-
स्त्री. १ ऐकणें ; श्रवण ; ऐकण्याची क्रिया . २ श्रवणेंद्रिय ; कान . शकुने पुरुषोक्तीनें भ्याल्या श्रुति कांपतील न सुयाते । - मोसभा ४ . ६० . ३ वेद . जे श्रुतित्रयातें जाणोनि । शतवरी यज्ञ करूनि । - ज्ञा ९ . १३० . मळे कलियुगी श्रुती । - केका ९६ . ४ वार्ता ; बातमी ; आवई . ५ ( संगीत ) स्वर ; अखंड ; स्पष्ट व मधुर या गुणांनी युक्त गायनोपयोगी नाद . या श्रुती २२ आहेत त्याः - तीव्र ; कुमुद्रती , मंदा , छंदोवती , दयावती , रंजनी , रक्तिका , रौद्री , क्रोधा , वज्रिका , प्रसारणी , प्रीति , मार्जनी , क्षिती , रक्ता , संदीपनी , आलापनी , मंदती , रोहिणी , रम्या , उग्रा , क्षोभिणी . ६ काटकोन त्रिकोणाचा कर्ण . ७ ( अर्थ दोननरून ल . ) आधार ; शासन ; नियम . परंतु या गोष्टीस कांही श्रुति आहे ? ८ वीणा . गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग । - तुगा २६५८ . [ सं . श्रु = ऐकणें ] कटु - वि . कर्णकटु ; कानाला न सोसणारें ; कर्कश ; बेसूर .
-
०पथ पु. श्रवणमार्ग ; कर्णरंध्र ; कान .
-
f Hearing. The organ of hearing. The Vedas severally. Rumour.
-
०मत वि. १ वेदमान्य . २ कर्णमधुर . श्रुतिमत यनिष्ठ जेघि सुरचरग । - मोआदि १ . २ .
Site Search
Input language: