Dictionaries | References

व्याप

   
Script: Devanagari

व्याप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Frequenting or being at continually; living and acting in or at; constant occupiedness, versedness, or busiedness in, among, about. Ex. तनु धन विष- याचा ॥ सर्व जो जो पसारा ॥ अमृतचि परि माझा ॥ त्यामध्यें व्याप सारा ॥. 2 Worldly business and bother; the business and fuss, toil and turmoil of human life. Pr. व्याप तितका संताप.

व्याप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Constant occupiedness. Worldly business and bother. Volume.

व्याप     

ना.  पसारा , फैलाव , विस्तार ;
ना.  उपद्‌व्याप , कटकट , नसता त्रास ;
ना.  आडंबर , उलाढाल , खटाटोप , मोटा व्यवहार .

व्याप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पसारा

व्याप     

 पु. १ सतत वास , लक्ष , व्यग्र असणे ; एकासारखे व्यापृत , उद्योगांत निमग्न असणे . ' तनु धन विषयाचा । सर्व जो जो पसारा । अनृतचि परि माझा । त्यामध्ये व्याप सारा । २ प्रापंचिक उद्योग व त्रास ; आयुष्यातील हालअपेष्टा , कष्ट , इ० . ३ पसारा ; विस्तार ; मोठा व्यवहार . जितका व्याप तितुके वैभव । - दा १४ . ६ . २६ . ४ उदव्याप . [ सं . वि + आप ] म्ह० - व्याप तितका संताप . व्यापक - वि . १ व्यापणारा ; आच्छादणारा ; सर्व विस्तार आपल्यांत घेणारा . २ पूर्णपणे भेदणारा व आक्रमणारा . ३ अंतर्भाव , समावेश करणारा ; सर्व पोटांत घेणारा . मनुष्यत्व जाति ब्राह्मणत्वजातिपेक्षां व्यापक . ४ पसरणारा ; विस्तार पावणारा . ५ मोठया , उदार विचाराचा ( माणूस ). तेथे भले आडळती । व्यापक तेहि कळो येती । - दा १९ . २ . २१ . व्यापणे - उक्रि . आच्छादणे ; पोटांत घेणे ; समाविष्ट करणे ( ल . व शब्दाशः ) - अक्रि . १ पसरणे ; व्यापृत होणे . २ भिनणे ; फैलावणे ( विषादि अंगांत ). विष जो सर्वांगी व्यापले नाही तोपर्यंत उपाय चालतो . व्यापन - न . १ आक्रमण ; प्रसरण . २ समावेशन ; व्यापण्याचा व्यापार . [ सं . ] व्यापी - वि . व्यापणारा ; पसरणारा ; समावेश करणारा . ( समासांत उपयोग ) जगदव्यापी ; सर्वव्यापी . व्याप्त , व्यापित - वि . १ व्यापलेला ; आच्छादलेला ; समाविष्ट केलेला . २ जिरलेला ; मुरलेला . ३ परिपूर्ण ; भरलेले . ४ लब्ध ; प्राप्त . व्याप्ति - स्त्री . १ आक्रमण ; सर्वत्र विद्यमानता . २ विश्वव्यापकता ; शिवादि देवतेचे एक अभिधान . ३ ( सामा . ) विस्तार ; पसारा ; व्याप . देखे हे शब्दाची व्याप्ति । - ज्ञा २ . ११४ . ४ प्राप्ति ; मिळकत . ५ ( शाप . ) वर्गीकरण ; विभागणी . ६ ( शाप . ) स्थान ; अस्तिवाचे , मिळाण्याचे ठिकाण . - सेंपू १ . ६३ . ७ ( तर्कशास्त्र ) निकट व अविभाज्य साहचर्य ; निश्चित अनुमानकारण . अग्नीची व्याप्ति धूमावर . ( धुरामध्ये अग्नीचा समावेश असतोच , तेव्हां अग्नीच्या अस्तित्वाचे अनुमान निश्चित ). व्याप्य - वि . १ व्यापावयाचे किंवा व्यापलेले ; आक्रमित . २ समाविष्ट व्हावयाचे किंवा झालेले ; अंतर्भूत . ३ ( तर्कशास्त्र ) अनुमानविषय असलेले .
०कोटि  स्त्री. अंतर्भूतवर्ग ; गौण , पोटविषय , वर्ग . व्याप्यकोटि - प्रविष्ट - अंतर्गत इ० समास .
०वृत्ति  स्त्री. ( तर्क . ) निरंतर साहचर्य . व्यापन . - वि . नेहमी बरोबर , चिकटून असणारे ; अंतर्वती , अनुषक्त असणारे .
०व्यापक  पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध .
भाव  पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध .

Related Words

तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   जितका व्याप, तितका संताप   जेथें व्याप, तेथें संताप   व्याप   जेवढा व्याप, तेवढा संताप   exhaust lap   education overlap   valve lap   varying lap   volume elesticity   cell volume   blood volume   म्हशी आसिल्ल्याक उठाबशी आसात   हातपाय पसरणें   आटाप   विकतचे श्राद्ध   bulk elasticity   जीव थारीं असणें   उपतपन   पास नहीं कौडी, आम खरीदने दौडी   उपद्‍व्याप   आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला   ज्‍याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्‍थ नाहीं   डंबाळ   आसन रुंदावणें   अलायी   भारिभार   रयताबा   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   उडदळ   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   निरुपहित   पाल्हाळ   लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥   लोंठ्या   रिकामें मन आणि कुविचाराची धन   रिकामें मन सैतानाचं धन   रिकामें मन सैतानाचं सदन   रिकाम्या मनासैतान करी कारखाना   overlap   अघाडी शेत दुघाडी मळा   आकुंचन   काखाटी   काखोटी   मकाण   मकान   पसारा   लोंठा   लोठा   लोठ्या   volume   आपूर   चाली   व्याप्   bulk   जोंजार   जोजार   lap   आटोप   अटका   विस्तार   magnitude   अक्षय्य   अराबा   अविद्या   प्रपंच   धका   सडा   अक्षय   महाल   वेधक   अव   धक्का   संगीत   लोळ   उपाधि   range   वाढ   हात   वामन   घर   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP