|
पु. १ भाग ; अजमास ; सुगावा ; अंदाज . ' राजश्री कृष्णाजीपंतास सामील होऊन माहितगिरीनें केल्याचा नीर काढून अजम मुजफरखानहि जवारीवर उतरतील . परस्परें बातमी कलऊन कोल्याएं पारपत्य करणें म्हणोन आज्ञ .' - पेद ४० . ११२ . २ निकर ; नेट ; शह . येक महाड व बिरवाडी , पोलादपूर नाते हे चार महालावर श्यामलाचा नीर आला .' - पेद ३३ . ५३ . न. पाणी ; जल . - ज्ञा ७ . ९१ . - एभा १ . १२४ . नीरक्षीरालिंगनरुपी स्नान तुला ते घालोनि । - सौभद्र अंक ४ . [ सं . का . नीरु ] पु. परिणाम ; निकाल ; निर्णय ; इत्यर्थ ; निश्चय ; ठराव ( पंचायतीचा , चवकशीचा ). ( क्रि० काढणे ; निघणे ; घेणे ). काय बोल ग्रंथाला वाचिक अर्थ काढिना नीर । - राला १३ . पु. मासे धरावयाचे मोठे जाळे . माशावाणी नीर काढिला आणले धरुन । - ऐपो २६४ . ०मोर न. फोडणीचे ताकपाणी , ताकांत बरेच पाणी घालून त्यांत लिंबाचा रस पिळतात व सुंठ , हिंग , मीठ इ० मिसळतात . - गृशि १ . ४७६ . कर्नाटकांत याला नीरमज्जिगे म्हणतात . ०काढणे झाडून , साफ , खरडून काढणे ; निकाल करणे . गनिनीचा नीर काढावा . - पेद २१ . ८ . [ निरा ? ] निरावर येणे १ निकरावर , शेवटच्या उपायावर , अटीवर येणे ; शेवटच्या अवस्थेस पोंचणे ( आजार , विकार ). २ संपुष्टात येणे ; संपावयास लागणे ; संपत येणे ( काम , वस्तु इ० ). ०क्षीरविवेक पु. क्षीरनीर विवेक पहा .
|