Dictionaries | References

ऋण

Debt. Three departments of man's debt are reckoned, viz. देवऋण, ऋषिऋण, पितृऋण, q. v. in loc. To these some add मनुष्यऋण. 2 In arithmetic. The subtrahend. 3 In algebra. Negative quantity, minus.
कर्ज ; देणें ; रीण ; परत द्यावयाच्या बोलीनें ( सव्याज किंवा तसेंच ) घेतलेलें द्रव्य , इ० .
( ल . ) उपकार ; माणसाला पुढील तीन ऋणें असतात असें समजलें जातें - देवऋण ; ऋषिऋण ; पितृऋण ; कोणी मनुष्यऋण असें चौथें ऋण मानितात . ऋणत्रय पहा . हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें । - एभा २३ . ४५२ . ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी । - तुगा १० .
( अंकगणित ) बाद किंवा वजा करावयाचा अंक , रक्कम .
( बीजगणित ) वजाबाकीचें चिन्ह ; उणें चिन्ह ; उणी संख्या ; वजा करावयाची संख्या ; याच्या उलट धन .
( पदार्थविज्ञान ) विजेचा एक प्रकार ; ( इं . ) ( निगेटिव्ह ) अपसारक विद्युत ; धनविद्युतच्या उलट ऋणविद्युत ; जवळ असलेल्या दोन पदार्थांपैकीं एकावर ऋणवीज असेल तर दुसर्‍यावर धनवीज उत्पन्न होते . [ सं . ]
०करणें   
कर्ज काढणें .
कर्ज करणें .
०काढणें   कर्ज काढणें .
०फिटणें   कर्जमुक्त होणें ; उपकाराची फेड होणें . मेलों रणांत म्हणजे तुमचें याचेंहि सर्व ऋण फिटलें । - मोभीष्म ११ . ७४ . म्ह०१ ऋण काढून सण करणें = अनुकूलता नसतांहि उसन्या पैशांवर लौकिक , हौस संभाळणें .
ऋणं कृत्वा घृतं पिबेत = प्रसिद्ध नास्तिकाग्रणी चार्वाक याच्या नांवानें प्रसिद्ध असलेल्या पुढील श्लोकांत हा चरण आहे . यावज्जीवं सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : । ( अर्थ - जीवांत जीव आहे तोंपर्यंत चैन करावी ऋण काढून तूप प्यावें . कारण या देहाचा भरंवसा काय ? जळून गेलेला देह पुन्हां मिळत नाहीं ).
०करी वि.  
कर्ज देणारा ; सावकार ; उत्तमर्ण .
कर्ज घेणारा ; देणेदार ; ऋणको ; अधमर्ण .
ज्यापासून कांहीं उपयोग नाहीं पण ज्याला उगीच पोसावें लागतें असा , कुचकामाचा माणूस ; आळशी , आयत खाऊ अशास निंदेनें म्हणतात .
ज्याच्याकडून आपल्याला नेहमीं मदत होते व जो सारखा आपल्यावर कृपा करीत असतो अशा माणसास कृतज्ञतादर्शक बुद्धीनें म्हणतात .
०ग्रस्त वि.  कर्जबाजारी ; कर्जांत बुडालेला .
०घातकी वि.  ( ना . ) अवसानघातकी ; ऐन वेळेवर मागें घेणारा .
०चिन्ह  न. ( गणित ) उणें चिन्ह , ( - ) ऋण अर्थ ३ पहा .
०त्रय  न. देवऋण , पितृऋण , ऋषिऋण ; ऋण अर्थ १ पहा . मी ऋणत्रयापासून त्रिशुद्धि । मुक्त झालों भगवंता । प्राचीन ग्रंथांतून ऋणत्रयाची कल्पना आढळते . - टि ४ . १४८ .
०दार वि.  देणेदार ; ऋणकरी ; ऋणकरी अर्थ २ व ३ पहा .
०धन  न. 
कर्जाऊ , उसना घेतलेला पैसा .
उणें अधिक चिन्ह .
०ध्रुव  पु. ( पदार्थ विज्ञान . ) ( चुंबकाच्या किंवा विजेच्या ) दोन टोकांपैकीं एक टोंक . ( इं . ) निगेटिव्ह पोल ; कॅथोड याच्या उलट .
०पद  न. वजा करावयाचा राशि , पद ; ऋण अर्थ ३ पहा .
०बंध   बंधन - पुन . कर्जाचें बंधन ; कर्जाची अटक ; कर्जाचा जाच .
०बद्ध वि.  कर्जानें बांधला गेलेला ; ऋणग्रस्त .
०मुक्त वि.  कर्जमुक्त झालेला ; अऋणी .
०मुक्ति   मोक्ष मोचन शोधन - स्त्री . पुन . कर्जाची फेड ; कर्जाचें वारण ; कर्ज देऊन टाकणें .
०मोचित वि.  
ऋणमुक्त .
( कायदा ) धनकोनें कर्ज निवारिलें असतां जो धनकोचा नोकर होतो तो .
०वई   पणा - वि . पु . ऋणी ; ऋणीपणा . निळा म्हणे ऋणवईपणा । होतसां नारायणा उत्तीर्ण । - निगा १९० . - नागा ६३५ .
०विद्युत  स्त्री. विजेचा एक प्रकार . ( इं . ) निगेटिव्ह इलेकट्रिसिटी ; ऋण अर्थ ४ पहा . याच्या उलट धनविद्युत .
०हर्ता वि.  ( ऋण फेडणारा . ) परमेश्वराचें एक विशेषण . ख्रिस्ती वाडमयांत प्रयोग .
  Debt. (In alg.) The negative sign or quantity, minus.
ऋण काढून सण करणे   Incur the pressure of debt, and then squander the loan in wild holidaykeeping.
ऋणं कृत्वा घृतं पिबेत्   This famous dictum of चार्वाक bears nearly the same meaning.
  Negative-electricity.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.