|
न. १ मजुरी ; पगार ; केलेल्या कामाचा मोबदला ; बिदागी . वरदास दाससेना हे नाथा वेतनात मागे हें । - मोकृष्ण ८४ . २० . - मोवन ४ . १७७ . २ ( विशेषतः ) सालीना नेमणूक ( पूर्वी पुराणिक , पोतनीस , फडनीस इ० ना देत ती ). गांवकामगाराशिवाय वतनपध्दतीला फांटा मिळाला व चाकरीबद्दल वतनाऐवजी वेतन देण्याची पध्दत चालली . - गांगा ६८ . [ सं . ] ०गुरु पु. भाडोत्री , निव्वळ पगारी मास्तर . - टिव्या . वेतनी - वि . १ वेतन ठरवून कांहीम कामास लावलेला ( गडी , मजूर , पुराणिक , आश्रित इ० ). मृत्यु न म्हणे वेतनी । वेतन धर्ता । - दा ३ . ९ . १३ . २ कांहीं कामाबद्दल एखाद्याला रोख पैसे किंवा पगार न देतां त्याच्या मोबदला बक्षीस दिलेला ( गांव , हक्क , अधिकार इ० ). वतन पहा . ३ वेतनासंबंधाचा ( तंटा , हिशेब इ० ). ४ भाडोत्री ; पगारी .
|