TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

दान

ना.  इनाम , दक्षिणा , देणगी , पारितोषिक , पुरस्कार , बक्षीस .
 स्त्री. ( व . ) रस्ता ; चाकोरी .
 न. देणगी ; साम , दान , दंड , भेद या उपाय चतुष्टांतील शत्रुस धन वगैरे देऊन संतुष्ठ करण्याचा मार्ग . - अवदान . ( सं .) दाम पहा .
 न. १ देणे ; देण्याची क्रिया ; धर्मादाय ; बक्षीस , देणगी देणे . ( समासांत ) विद्यादान - धनदान - कन्यादान इ० २ ( कायदा ) कांही मोबदला न घेतां एखाद्याने दुसर्‍यास आपली स्थावर किंवा जंगम जिनगी , मिळकत फुकट , धर्मार्थ देऊन टाकण्याचा व्यवहार . - घका ३६ . ३ ( सामा . ) स्वतःच्या मालकीची वस्तु दुसर्‍यास निरपेक्ष बुद्धीने देणे ; देणगी ; बक्षीस ; धर्मदाय . ४ ( सोंगट्यांच्या खेळांत ) फासे घरंगळते जमीनीवर टाकून ते स्थिर झाल्यावर त्यांच्या वरील पृष्ठभागांवर दिसणार्‍या ठिपक्यांची संख्या ; डाव . जसेः - पवबारा तेरा , छ तीन नऊ , दस दोन बारा इ० ( क्रि० पडणे ; देणे ). ५ माजलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारा मद . [ सं . ] म्ह ० ( गो . ) दानावर दक्षिणा = दक्षिणेवांचून दानाची सांगता होत नसते त्यावरुन मोठ्या नुकसानीच्या भरीस आणखी थोडेसे नुकसान झाल्यास ही म्हण योजतात . सामाशब्द -
०धर्म  पु. ( व्यापक ). पुण्यप्राप्त्यर्थ केलेले दान ; ब्राह्मणभोजन , विहिरी खणणे , धर्मशाळा , देवळे बांधणे इ० परोपकाराची धार्मिक कृत्ये ; परोपकारार्थ केलेले द्रव्यव्यय ; दान देण्याचे धर्मकृत्य . [ दान + धर्म ]
०पत्र  न. देणगीपत्र ; देणगीखत ; जमीन इ० कांचे दान केले असतां ते चालावे म्हणून दाखल्यासाठी करुन दिलेले पत्र , सनद . दानपत्र धरिले महानुभावे । - दावि ४२७ . [ दान + पत्र = कागद ]
०पात्र वि.  विद्या , तप इ० गुणांमुळे दान देण्यास योग्य असलेला ( ब्राह्मण , मनुष्य ). [ दान + सं . पात्र = भांडे ; ( ल . ) योग्य स्थान ]
०प्रतिभू  पु. ( कायदा ) विकलेल्या मालाबद्दल , कर्जाऊ उसनवार दिलेल्या पैशाबद्दल ठेवावयाचा जामीन ; मालजामीन पहा . [ दान + प्रतिभू = जामीन ]
०विधि  पु. १ दान करण्याचा , देण्याचा विधि . २ कर्ज द्यावे की देऊ नये यासंबंधी विचार . दानविधि व अदानविधि हे दोन प्रकार धनकोसंबंधी होत . - ज्ञाको ( क ) १११ . [ दान + विधी ]
०वीर वि.  सढळ हातान दान करणारा ; दान देण्यांत उत्साही ; कर्णासारखा उदार . [ दान + वीर ]
०शील वि.  दानधर्माकडे मनाचा कल , प्रवृत्ति असलेला . [ दान + शील = स्वभाव ]
०शूर वि.  दान देण्यांत शूर , उत्साही ; दानवीर . दानाध्यक्ष पु . दानधर्मखात्यावरील मुख्य अंमलदार . [ दान + अध्यक्ष ]
n.  पारावत देवों में से एक ।
  A gift, a donation; giving.

Related Words

अर्थीं दान महापुण्य   आकुळ्ळेलि गायि आप्पा भट्टाक दान   आदळून जेवण, किळचून दान   आरडून दान, किंचाळून भोजन   कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा   कवड्यांचे दान वांटले, गांवांत नगारे वाजले   गोठणीच्या गाई, माभळभट (बाळ्या) दान देई   चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी   जसें दान, तसें पुण्य   तीळ दान देणें   दे दान, सुटे गिराण   देल्लं दान, मागे मुसलमान   दान II.   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   दान मेळळले गायिचे दांत चोवप आस्स वे?   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   नगदी दान व कागदी मान   पुण्याई देणें-दान करणें   पात्र पाहोन दान करावें   मरी गाय बम्हनको दान   मेरी-मेरी गाय बह्मनको दान   म्हातारी गाय ब्राह्मणाला दान   महापुण्य-तुरुत दान महापुण्य   मायची जिंदगी जावय दान दिता   याचना-याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं   लेजेदे दान लेजेदे प्राण   लेजे दान की दीजे प्राण   लोकाच्या गायी, माभळभट दान देई   सत्पात्रीं दान महापुण्य   साम-साम, दाम [ दान ], दंड व भेद   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

plasma jet

  • प्लाझ्मा जेट 
  • आयनायु फवारा 
RANDOM WORD

Did you know?

मृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.