Dictionaries | References

See also:  YA
y
y The twenty-sixth consonant, corresponding with Y initial. This letter is much used by the vulgar after the termination of verbs in the first and third persons of the present tense; as मी देतोंय, हा जातोय for मी देतों or देतोंहें and हा जातो or जातोहे. It is further used by the vulgar in the place of ए, as यक्का for एक्का, and in other derivatives and compounds of एक. See notice under येक. It is also a form of contraction for ही Also or even; as तोय गेला, हाय आला, तेव्हांय मींच होतों आतांय मींच आहें. This emphatic use is not vulgar.
व्यंजनमालेंतील सव्विसावें अक्षर . अक्षरविकास :- या वर्णाची पहिली व दुसरी अवस्था अशोकच्या गिरनार लेखांत आडळते . दुसर्‍या अवस्थेंतील य लेखणी न उचलतां काढला तर तिसर्‍या अवस्थेंतील य निघतो . ही अवस्था कुशानवंशी राजांच्या वेळच्या ( इ . स . १ लें आणि दुसरें शतक ) मथुरा येथील लेखांत र्य्य किंवा स्य या जोडाक्षरांतून दिसून येते , शेवटची अवस्था इ . स . ५८८ मधील महानामाच्या बुद्धगया येथील लेखांत पहावी आपण आज लिहितों तसा य ११ व्या शतकांतील उज्जनीच्या लेखांत लिहिलेला आहे . - ज्ञाको ( य ) १ . हा वर्ण गांवढळ लोकांच्या बोलींत वर्तमानकाळाच्या प्रथम व तृतीय पुरुषाच्या एकवचनाच्या रुपांना जोडलेला आढळतो . उदा० मी जातोंय ; हा जातोय ; मी देतोय ( देतों , देत आहे ). त्याचप्रमाणें एच्या ठिकाणींही य असा उच्चार आलेला त्यांच्या बोलींत आढळतो . उदा० यक्का , येक . यचा हि सुद्धां , अशा अर्थी शिष्ट भाषेंत उपयोग केलेला आढळतो . उदा० तेव्हांय मीच होतों आतांय मीच आहें . अधिक महिनाय आला आहे . - सागोप्र ३ . १ .
The twenty-sixth consonant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP