-
पु. १ मद्रासपासून कन्याकुमारीपर्यंतचा देश व त्यांतील लोकसमाज . २ द्राविडी भाषा ( कानडी , तेलगू , तामिळ , मल्याळम इ० ) बोलणारांचा प्रदेश व बोलणारा समाज . ३ एक ब्राह्मणवर्ग व त्यांतील समाज . पंचद्राविड पहा . - वि . द्राविडी पहा . [ सं . ]
-
The coast of Coromandel from Madras to Cape Comorin. 2 A class of Bráhmans, or an individual of it, natives of that country. Five distinctions are comprehended. See पंचद्राविड.
-
०कच्छ पु. द्राविड लोकांची कासोटा घालण्याची तर्हा . डी प्राणायाम पु . १ ( उजव्या हाताने समोरुन नाकाशी हात न नेतां डोक्याच्या मागच्या बाजूने हात नेऊन प्राणायामासाठी नाकपुडी धरणे या विचित्र तर्हेवरुन ल . ) आडमार्गाने सागण्याची , वागण्याची तर्हा ; वक्रमार्ग ; लांबचे लांब वळण . वेताळपंचविशी हा ग्रंथ मूळचा संस्कृत , त्या भाषेतून याचा तर्जुमा फारशी भाषेत झाला , तीतून इंग्रजीत , इंग्रजीतून मराठीत ! केवढा द्राविडी प्राणायाम हा ! - नि . २ जवळचा मार्ग न घेतां केलेला लांबलचक , कष्टप्रद व निष्फळ प्रवास ; लांबचा रस्ता , मार्ग . द्राविडी वि . द्रविड ब्राह्मण किंवा देश यांविषयी . म्ह ० द्राविडो लुडबुडाम्यहम = जे पाहिजे ते एकदम न मिळतां त्यासाठी इकडून तिकडे व तिकडून इकडे हेलपाटे घालावे लागणे ( एकदा एक द्रविड ब्राह्मण पेशव्यांची भेट घेऊन दक्षिणा मिळवावी म्हणून श्रीमंतांचा शोध करीत सासवडाहून पुरंदरास व तेथून पुन्हां सासवडास असे हेलपाटे घालून त्रासला त्याचे वर्णन त्याने पुढील कवितेत केले आहे - गड्डाच्च सास्वडं यामि सास्वडाच्च पुनर्गड्म । गडसास्वडयोर्मध्ये द्राविडो लुडबुडाम्यहम । त्यावरुन ).
-
द्राविडः [drāviḍḥ] [द्रविडदेशोऽभिजनोऽस्य-अण्]
Site Search
Input language: