श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


श्रीगणेशायनमः ॥ श्रोतेऐकहोसादर ॥ पुढीलकर्थचाप्रकर ॥ वरिष्टमुनीश्रीशंकर ॥ कथा सांगताआदरें ॥१॥

जेव्हांतोदानवकुकूर ॥ होउनीयाकामातुर ॥ अनुभूतीचेंस्पशिलेंशरीर ॥ तेव्हां मंगलेध्यानसतीचें ॥२॥

नेत्रउघडोनपाहेसुंदर ॥ तवपुढेंउभादानवक्रूर ॥ देखोनीदोर्धेंबोलेसत्वर ॥ कोणरेदुष्टातूंयेथे ॥३॥

किमर्थ येथें आलासी ॥ पापवासनामनींधरसी ॥ माझें व्रतभंगुइच्छिसी ॥ कोण तुआहेसीरेदुर्जना ॥४॥

ऐसीबोललीजेव्हांसती ॥ तेव्हांतोकुःकुरदुर्मती ॥ प्रसन्नमुख्करोनीदंतपंक्ती ॥ विचकोनहासैखदखदा ॥५॥

मगम्हणेमीदानवनाथ ॥ कुकूरनामे अतीविख्यात ॥ मृगयार्थफिरता यावनांत ॥ तुझेजवळीपातलीं ॥६॥

तुझेंसुदंररूपपाहोनी ॥ कामातुरमीझालोंमनीं ॥ तुजप्रार्थितोंहात जोडूनी ॥ वचनमाझेंऐकावें ॥७॥

जेंतपकरोनीपावेलपळ ॥ तेंमजसवेपावसीसकळा ॥ चालमाझीया गृहासीकेवळ भार्याहोईतुंमाझी ॥८॥

ऐसेंऐकोनीदुष्टवचनासीं ॥ सतीगडबडलीमानसीं ॥ काय करावेंहेंनसुचेतिसी ॥ चिंतातुर बहुझाली ॥९॥

हातरी असे दुर्जनकर ॥ करिलयेथें बलात्कार ॥ तरीशाप देउनीसत्वर ॥ जाळुनीभस्मकरावा ॥१०॥

तरीहोईलतपोनाश ॥ कष्टेजोडिलेंजयास ॥ क्रोधासवे कामलोभास ॥ थाराहोइल अंतरीं ॥११॥

कामकोधलोभवेरी ॥ यांनी चघातलेमजसुंसारीं ॥ चोण्यांशी लक्षयोनभितिंरीं ॥ पुनः पुन्हांपाडिती ॥१२॥

जन्ममरणाच्या आवृत्ती ॥ मागेंझाल्यानेणेंकिती ॥ पुढेंहोतीलयाचीगणतीं ॥ कोणकरीलनेणवे ॥१३॥

जरीमीशांतीधस्नराहीन ॥ तरीहाअनर्थकरील दुर्जन ॥ कैंसेहोइलयाचेंशमन ॥ कायविचारकरावा ॥१४॥

तोंतात्काळस्फुरलेंतिचेंअंतरीं ॥ कासया चिंतापाहिजेतरी ॥ जगन्मातापरमेश्वरी ॥ शिरावरीउभीअसे ॥१५॥

जीभक्तकामकल्पलता ॥ जीकधीं नुपेक्षीभक्ता ॥ ज्याचेंस्मरणमत्रिचीतत्त्वचा ॥ भवसिंधुउतरोनीबहुगेले ॥१६॥

जिचेंनामदुःखच्छेदक ॥ जिचेंनामसौख्यदायक ॥ जिच्यानामाचेधारक ॥ होतीतारकजडजीवा ॥१७॥

ऐसेंस्फुरतांच अंतरीं ॥ महणेधावेगेत्रिपुरसुंदरी ॥ जगन्मातेविश्वोदरी ॥ तुजविणकैवारीकोणीनसे ॥१८॥

ऐसेंतिनेस्मरतांच बरवी ॥ प्रगटझालीत्वरितादेवी ॥ सवेयोगिनीवृंदमिरवी ॥ चामुंडागणासमवेत ॥१९॥

भूतवेताळ कंकाळ ॥ पिशाचभैरवक्षेत्रपाळ ॥ याचासमुदायघेउनीसकळ ॥ निकटपातलीजगदंबा ॥२०॥

गण परिवारयुक्त ॥ सैन्यदिसे अदभुत ॥ एकपादत्रिपादचतुष्पादयुक्त ॥ भयंकरवदनेंदिसती ॥२१॥

सचीमुखव्याघ्रमुख ॥ खरमुखसिंव्हमुख ॥ उष्ट्रवानरजंबुकमुख ॥ मेषमुखएकदिसती ॥२२॥

खंगपापाण मुसलस्तंभ ॥ द्रुमहलायुधएकस्वंयंभ ॥ संध्यामेउग्रप्रभ ॥ ऐसेगणजिचे असती ॥२३॥

ऐसे आपुले गणासहित ॥ जगन्माताप्रगटलीत्वरीत ॥ बाळसुर्यजैसाउगवत ॥ प्रभाफांकतदशादिशा ॥२४॥

दिव्य सिंव्हावरीआरुढली ॥ स्वर्येभूषणाभूषणझाली ॥ चंद्रसुर्याग्नीनेत्रीभली ॥ शोभुलागलीत्रिनयना ॥२५॥

पूर्णचंद्रचेंमंडळ ॥ तैसेंशोभत मुखकमळ ॥ मस्तकींमुगुटशोभेझळाळ ॥ गगनभेदुनगेलेंदिसे ॥२६॥

अष्टभुजाकारकंकण ॥ अंगुळीमुद्रिकाशोभतीपूर्ण ॥ आयुधेंअष्टहातींधरून ॥ विराजमानजगदंबा ॥२७॥

शूलखंगधनुष्यशर ॥ पाशचर्मअक्षतोमर ॥ तेदुष्टासीभयंकर ॥ अभयकरभक्तासी ॥२८॥

केलेंशुक्ल वस्त्रपरिधान ॥ कंचुकील्यालीजडीतरत्‍न ॥ पायीनूपुरेंकरितीरुणझुण ॥ ठाणमानसाजिरें ॥२९॥

ब्रह्मांडीचेंलावण्यसमग्र ॥ एकवटोनीझालासमुद्र ॥ नगसागराचा अंतपार ॥ कोणासहीजाणवेना ॥३०॥

जिचेंस्वरुपलावण्यसुंदर ॥ वर्णितावाचेसीनेणवेपार ॥ जिचेंबोलमेघगंभीर ॥ कीतेपाझरअमृताचे ॥३१॥

ऐसेंरूपधरूनपाहे ॥ अनूभूतीपुढेंउभीराहे ॥ तिसीबोलतलवलाहे ॥ कांगेस्मरणकेलेंत्वां ॥३२॥

कोणी गांजिलेंसांगमज ॥ कायसंकटपडिलेंतुज ॥ तेंमीनिवारीनसहज ॥ जरीदुष्करइंद्रादिका ॥३३॥

मी आहें तुजप्रसन्न ॥ मागतीतोवरदेइन ॥ भयशोकग्लानीदुःखदारुण ॥ नाशतीमाझ्यादर्शनें ॥३४॥

शंकरम्हणती ऐकमुनी ॥ ऐसेंदेवीचेंबोलणेऐकोनी ॥ अनुभुतीनेंनेत्रउघडोणी ॥ पाहतीझालीतेधवा ॥३५॥

तव पुडःएंदेखिलीविश्वजननी ॥ परमक्ल्याणीभवानी ॥ मगउठोनीतेचक्षणीं ॥ साष्टांगनमनकरीतसे ॥३६॥

नमोनमोजगद्धात्री ॥ नमःशिवाकल्याणकत्रीं ॥ त्वरितामहोग्रातुरजामूर्तीं ॥ सत्वाकृतीतुजनमो ॥३७॥

सत्यरूपाजगन्मोहिनी ॥ जगत्प्रतिष्ठाजगत्प्राणधारणी ॥ षट्‌चक्रभेदकेषटचक्ररुपिणी ॥ मंत्रमार्गप्रवतींनी तुजनमो ॥३८॥

घटस्थाकुंडलीनीबिजरूपिणी ॥ पद्मकिंजल्कवर्णाहरीतवणीं ॥ पद्मस्थापद्मप्रबोध कारिणी ॥ सततनमनतुअसो ॥३९॥

कृष्णाकृष्णवर्णाधूमर्णाधृम्रवर्णा ॥ श्वेताश्वेतरूपालोहितवर्णा ॥ निलाकपिलाकर्पुरवर्णा ॥ अतिसौम्यातुजनमो ॥४०॥

नमोअतिरौद्राशर्वाणी ॥ स्थुलसुक्ष्ममध्यमरूपिणी ॥ कनिष्ठाजघन्याउत्तमाजननी ॥ नमोनमः साष्टांगें ॥४१॥

ब्रह्मांडसप्तावरणबाहेरी ॥ तूंचाससीपारमेंश्वरी ॥ पंचकोसगृहेंच्या अंतरी ॥ तूंच अससीसाश्वत ॥४२॥

ऐसीतूंअंतर्बाह्मास्थित ॥ व्यापकअससी सर्व ॥ भक्तलागीमूर्तिमंत ॥ नमनतुजसाष्ठांग ॥४३॥

सर्वासीअधिष्ट्रानम्हणुनी ॥ व्यापकसससी भवानी ॥ पिंडब्रह्मांडपंचभूताव्यापुनी ॥ तूंचाससीगेमाये ॥४४॥

इंद्रियेआणि अंतःकरण ॥ यासंर्वांचा देवतागण ॥ तन्मात्राअहंकारमहत्वासव्यापुन ॥ अव्यक्तासीपूर्नत्वव्यापिलें ॥४५॥

ऐसें सर्वांस व्यापुन ॥ अपार अससीसचिद्वान ॥ तरीच्याप्यहीतुजवाचुन ॥ पाहतांभिन्ननसेकी ॥४६॥

उत्तमकनिष्ट जघन्य ॥ हेव्याप्यतुझेंरुपसगुण ॥ तरीव्याप्यव्यापकभेदेकरुन ॥ जगन्मयतूंचकीं ॥४७॥

तूंतरीं गुणातीतबाळा ॥ त्रिगुणयोगेंकरीसीलोळा ॥ धर्मासीपाळीसीवाढत्याकळा ॥ अधर्मासीबुडविसी ॥४८॥

शंकरसांगेऋषीप्रती ॥ यापरीतीअनुभती ॥ स्तवितीझालीदेवीप्रिती ॥ जीआदिशाक्तिजगदंबा ॥४९॥

जीउभीआहेसमोर ॥ तिसीकरोनीनमस्कार ॥ दैत्यसीवधावयासत्वर ॥ वरमागततेव्हांती ॥५०॥

अनुभूतीत्वरितादेवीसीम्हणे ॥ मातेमजगांजिलेंयेणें ॥ पातिव्रत्यर्भविलेंदुर्जनें ॥ ध्यानभंगोनीटाकिलें ॥५१॥

येणेंव्रतभंगकेलामाझा ॥ दुष्टहाकुःकूरदैत्यराजा ॥ यासीमारुनटाकी ओजा ॥ चिंतीलेंयास्तव म्यांतुज ॥५२॥

दुष्टहादनवविघ्नकारी ॥ येणेंमजछळीलेंबहुतांपरी ॥ तरीप्रयत्नेंयासीमारी ॥ भक्त वत्सलेजगदंबे ॥५३॥

इतकेंचमागतेंतुज ॥ हेंचीदेईआंबेमज ॥ बरेंम्हणोनीमारीलसहज ॥ त्यादैत्यासी भगवती ॥५४॥

तीकथापुढिलेअध्यायांत ॥ ऐकतुम्हीभाविकभक्त ॥ पांडुरंगजनार्दनविनवीत ॥ आवधानद्यावें आवडी ॥५५॥

तवश्रोतेविचक्षण ॥ संशयघेडनीकरितीप्रश्न ॥ कींअनुभूतीनेंदेवीप्रार्थन ॥ आपुलावृतांतनिवेदिली ॥५६॥

पातीव्रत्यध्यानव्रत ॥ भंगिलेंदुर्जनेंनिश्चीत ॥ तेंऐकोर्नाआमुचेंचित्त ॥ बहुदुःखवलेंयेवेळीं ॥५७॥

जैसाकोणीएकपुरुष ॥ बहुश्रमेंजोडेलेंधनास ॥ तस्करेंयेउनीलुटलें त्यास ॥ मगतीझालादरिद्री ॥५८॥

दरिद्राअलेंजयास ॥ कोणीचनमानितीतयास ॥ तेवीतपोभ्रष्टानुभूतीस ॥ कैसीप्रसन्नदेवीझाली ॥५९॥

तपाविणनपावेदैवत ॥ ऐसेंबोलतीसंतमहंत ॥ तरीमगेंइसीप्रसन्नत्वरिता ॥ कैसीझालीजगदंबा ॥६०॥

आतांऐकायाचेंउत्तर ॥ करुनाअपलेंमन एकाग्र ॥ नाहींभंगिलेंतपसाचार ॥ अधिकचवाढलें ॥६१॥

सांगतोंदृष्टांतदेऊन ॥ कोणीएकतपस्वीब्राह्मण ॥ गंगाजळीकरोनीस्नान ॥ अनुष्ठानकरीतबैसला ॥६२॥

तोअकस्मातशआनयेऊन ॥ त्यासगेलेस्पर्शकरून ॥ मगब्राह्मणहोउनी खिन्न ॥ भ्रष्टलोंमीम्हणतसे ॥६३॥

परीनाहींभ्रष्टलेंब्राह्मणपण ॥ तेणेंकेलेंपुन्हांस्नान ॥ त्यासदोन स्नानेंघडलींम्हणोन ॥ अधिकपुण्यवाढलेंकीं ॥६४॥

तैसेंअनुभूतीनेंभले ॥ अनुतापतिर्थींस्नानकेलें ॥ अतिशयमनासीरोधिलें ॥ अंतरकासेहेतेधवां ॥६५॥

आनंदकोशाचेअंती ॥ सदोदितस्वयंस्नानकेल ॥ तेथेंस्थिरमनोवृत्ती ॥ तन्मयझालीतात्काळ ॥६६॥

ज्योतिरूपब्रह्माकेवळ ॥ सर्वव्यापकातिनिर्मळ ॥ सगुणीस्त्रीरूपधरूनीसोज्वळ ॥ उभेराहिलेतिजपुढे़ ॥६७॥

संकटनासावयाप्रती ॥ धावोनीआलीभक्त म्हणती ॥ ज्ञानीम्हणतीयेंथेंचहोतीं ॥ नसेसर्वगतायेणेंजाण ॥६८॥

आतांअसोहीविश्वामाता ॥ दुष्टासी मारीलसर्वथा ॥ निर्भयकरिलसर्वभुता ॥ सुखअपारदेइल ॥६९॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्री खंडे ॥ तुळजामाहात्मे ॥ शंकरवरिष्ट संवादे ॥ द्वितीयोध्यायः ॥२॥

श्रीजगंदबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP