॥

त्रिपुटी ग्रासुनियां सुख देशी । प्राणविसांवा होशी ॥२॥

केशव-दातारा सुखसारा । स्वरुपीं दिधला थारा ॥३॥

० पद ४४ वें

मज रे तया सखया अवधूता । भजनेंचि करी भवसागर रीता ॥१॥

संसार-सांखळी स्मरणें तोडी । लावी अखंडित निजगोडी ॥ध्रु॥

आनंदराशी सर्वसुख प्रकाशी । प्रकाशक शिव अविनाशी ॥२॥

सुखधन चिद्धन त्रिभुवनराजा । केशवस्वामी निजतारक माझा ॥३॥

० पद ४५ वें

वाचिलें गुरुवाक्य आम्ही । लिहिलें तेंचि या अंतर्यामीं ॥१॥

पावलों तेणें परमधामीं । सहजचि मुक्तकामीं निष्कामीं ॥धु्र॥

सद्गुरुवाक्य जतन केलें । तेणें हें द्वैत विरोनि गेलें ॥

त्रिगुणालागीं पाणी पडिलें । सुखेंचि अवघें कोंदाटलें ॥२॥

ठेवितां गुरुवचनीं विश्र्वासू । जाहला निजतत्त्वप्रकाशू ॥

भेटला सहज अविनाशू । खुंटला आपेंआप आयासू ॥३॥

पाहतां गुरुवाक्य यथार्थ । फावला अवघा फळितार्थ ॥

केशवीं गुरुचरणीं भावार्थ । लाधला तेथेंची परमार्थ ॥४॥

० पद ४६ वें

गुरुमूर्ती अखंड आठवे रे । रूप त्याचें हृदयि सांठवे रे ॥१॥

क्षणाक्षणा आठव मज देतो । नाठवी मी तरी आठवीतो रे ॥ध्रु॥

कधीं कोठें न वचे मजवीण । मजपरतें बैरवें काय तेण रे ॥२॥

केशव म्हणे देउनि भेटी निकी । ० पदो० पदी मजला केलें सुखी रे ॥३॥

० पद ४७ वें

अरे हरी आगमवस्तु न कळे कांही । निगमवस्तु गोचर नाहीं ॥१॥

म्हणुनि भज श्रीगुरुराया । अपिं गुरुचरणीं काया ॥ध्रु॥

कोणी वस्तु नेणेचि पाहीं । वस्तु गुरुमुखें पडे ठायी ॥२॥

कर्में वस्तु स्वप्न्नीं न दिसे । तपें वस्तुलेश न भासे ॥३॥

तार्किकां हे रीघचि नाहीं । ते तव वस्तु गुरुमुखें पाहीं ॥४॥

असुनियां वस्तु दुरावी ती । अभक्तां कैंची वस्तु प्रतीची ॥५॥

नित्य केशवीं सद्गुरुभक्ती । करितां जाली वस्तुची प्राप्ती ॥६॥

० पद ४८ वें (घाटी - चुटक्याची)

श्रीगुरुचे पाय वो पहातांच माय वो ।

भवदुःख जाय वो सकळ माझ्या जीवीचें ॥ध्रु॥

विश्रांतीचे मूळ पाय, पाय ध्यातां मन धाय ।

पायाचें महिमान काय, वर्णुं आतां केंउ तें ॥१॥

पाया आखंड स्मरावें, पाय हृदयीं धरावें ।

पाय जतन करावे, जीवाहुनी आगळे ॥२॥

पायीं जोडे भक्ति-मुक्ति । पायीं मीनतां प्रगटे शांती ॥

केशवीं स्वानंद-स्थिती । पायाचेनि प्रसादें ॥३॥

० पद ४९ वें-कांबोध

रंगा आली रे गुरुमाउली । पहातांचि हे व्रीत्ति सुखी जाली रे ॥ध्रु॥

रूप पाहिलें रे मन धालें रे । समाधान हें आजि जाहलें रे ॥१॥

रंगा यउनि क्षेम देउनि रे । केशवीं प्रगटली जनी-वीजनी रे ॥२॥

० पद ५० वें

माझें मजची नुगवेंसे जालें । तेथें गुरुपाशी पुसों गेलें॥१॥

कैसें गुरुराजें नवल केलें । क्षणामाजी उगवीलें ॥ध्रु॥

निजबोधाच्या घालुनी डाका । ज्याचे त्या मुखें बोलवी देखा ॥२॥

काम-क्रोधासी उगाना केला । अहंकार-समंध काढीला ॥३॥

देहबुद्धिचें उठवुनि ठाणें । अवघें उगविलें गाऱ्हाणें ॥४॥

केशा म्हणे काय बोलों । सुखें निजसुखी ठेविलें ॥५॥

० पद ५१ वें - श्र्लोक

महासोंवळा मुख्य रे तोचि पाही । नसे सोंवळे वोवळे त्यासि कांही ॥

असा सोंवळा जो सदा पूर्ण जाला । शिरीं वंदिती हे तिन्ही देव त्याला ॥१॥

करी नास विज्ञानयोगें भवाचा । धरी संगची दास या राघवाचा ॥

मुनी तो जनीं वेदवाक्यार्थ बोले । तया चिंतितां हे महादोष गेले ॥२॥

निशेष माया-तम नाशितो जो । चिद्भानुचें बिंब विकासितो जो ॥

तो सद्गुरु केवळ देवराजा । सुनिश्र्चयेसीं निजनाथ माझा ॥३॥

० पद ५२ वें

गुरुनें कृपा केली बा । चिंता ममता गेली बा ॥१॥

अवघा झाला आनंदु । अवलोकितां गोविंदु ॥ध्रु॥

देह बुद्धि गेली विलया । मिळणी होतांचि चिन्मया ॥२॥

केशव म्हणे गुरुकृपा । ऐक्य जालें चित्स्वरूपा ॥३॥

० पद ५३ वें

भजनें भयनाशी । भावें भज त्सासी भज त्यासी ॥ध्रु॥

दाखवी सर्व निवासी । सन्मय भाग्यविलासी ।

केवळ चित्सुखराशी ॥ भावें भज ॥१॥

मन्मथ तशकर त्रासक । भेद भयानक नाशक ॥

साम्यक सम० पद नायक । केवळ मंगळदायक ॥ भावें ॥२॥

निश्र्चळ कर्मप्रवाहीं । सावध निज निर्वाही ॥

जाणिव नेणे कांही । निर्मन योगी पाही ॥ भावें ॥३॥

अलक्षपुरीचा राजा । अवतरला जनकाजा ॥

नेणें द्वैत समजा । केशव म्हणे गुरु माझा ॥ भावे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP