TransLiteral Foundation

रांड

 स्त्री. १ ( निंदार्थी ) विधवा . २ दासी ; कलावंतीण ; वेश्या . ३ ( तिरस्कार , राग किंवा अनाथ स्थिति दाखवावयाची असतां ) स्त्रीजात ; बायको . तुझी रांड रंडकी झाली . - नामना ९२ . ४ ( निरुद्योगीपणा , नवरा मेलेल्या स्त्रीच्या स्थितीप्रमाणें ) बिघडलेली , अतिशय खलावलेली स्थिति ; दुर्दशा . यंदा शेतें चांगलीं आलीं होतीं पण आंत पाणी शिरून अवघी रांड झाली . ५ ( निंदेनें ) भित्रा , नीच नामर्द मनुष्य ; युध्दांतून पळून जाणारा सैनिक . म्यां न वधावें पळतां चाला मारूनि काय रांडा या । - मोकर्ण ३५ . ६० . [ सं . रंडा ] म्ह० रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें . ( वाप्र . ) रांडेचा - वि . १ बेकायदेशीर संबंशापासून झालेला . २ ( ग्राम्य . ) पादपूरणार्थक किंवा उद्गारवाचक शब्द . ३ एक ग्राम्य शिवी . रांडेचा , रांडचा मारलेला - वि . स्त्रीवश ; स्त्रीलंपट रांडेच्यानो , रांडिच्यानो - उद्गा . ( बायकी ) रखेली पासून झालेल्या मुलांना उद्देशून बोललेल्या शब्दावरून पुष्कळदा आश्चर्य व्यक्त करण्याकरितां पन क्वचित निरर्थकपणें निघणारा उद्गार . रांडेवाचून पाणी पीत नाहीं - आपल्या बायकोला एखादा कठोर शब्द बोलल्यावांचून तो पाण्याचा थेंब सुध्दां पीत नाहीं ( सतत शिव्या देणार्‍या नवर्‍यासंबंधीं म्हणतात ). रांडेहून रांड - वि . बुळा ; अतिशय बायक्या ( मनुष्य ). सामाशब्द -
०अंमल  पु. १ स्त्रीराज्य . २ नेभळा , अयशस्वी कारभार .
०काम  न. १ बायकोचें काम ; गृहकृत्य . २ विधवेचें काम ; बाहेरील आडकाम किंवा रानांतील गवत कापणें व सर्पण गोळा करणें इ० काम .
०कारभार  पु. १ बायकी कारभार . २ स्त्रियांचा कारभार ; स्त्रियांचीं कृत्यें . ३ ( निंदेनें ) भिकार , मूर्खपणाचीं कृत्यें ; दुबळीं कृत्यें .
०खळी वि.  ( गो . ) विधवा झालेली .
०खांड  स्त्री. स्त्रियांस लाववयाचा रांड , बाजारबसवी , बटीक इ० अर्थाचा अभद्र शब्द , शिवी . मी त्याची कांहीं गोष्ट बोलिलें नसतां उगीच मेला मला रांडखांड म्हणतो . [ रांड द्वि . ]
०गळा  पु. १ टिपेचा सूर ; तृतीय सवन . २ बायकी आवाज . [ रांड ]
०गांठ  स्त्री. विशिष्ट आकाराची गांठ ; ढिली गांठ . बाईलगांठ पहा . याच्या उलट पुरुषगांठ . गाणें , गार्‍हाणें - न . पिरपिर ; बायकी कुरकूर ; बायकी विनंति ; रडगाणें . ( क्रि० गाणें ; सांगणें ). रांडगो - पु . ( गो . ) वेश्येचा मुलगा , किंवा विधवेस अनीतीच्या मार्गानें झालेला मुलगा .
०चाल  स्त्री. भित्रेपणा ; नामर्दपणा ; बायकीपणा .
०छंद  पु. रांडीबाजीचा नाद ; रांडेचें व्यसन .
०छंदी वि.  रंडीबाजीची संवय लागलेला ; रांडगा .
०तगादा  पु. ( कुण . ) ( सार्‍याच्या किंवा कर्जाच्या ) पैशाची ( पिठया शिपायानें नव्हे ) कुळकडे सौम्य रीतीनें केलेली मागणी . ह्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास आपणास मुखत्यारी आहे असें कुणबी मानतो . बडग्याच्या विनंतीशिवाय दुसर्‍या कोणत्याहि विनंतीस दाद न देण्याबद्दल हा वर्ग कित्येक पिढया प्रसिध्द आहे . कुणबी पहा .
०पण  न. १ ( कों . ) वैधव्य . २ नाश ; नादानपणा . कां घेतां रांडपण ठरून भाऊ नाना । - ऐपो ११६ .
०पाटा  पु. वैधव्य . ( क्रि० भोगणें ; येणें ; मिळणें ; प्राप्त होणें ; कपाळीं येणें ). [ रांड + पट्ट ]
०पिसा वि.  रांडवेडा ; अतिशय रांडछंदी ; रंडीबाज ; बाईलवेडा ; स्त्रैण .
०पिसें  न. रांडवेड ; रांडेचा नाद .
०पोर  न. १ ( व्यापक ) बायकामुलांसह एखाद्या ठिकाणचे सर्व रहिवासी ; गांवांतल्या बायकापोरांसुध्दां सर्व लोक . आज कथेला झाडून रांडपोर आलें होतें . २ एखाद्याच्या पदरीं असलेलें . बायको , मुलें इ० कुटुंब , खटलें . ३ रंडकीचें मूल . ४ दासीपुत्र ; वेश्यासुत . [ रांड + पोर ] रांडपोर कीं राजपोर - रंडकीचा मुलगा किंवा राजाचा मुलगा हे दोघेहि अनियंत्रित व अशिक्षित असतात ; दोघेहि बेबंद व निर्धास्त असतात .
०पोरें   अनव . घर , गांव , देश यांतील मुख्य कर्त्यापुरुषाहून इतर बायका , मुलें इ० सर्व माणसें .
०बाज वि.  रंडीबाज ; बाहेरख्याली . [ हिं . ]
०बायल  स्त्री. ( गो . ) विधवा स्त्री .
०बेटा  पु. रांडलेक . तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां । - तुगा २९८३ .
०बोडकी  स्त्री. विधवा स्त्री . त्या रांडाबोडकीनें लन्न जुळलन् ‍ । - मोर ११ .
०भांड  स्त्री. ( निंदार्थी ) रंडकी ; बाजारबसवी ; बटीक . [ रांड द्वि . ]
०भांडण  न. १ बायकांचें भांडण . २ ( ल . ) बिन फायदेशीर , निरर्थक गोष्ट .
०भाषण  न. बायकी , नामर्द , दीनवाणें भाषण .
०मस्ती  स्त्री. १ पतिमरणानंतर विधवेस येणारा लठ्ठपणा व जोम . २ ( ल . ) नियंता नाहींसा झाल्याबरोबर एखाद्या माणसास येणारी टवटवी ; चपळाई , धिटाई .
०माणूस  न. १ ( दुर्बलत्व दाखवावयाचें असतां ) स्त्री ; स्त्रीजाति ; स्त्रीमात्र . २ ( तिरस्कारार्थीं ) बुळा , निर्जीव , बायक्या मनुष्य ; भित्रा मनुष्य . [ रांड + माणूस ]
०मामी  स्त्री. ( करुणेनें ) विधवा स्त्री .
०मांस  न. ( निंदार्थी ) पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रियांस एकटें राहतां आल्यामुळें व मोकळेपणामिळाल्यामुळें कधीं कधीं येणारा लठ्ठपणा . ( क्रि० चढणें ; येणें ) [ रांड + मांस ]
०मुंड  स्त्री. १ केशवपन केलेली , अनाथ व अनुकंप्या अशी विधवा . २ ( शिवी ) रांड ; बोडकी ; अकेशा थेरडी ; विधवा . [ रांड + मुंड ]
०रळी  स्त्री. विधवा किंवा विधवेसारखी ; ( व्यापक . ) विधवा . रांडरळी म्हणती हा मेला बरें झालें [ रांड + रळी ]
०रागोळी  स्त्री. ( व्यपक . ) रंडीबाजी व बदफैली . [ रांडद्वि . ]
०रांडोळी  स्त्री. १ विधवा किंवा तिच्या सारखी स्त्री . रांडरळी पहा . २ शिंदळकी . ३ बायकांशीं संगत ठेवणें ; रंडीबाजी .
०रूं  न. विधवा होईल यासाठीं लग्नाच्या वेळीं नवर्‍यानें तिच्या तुर्तदीकरितां दिलेलें वेतन ; बाइलवांटा ; रांडरोटयाची चाल मुख्यत्वें गुजराथेंत आहे . [ हिं . ]
०रोटी  स्त्री. लढाईत पडलेल्या किंवा सरकारकामीं आलेल्या माणसाच्या बायकोस निर्वाहकरितां दिलेली जमीन इ० . [ हिं . ]
०लेंक   ल्योंक - पुन . १ रंडापुत्र ; विधवेचा मुलगा ; एक शिवी . काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका । २ ( व . ) मेलें या शब्दाप्रमाणें वाक्याच्या आरंभीं किंवा मध्यें निरर्थक योजतात . आम्हास नाहीं रांडलोक असं येत !
०वडा  पु. सर्व बायकामाणसें ; घरांत सत्ताधारी पुरुष नसल्यामुळें होणारें स्त्रियांचें प्राधान्य . २ बाजारबसवी , रांड , बटीक इ० शब्दप्रचुर शिव्या ; शिवीगाळ ; गालिप्रदान . ( क्रि० गाणें ; गाजविणें ; ऊठवणें ) किती रांडवडे । घालुनि व्हालरे बापुडे । - तुगा २ . ७४६ . [ रांड + वाडा ]
०वळा  पु. स्त्रियांच्या कडाक्याच्या भांडणांतील शिवी ; रंडकी , रांड , बटकी , बाजारबसवी इ० शिव्यांची माळका . ( क्रि० गाणें ; वाजवणें ). [ रांड + आवलि ]
०वांटा  पु. वैधव्य .
०वांटा   येणें - विधवा होणें .
कपाळीं   येणें - विधवा होणें .
०वाडा  पु. कुंटणखाना ; वेश्यांची आळी .
०व्यसन  न. रांडेचा नाद , छंद .
०व्यसनी वि.  रांडबाज .
०सांध  स्त्री. विधवेचा कोपरा . [ रांड + संधि ]
०सांधीस   घरांत उदास होऊन बसणें ( रागानें एखाद्यास म्हणतात ). रांडक - वि . ( कों . ) विधवा झालेली . सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती . [ रांड ] रांडका - पु . विधुर ; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष . [ रांड ] रांडकी - स्त्री . विधबा . ( तिरस्कार दया दाखवितांना ). [ रांड ] रांडगा - वि . ( राजा , तंजा . ) रंडीबाज . २ - पु . ( बे . ) महार जातीचा बलुतेदार . याला वतन इनाम जमीन असते . याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो . हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो . रांडरूं - न . ( तिरस्कारानें ) विधवा स्त्री . [ रांड ] रांडव - वि . १ रंडकी झालेली ; विधवा ( स्त्री ). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला ; मृतपत्नीक ; विधुर . [ रांड ] रांडवणें - अक्रि . विधवा होणें ; रांडावणें पहा . [ रांड ] रांडवा - स्त्री . विधवा स्त्री . रांडवा केलें काजळ कुंकूं । - एभा ११ . ९६६ . रांडा पोरें - नअव . १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें ( बायका , मुलें व कुणबिणी ). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक .
बसणें   घरांत उदास होऊन बसणें ( रागानें एखाद्यास म्हणतात ). रांडक - वि . ( कों . ) विधवा झालेली . सडा मफलीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती . [ रांड ] रांडका - पु . विधुर ; ज्याची बायको मेली आहे असा पुरुष . [ रांड ] रांडकी - स्त्री . विधबा . ( तिरस्कार दया दाखवितांना ). [ रांड ] रांडगा - वि . ( राजा , तंजा . ) रंडीबाज . २ - पु . ( बे . ) महार जातीचा बलुतेदार . याला वतन इनाम जमीन असते . याचा हक्क कर्णाटकांतील लक्ष्मीच्या जत्रेंत रेडा मारण्याचा असतो . हल्लीं ह्या शब्दास अपभ्रष्टता येऊन तो शिवीदाखल योजिला जातो . रांडरूं - न . ( तिरस्कारानें ) विधवा स्त्री . [ रांड ] रांडव - वि . १ रंडकी झालेली ; विधवा ( स्त्री ). २ बायकोच्या मरणानें उघडा झालेला ; मृतपत्नीक ; विधुर . [ रांड ] रांडवणें - अक्रि . विधवा होणें ; रांडावणें पहा . [ रांड ] रांडवा - स्त्री . विधवा स्त्री . रांडवा केलें काजळ कुंकूं । - एभा ११ . ९६६ . रांडा पोरें - नअव . १ कुटुंबांतील कनिष्ठ दर्जाचीं माणसें ( बायका , मुलें व कुणबिणी ). २ समाजांतील हलक्या दर्जाचे लोक .
०रोटा  पु. विधवांनीं करावयाचें सामान्य आडकाम . ( दळण , कांडण , मोल मजुरी इ० ). रांडाव - वि . ( गो . ) विधवा . रांडावणें - अक्रि . १ विधवापणाच्या केविलवाण्या स्थितीस प्राप्त होणें . २ ( ल . ) फिसकटणें ; मोडावणें ; नासणें ; बिघडणें ; भंग पावणें ( व्यापार , मसलत , काम ) ( विशेषतः या लाक्षणिक अर्थानेंच हा शब्द योजतात ). त्याणीं मागें संसार चांगला थाटला होता पण थोरला भाऊ मेल्यापासून रांडावला . [ रांड ] रांडावा - स्त्री . ( माण . ) बालविधवा ; बालरांड . रांडरांड - स्त्री . १ रंडक्यांतली रंडकी ; अतिशय अनाथ व असहाय रंडकी . २ ( ल . ) नामर्द , बुळा , अपात्र , नालायक , मनुष्य . ३ पराकाष्ठेचा अनाथ किंवा निराधार मनुष्य . रांडुल - स्त्री . ( गो . ) ( अनीतीच्या मार्गानें ) विधवेस झालेला मुलगी . रांडूल - स्त्री . ( कों . ) विधवा स्त्रीला उपहासानें म्हणतात . रांडे - उद्गा . एक शिवी . भांडे तृष्णेसीं द्विज भारार्त , म्हणे यथेष्ट घे रांडे ! - मोअश्व ६ . ७५ . [ रांड , संबोधन ] रांडेचा - वि . रांडलोक . - उद्गा . आश्चर्यवाचक उद्गार . अग रांडेचें ! पांच वर्षांचें पोर पहा किंग कशी पोथी वाचतो . रांडेचा आजार - पु . गर्मी . रांडेच्या - उद्गा . ( प्रेमळ ) एक शिवी . आहा रांडेच्या ! ... - देप ६२ . रांडोळी - स्त्री . १ ( करुणेनें , तिरस्कारानें ) विधवा स्त्री . २ विधवेप्रमाणें वागणूक . ३ कुचाळी , थट्टा . करितां गोपिकांसी रांडोळी । - एभा ६ . ३६५ . ४ मारामारी ; कत्तल . निकरा जाईल रांडोळी । - एरुस्व ६ . ९ . ५ क्रीडा . ६ नाश . कीं भीष्मदेवें चरणातळीं । केली कामाची रांडोळी । - जै २४ . ७ [ रांड ] रांडया , रांडया राऊजी , रांडया राघोजी - वि . १ रंडीबाज ; रांडव्यसनी ; रांडछंदी . २ बायक्या ; बाइल्या ; नामर्द . ३ बाईलवेडा . ४ रांडयाराघोबा , रांडयारावजी , बायकांत बसून किंवा त्यांजबरोबर फिरून गप्पा मारण्यांत आनंद मानणारा ( मनुष्य ); गप्पीदास ; चुलमावसा . म्ह० रांडया रावजी आणि बोडक्या भावजी . [ रांड ] रांढरुं , रांढूं - न . ( तिरस्कारार्थी ) विधवा स्त्री . रांडरू पहा . [ रांड ]
 f  A widow; a courtezan.

Related Words

आज घोवा, फाल्या रांड   आडव्या सुडक्याची बायको-रांड   आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद   आपुण रांड शिनाळें जाल्यार भावाबायले पातयेना   आयूची व्होंकॉल, फाल्या रांड   एका कानावर पगडी, घरी रांड उघडी   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   घरच्यानें म्‍हटले भांड, जनानें म्‍हणावें रांड   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   घोवानं म्‍हटली रांड आनि जग म्‍हणतां सांड   घोवानं रांड म्‍हळ्यार कांकणकार सांड म्‍हणता   नातेकी रांड, गोदका छोरा, वालूकी भीत और बहमी बोरा ,ये किसीकू निहाल नहीं करते   भांड-रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा   मेल्या, तुझी रांड हो   रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली   रांड ना पोर, जिवाला घोर   रांड बायलेक सतरा घोव   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा   रांड-रांड गार्‍हाणें   रांडेहून रांड   रावांच्या कानावर पगडी अन् घरीं रांड उघडी   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड-हेळसांड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

wrongfully concealing

 • स्त्री. दोषपूर्ण रीतीने लपवणूक 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

vastudoshavar udakshant ha paryay ahe ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.