Dictionaries | References

विनाशकाले विपरीतबुद्धिः

( सं.) मनुष्याचा नाश व्हावयाचा असला म्हणजे त्याला कांहीं सुचेनासें होऊन भलत्याच गोष्टी करण्याकडे त्याची प्रवृत्ति होते. -पामो ११०. " अं.
प्र.
मधलें लुकजीचें वर्तन ‘ विना० ’ या श्लोकोक्तीस अनुसरुन होत असल्याचें दर्शविलें आहे. " -शिवसंभव ( प्रस्तावना )
-श्रमसाफल्य २.१. ( अ ) न भूतपूर्वे न कदापि वार्ता हेम्नःकुरंगो न कदापि दृष्टः। तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः॥ ( आ ) हरिःफरी वृश्र्चिकरेणुरंभा विनाशकाले फलमुद्धहन्ति। यथातथा सज्जन दुर्जनांना विनाशकाले विपरीतबुद्धिः॥ सम. - ६१.३२-३३. " महायुद्धाच्या संकटाचें निवारण करण्यासाठीं सरकारासच हिंदुस्थानांत लष्करवाढीची अत्यंत गरज भासत असतां निरुपद्रवी कार्यक्रमांवर बेकायदेशीरपणाची गदा हाणली जावी, याविषयीं कोणासहि उद्वेग वाटून ‘ विनाशकले विपरीत बुद्धि ’ असेच उद्गार विचारी माणसांच्या तोंडून बाहेर पडतील." -केसरी ९-८-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP