TransLiteral Foundation

सर

See also सरा
ना.  डोके ;
ना.  प्रमुख , मुख्य , वरिष्ठ , श्रेष्ठ ;
ना.  बरोबरी , समानता ;
ना.  पावसाची झड , वर्षाव ;
ना.  माळ ( दोर्‍यांत ओवलेली ), हार ;
ना.  फटाक्यांची माळ , लड .
. 3 The horn-rope of bullocks. It is fixed on or renewed on the great bullock-festival called बेंदूर or पोळा.
.
a rushing emotion or a sally of joy or laughter; पटकीची or जरीमरीची -खोकल्याची &c. -सर. 2 m f A fit of delirium or of minor mental disturbance.
So as to run or flow over; in an overflowing manner;--as a river or a vessel. Ex. नदी वरसर or कांठसर भरून चालली; भांडें वरसर or तोंडसर भरलें.
अ.  अंश , किंचित् ‍ छटा , सादृश्य वगैरे दाखविणारा विशेषणांस लागणारा प्रत्यय उदा० काळसर , पिंवळसर . २ पर्यंत ; पुरेपूर ; कांठोकाठ . नदी वरसर भरली . भांडें तोंडसर भरलेलें . दिवाळयेसर वायदो करून येतों . - मसाप २ . ४ . १११ .
 पु. एक पदवी . [ इं . सर ]
 स्त्री. १ एकदम जोराचा लोंढा , सोसाटा ; उदा० पावसाची सर . नगीं मेघ जेविं सर घाली । - मोकर्ण ३३ . ५७ . वर्षलि वारि हरि दयासुधांबु सरी । - मोकृष्ण ८१ . ८५ . २ आवेश ; आवेग ; उकळी ; हुंदका . उदा० रागाची सर , रडण्याची सर . ३ झटका ; झपाटा ; फेरी . उदा० तापाची सर ; हिंवाची सर ; पिशाचाची सर . वस्ती विराजू न पिशाच सर । - नव १३ . १२० . ४ उमाळा ; उकळी ; लहर . ममतेची , आनंदाची , डांग्याखोकल्याची सर . ६ वाताची , भ्रमाची , वेडाची लहर . [ सं . सृ = सरणें ]
 पु. १ लांब सरळ बांबू अथवा लांकूड ; वांसा ; तुळई ; लांब लांकडे ( खालच्यास घोडे म्हणतात ). ३ ( विणकाम ) वस्त्रांतील विरळ विणीची रेषा . [ सं . सृ ]
 स्त्री. १ बरोबरी ; तुल्यता ; योग्यता ; साम्य . तुम्हां नसेचि सरी . । - मोकर्ण २७ . १३ . २ रांग ; ओळ . बाबिलोनी नेला सरे धरूनु । युडेआंसवें । - ख्रिपु १ . ३० . ९६ .
 पु. दह्याचा घट्ट व स्नेहयुक्त भाग . - योर १ . १५५ . [ सं . ]
 स्त्री. ( गंजिफा ) तलफ ; राजाकरितां किंवा इतर हुकूम पडावा म्हणून केलेली खेळी . - वि . ( पत्त्यांच्या डावांत ) हात होईसें ; हुकूमासारखें .
 पु. १ हार ; फुलें , मणि , मोत्यें वगैरे दोरांत ओवलेली माळ ; कंठा . २ अनेक पदरी हाराचा पदर ; वळलेल्या दोराचा पदर ; वादीचा पदर . ३ फटाक्यांची माळ ; लड . ४ बैलाची शिंगदोरी ; बैलाचा दोर ; शिंगाजवळ किंवा गळयांत अडकविलेली सांखळी . ५ लांकडाचा लांब सोट ; वांसा ; लांब बांबू ; मुसळाची सळई . ६ ( व . ) कणसाचा लांब देठ ; सरगुंडे वळण्याची काडी . ७ ( ना . ) पोटांतली आंतडीं . ८ ( व . ) पाठीचा कणा ; नाकाचें उभें हाड . [ सं . ] ९ भात वगैरे धान्य वारवण्यासाठीं वरून सोडतात ती लांबट रास . सर घालणें , टाकणें . [ सं . सृ ]
 पु. बैलावरील कर . - बदलापूर ३६३ .
 पु. १ डोकें . २ ( ल . ) मुख्य ; श्रेष्ठ ; वरचढ . या सर्वांवर हरिपंत सर आहे . हुद्यापूर्वीहि मुख्य या अर्थी जोडतात . उदा० सरदेशपांडे ; सरदेशमुखी ; सर सुभेदारी इ . ३ ( ल . ) प्रमुख ; नेता ; चालक ( संस्था , मंडळ वगैरेचा ). ४ ( गाय , म्हैस वगैरे शब्दांनंतर योजल्यास ) संख्या ( डोकी ) दाखवितो . उदा० गाय सर एक , म्हैस सर तीन = एक गाय , तीन म्हैशी . बैल सर पाचशें पाठविलें . - रा १२८ . प्राण्यांची संख्या दाखविणेस सर व वस्तूंची संख्या दाखविण्यास सुमार शब्द योजीत . उदा० उंटे सर बारा , नारळ सुमार पंचवीस . सर करणें - जिंकणें ; पादाक्रांत करणें ( किल्ला , प्रदेश करणें ); फत्ते करणें ; तडीस नेणें ( काम , काज ). [ फा . सर ]
क्रि.वि.  सरकण्याचा , निसरण्याचा , घसरण्याचा , सर असा आवाज करून . [ घ्व . ]
 न. सरोवर ; तळें ; तडाग . [ सं . सरस् ‍ ]
वि.  ( महानु . ) योग्य . ऐसें काइसें वो निढाळपण । सर नव्हे तुझें कारण । - शिशु १७९ .
 पु. आवाज ; ध्वनि ; साद . सरींची गुंतलें चित्त । म्हणौनि मुकला जीविता । - भाए ३७२ . [ सं . स्वर ]
०कानगो   कानूगो - पु . देशपांडयासारखा एक अधिकारी . - रा १२ . २१५ . [ फा . ]
०खुश वि.  पूर्ण आनंदी ; सुखी ; संतुष्ट . [ फा . ]
०कानगोपण  न. सरकानगोपणाचें वतन . संस्थान मजकूर येथील सर मंडलोईपण व सरकानगोपणाचे नवीन वतन रामचंद्र बल्लळ यास करून दिल्हे आहे . - वाडबाबा ३ . ३५ .
०गरम वि.  १ कोंबट ; किंचित् ‍ उष्ण ; सोमट . २ संदिग्ध ; अनिश्चित ; मोघम . ३ उद्युक्त ; मोहीमशीर . पर्गणे मज्कुरीचे आबादानीस व मामुरीस सरगरम असणें . - वाडसनदा १४० . [ फा . ]
०गश्त  स्त्री. मिरवणूक ; सरघस . सरगश्त व मेहदीहि निघाली . - रा ७ . ७८ . [ फा . ]
०कारकून  पु. वरिष्ठ प्रतीचा कारकून . फक्त अष्टप्रधान सरकारकुनास पालख्या दिल्या . - शिचप्र २२ .
०खत  न. १ सरकारकडे वेळोवेळी भरणा केलेल्या रकमांची क्रमानें केलेली नोंद ; पावती ; कौलनामा . २ विक्रयपत्र ; सरकारनें विकत घेतलेल्या मालांची पावती .
०धोपट वि.  सरळ ; समोर ; बेधडक ; नीट ; वांकडातिकडा नसलेला ( रस्ता , नदी , भाषण , कृति , वागणूक ). - क्रिवि . सरळपणें ; उघडपणें ; बेधडकपणें ; खाडाखाड ; तडख ; न अडखळतां ; न गुंतता ( लिहिणें , वाचणें वगैरे ).
०निखर   क्रिवि . सरसगट ; गोळाबेरीज करून ; एकत्रपणें .
०खवास   पु मुख्य नोकर ; अनुचराधिपति . सरदेशमुख म्हणून देऊन सरखवाशी व देहुडयांकडील चौकी पहारे व कारखाने यांस ... - मराचिथोशा १० .
०खेल  पु. १ खास पथकाधिकारी , स्वारांच्या पथकावरील अधिकारी ; ध्वजवृंदाधिकारी . २ मराठेशाहीतीक एक पदवी ; आंग्रे सरदारांची पदवी . तुळाजी आंगरे सरखेल यांजकडून अंमल दूर करून ... - वाडबाबा ३ . ५३ .
०पाठ वि.  सारखे .
०पाड  स्त्री. सारखी योग्यता . तुम्हांस दोघां सरपाड आहे । - सारुह ७ . १०१ .
०खेली  स्त्री. सरखेलाचा अधिकार हुद्दा , पदवी , काम .
०खोत  पु. मुख्य खोत . सर खोत व फुट खोत पुढें सुटीचा कज्या राहिला नाही . - समारो १५५ .
०बसर   बासर - विक्रिवि . १ कमीजास्त ; थोडाफार फरक असलेला ; बरावाईट ; श्रेष्ठकनिष्ठ . सगळी मोती एकसारखी नाहीत सरबसर आहेत . २ मिश्र ; सळमिसळ ; एकवटलेले ; एकत्र केलेला . ही चांगली साखर वती नीरस साखर सरबसर करून वाढ . ३ सरासरी ; साधारण ; मध्यमप्रतीचा . तिजाईसूट सरबसर पाहून द्यावी . - सुमारो ४ . १५७ .
०गावडा  पु. खेडयांतील एक कामगार , अधिकारी ; धनगरांचा मुख्य .
०मिसळ  स्त्री. मिश्रण ; एकत्रीकरण ; मिसळणें . - वि . क्रिवि . मिश्रित ; एकत्र ; मिसळलेले ; मिश्र गुणांचे . दुराणी व हे सरमिसळ पळत येतात . - भाब ७१ . जळ विष सरमिसळ सळे ... - मोकृष्ण १६ . २ .
०गुर्‍होरो  पु. १ किल्लावरील शिबंदीतील एक अधिकारी ; जमादार . २ पंथाचा मुख्य , महंत . [ फा . ]
०रहा   क्रिवि . मोकळेपणानें ; अबाधितपणें ; सावकाश ; बिनधोक ; सरळपणें ( चाललेले काम , पद्धति )
०चश्मा   चष्मा - पु . प्रमुख ; अध्यक्ष ; चालक ; पुढारी ; धुरीण ; नायक ( सभा , मंडळ , खातें वगैरेचा ). [ फा . ]
०रास वि.  निष्णांत ; निपुण ; तरबेज ; हुशार . - क्रिवि . एकंदरीने ; सरसकट ; सामान्यतः
०तपासणी  स्त्री. एखाद्या साक्षीदाराची हजर करणार्‍या पक्षाने घेतलेली जबानी .
०शेवट  पु. अखेरी ; अंतःशेवट ; टोंक ; अखेरीचा भाग .
०तरम  पु. मुख्य मोजणीदार ; शिरस्तेदार . हुजुर कचेरी हेची दोनी तटा । सरतरम तेथीचिया महान् ‍ लाटा । - पैमा १ . १९ .
०शेवट   शेवटी - क्रिवि . अखेरीस ; अंती ; शेवटी ; सरतेशेवटी .
०सकट   सगट - क्रिवि . एकंदरीने ; गोळाबेरीज करून ; निवड न करतां ; सरासरी ; एकत्रपणें ; सगळें ; सर्वसामान्य .
०ताज  पु. मुख्य ; प्रमुख [ फा . ]
०सट्‍टा   क्रिवि . सरसकट ; मागे पुढें न पाहतां ; निवद न करतां . एखादा पुरुष सरपटटा म्हणजे योग्यता न पाहतां .... दान करू लागला .... - गीर ५४८० .
०दफ्तर  न. सरकारी कामकाज वतें करण्याचा अधिकार . भाइअ १८३४ .
०सपाट वि.  अगदी सरळ व एका पातळीत ; एकसारखे ; एकरूप ; अगदी सपाट . सरसपाट जें निर्घोट । कठिनत्व खोट ज्यांत नाही । . - ज्ञाप्र ३४ . त्या आत्मज्ञानादि सगट । अवघें झालें सरसपाट । - स्वादि १२ . ४ . ७५ .
०देशपांडे   देशपांडया - पु . देशपांडयांवरील मुख्य ; मुख्य देशपांडे .
०सपाटी  स्त्री. एकसारखा सपाटपणा ; समपातळी ; उखरवाखर , उंचसखल नसलेली स्थिति ; विस्तीर्ण सपाट मैदान .
०देशमुख  पु. देशमुखांतील मुख्य ; सर्व देसमुखांहून वरिष्ठ पदवीदार . - बर्वे घराण्याचा इतिहास १७ ; - रा २१ . ५९ .
०सलूख  पु. विजय व तह ; काबीज करून केलेला तह , शांतता वगैरे . नेमाड माळवा मुलुख , करून सरसलूख मोडिले वीर । - ऐपो ४१६ .
०देशमुखी  स्त्री. सरदेशमुखाचा हक्क ; मोंगलांचे अंमलांतील प्रांतांवर मराठयांनी बसविलेला कर . हा उत्पन्नाच्या दशांश किंवा साडेबारा टक्के असे . ही बाब छत्रपतीची खासगीकडे खर्च होत असे . - थामारो २ . ९१ .
०सहा   क्रिवि . एकसारखा ; भेद न करितां ; सरसकट ; बिनधोक .
०देसगत  स्त्री. सरदेशमुखी . तालुके नवलगुंद देखील सरदेसगत निसबत गोविंद भिकाजी . - समारो ३ . २५ .
०नामा  पु. पदवी ; किताब ; पत्रारंभीचा मायना ; आडनांव . २ प्रास्ताविक मजकूर . [ फा . सर्नामा ]
०साल  न. चालू सर्व वर्ष ; संबंध वर्ष .
०सरसाल   सरसालां सरसालीना सरसालें - क्रिवि . सर्व वर्षभर ; चालू साली , वर्षी . चौकशीनें सरसालें खर्च करणें . - थोमारो ९ . ३ .
०नोबत   नौबत नोबद नौबद - पु . ज्यास स्वतंत्र नोबत , ( नगारा ) मिळाली आहे असा सैन्याधिकारी ; सेनापति ; सेनानी . जयसिंगराव निकम सरनोबत दिमत पागा हुजूर . - समारो ४ . ५१ . [ फा . ]
०सरसिधा   सरशिधा - पु . कच्चाशिधा ; धान्य ; शेर . सरकारांतून शिपाई येईल त्यास खोत सरशिधा देईल . - मसाप २ . २ . ७ .
०पंत  पु. मुख्यन्यायाधीश . या स्थापिलेल्या वरिष्ठ कोर्टामध्यें मुख्याधिपत्य सर पंत मोरो काशीनाथ अभ्यंकर यांजकडे दिले होते . - बडोद्यातील राजकर्ते ३३९ .
०परस्त  पु. पालनकर्ता ; पालक . [ फा . ]
०सुमार  पु. ( प्र . ) सईसुमार ; सोईसुमार ; सरासरी .
०हद्द  स्त्री. सीमा ; मर्यादा ; शेवट .
०परस्ती  पु. पालकत्व [ फा . ]
०पागा  स्त्री. हुजूरपागा ; मुख्य सरकारी घोडदळ .
०पागे   पाग्या - पु . राज्यांतील सर्व पागांवरील मुख्य अंमलदार .
०पाटील  पु. जिल्ह्याच्या वसूलीवर देखरेख करणारा व त्याबद्दल शेंकडा कांहीं तरी रकम मिळणारा अधिकारी .
०पेच  पु. शिंरपेच ; पगडींत खोवावयाचा तुरा . [ फा . ]
०पोतदार  पु. सर्व पोतदारांवरील मुख्य ; मुख्य सरकारी खजिन्यावरील अधिकारी ; नाणीं पारखून घेणारा कामगार .
०पोस  पु. १ आच्छादन ; झांकण ; वरून पसरलेलें कापड , रुमाल . ( अन्नाचें ताट , पगडी वगैरे वरील ) कोणी सरपोसवरुन पसरिति । - प्रला ११३ . २३२ . सरपोस जरी , वाराचा - समारो ४ . ११९ . २ ( ल . ) गुप्तपणा ; गुपित . आजपावेतो सरपोस राखिला . - ख ९ . ५०४२ . [ फा . ]
०बस्त   बस्ता - वि . १ बंद ; लपविलेलें . २ कांहीं ठराविक सारा देणारा , सर्व सारा न देणारा ( जहागीरदार ).
०बागे  पु. बागांवरील देखरेख कारणारा अधिकारी . ते सरदार ढमढेरे यांजकडे सरबागे म्हणून होते - ह . ना . आपटे चरित्र .
०बांध  पु. मुख्य बांध . - मसाप २ . ३ . ७८ .
०बारगिरी   बारगी - स्त्री . आधिपत्य ; सैन्यांतील हुद्दा . पन्नास घोडियाचे सरबारगी तुम्हांसी दिली आहे . - रा १५ . ३९८ .
०वुलंद वि.  प्रमुख ; कीर्तिमान ; उच्चपदाधिष्ठित .
०मजमु  स्त्री. मुजुमदारांवरील अधिकार्‍याचें पद , अधिकार . साल मजकुरीं कमावीस तुम्हांस सांगितली त्याची सरमजमु मशारनिल्हेकडे सांगितली असे . - वाडबाबा ३ . ७६ .
०मंडलोईपण  न. परगण्यावरील एका अधिकार्‍याचें पद . व संस्थान मजकूर येथील सर मंडलोईपण व सर कानगोपणाचें नवीन वतन रामचंद्र बल्लाळ यास करून दिल्हें असे . - वाडबाबा ३ . ३५ . [ सर + मंडलवाही + पण ]
०मास्तर  पु. हेडमास्तर ; मुख्य शिक्षक . शाळेचे सर मास्तर स्वभावानें मोठें गर्विष्ठ होते . - नि ६५८ .
०मुकादम   मोकदम - पु . सुभ्यांतील एक अधिकारी ; मुकादमांवरील मुख्य . - शारो १४१ .
०मुख्य  पु. संस्थानचा , प्रांताचा मुख्य ; होळकरांचा किताब .
०लष्कर  पु. सेनाकर्ते ; स्वतः सैन्य जमवून सेनापतीचें काम करणारा . - शिचप्र ६ .
०सब्ज वि.  १ ताजा ; हिरवा . २ ( ल . ) तेजीचा ; नशीबवान् ‍ . सब्जी - स्त्री . ( ल . ) भरभराट ; तेजी . ज्यांत पातशहाची सरसब्जी ते गोष्ट पातशहांस अर्ज करावी . - दिमरा १ . ६२ .
०वाद  पु. गोंधळ ; घोंटाळा .
०सम्त  पु. तरफेचा मुख्य . सम्मतचा मुख्य .
०सुभा   सुभेदार - पु . सभेदारांवरील मुख्य अंमलदार ; त्याची पदवी , हुद्दा , अधिकार .
०हवलदार   हवाला - पु . मुख्य हवालदार ; एक सैन्यांतील अधिकारी . तालुके अंजनवेल येथील सर हवाला . - समारो ३ . १७ .
 m  A string A wreath. The chief.
 f  A row A shower of rain. Equalling.
ind   A particle expressing slightness.
सर करणें   Overcome and take (a fort, &c.). Accomplish.

Related Words

सर   सर-सर करणें   सर-री-सर पावणें-येणें-बरोबरी होणें   सर घोड्या पाणी खोल-पाणी पी   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   उर : सर   गुळचट-चीट--मट-सर   भोळवट-सर   उखलिमे सर दबातो धक्कोसे क्या डर   कुत्ता मूह देनेसे सर चढे   बुद्धिपुर:सर-पूर्वक   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   शष्पाची सर नसणें   सर-कन-कर-दिनी-दिशी   सर करणे   सर सरक घोडया पाणी खोल   उखलिमे सर दबातो धक्कोसे क्या डर   उर : सर   कुत्ता मूह देनेसे सर चढे   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   गुळचट-चीट--मट-सर   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   भोळवट-सर   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   शष्पाची सर नसणें   सर करणे   सर घोड्या पाणी खोल-पाणी पी   सर-री-सर पावणें-येणें-बरोबरी होणें   सर सरक घोडया पाणी खोल   सर-सर करणें   नरसिंह सरस्वती   बजरंग सरोदे   रसरत्नसमुच्चय   रसरत्नाकर   वासुदेवानंदसरस्वती   सदाशिव लक्ष्मण ठोसर   सरकार   सरस्वती   सरोजिनी बाबर   सासर   हंसराज स्वामी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Word Search


Input language:

Did you know?

पत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,534
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,512
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.