मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित| यज्ञपत्न्याख्यान वामन पंडित अनुभूतिलेश भागवत रामायण ब्रम्हस्तुति द्वारकाविजय श्रीहरिगीता कर्मतत्व वामनपंडित कृत स्फुट काव्यें नाम सुधा साम्राज्यवामनटीका वेणुसुधा राजयोग मुकुंदविलास ध्यानमाळा प्रियसुधा तत्वमाळा शुकाष्टक स्फूटश्लोक गीतार्णव चरमगुरुमंजरी. वामनचरित्र विश्वास वध दंपत्य चरित्र भरत भाव रुक्मिणी पत्रिका सीता स्वयंवर रामजन्म अहिल्योद्धार लोपामुद्रा संवाद यज्ञपत्न्याख्यान कंसवध रुक्मिणी विलास भामाविलास चित्सुधा गजेंद्र मोक्ष वामन पंडित - यज्ञपत्न्याख्यान कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : poetvaman panditकवीवामन पंडित यज्ञपत्न्याख्यान Translation - भाषांतर सलज्जांची लज्जा हरि परिहरी आशु भजनीं असा गोपी वस्त्रें हरुनि विभु दावी शुभजनीं स्वभक्तां नारीही नर भजति त्याहूनिहि बरा द्विजस्त्री प्रेमें हें स्फुट करिं नमो त्या यदुविरा ॥१॥ ह्नणूनी गोपीची वरद वसनें जे दितिं हरी द्विजस्त्री - भक्तीनें प्रगट दिवसीं त्या करि हरी स्वकांना ते विप्र स्तविति निज - धिक्कार करिती कथाब्धी यामध्यें चतुर चमते तत्त्व मथिती ॥२॥ करुनि नमन कृष्णा तें कथातत्व वाचे कथिन मि गुण कांहीं त्यामधें माधवाचे न भजत हरि झाले नष्ट थोर द्विजाती प्रिय हरि अबळा त्या त्या सुमुक्तीस जाती ॥३॥ अंबरें हरुनियां वरदानें गोपिकांसि दिधली वरदानें धांवले पशुप गोवळ सारे काय हा जन ह्नणे वळ सारे ॥४॥ सिदोर्या न घेतांचि टाकूनि जाती सवें आपुल्याल्या चतुष्पाद जाती मिळाल्या त्वरेनें मृगांकाननातें असे धांवले गोप ते काननातें ॥५॥ हरि बहुत पहाटे दूर गेला वनातें ह्नणउनि पशुपाळीं मांडिलें धांवनातें जसि दिल्ही गमनाऽज्ञा गोपकन्यांसि देवें चहुं कडुनि मिळालीं गोप वृंदें सदैवें ॥६॥ जाय त्यांसह हरी परभारा दावितो द्रुम - शिरीं पर - भारा हे ह्नणे तरु परार्थचि सारे धन्य मानव दयाळु कसा रे ॥७॥ हे परार्थक विलास कळांचें देह भूरुहवरां सकळाचें घे करें वदत हें फळ पानें सेविती पशु तृणें जळपाणें ॥८॥ सभाग्या तरुच्या फळा पल्लवांतें स्वये घ्या वदे येरिती बल्लवांतें कृपायुक्त नम्रावरी हात टाकी बसे त्या स्थळीं भानुकन्या - तटाकीं ॥९॥ असा दूरि टाकूनि वृंदा वनातें हरी पाजुनी धेनु वृंदा वनातें बसे देखुनी पुष्पिता - काननातें गडी सेविती श्री मृगांकाऽननातें ॥१०॥ तेथें क्षुधें करुनि त्यां पशुपालकांनीं हे घातली विनवणी व्रजबाल - कांनीं कीं प्राण आजि अजि भूक हरी हरीते देऊनि अन्न बहु तृप्त करीं हरीते ॥११॥ ह्नणे हरी येथुनि यज्ञशाळा समीप हे जे दिसती विशाळा स्वर्गा निमित्यें यजनें करीती तेथें असे अन्न अनेक रीती ॥१२॥ ह्नणाल आह्मीं पशुपाळ जाती ते श्रेष्ठ शास्त्रज्ञ महा - द्विजाती मागों कसें अन्न तयां द्विजांतें द्यावें परी तें निज पुण्य जातें ॥१३॥ तरी स्वयें जात तुह्मी नसा रे मागा मदाज्ञेंच करुनि सारे कीं नाम माझें मम - अग्रजाचें सांगा तुह्मीं सैन्य समग्र ज्याचें ॥१४॥ निरोप ऐसा पशुपांसि झाला ते मागती अन्न तया द्विजांला कीं येथुनी सन्निध कृष्ण राम आले स्वयें विश्व - मनोऽभिराम ॥१५॥ हे थोर कोण्हीच न यां समान द्यावाच यांच्या वचनासि मान द्या अन्न ऐसें जरि साच वाटे आह्मांस लावा अथवा स्ववाटे ॥१६॥ हें ऐकिलें कीं वसुधाऽमरांनीं न मान्य केलें तरि पामरांनीं नेदूं असें ही परि ते द्विजाती न मागतां गोप निराश जाती ॥१७॥ वृत्तांत ऐसा पशु पालकांनीं निवेदिता घे व्रजवाल कानीं लक्षूनि माया करि मंद हास केला जिणें मोह महा - महास ॥१८॥ बोले पुन्हा हरि तयांप्रति लोक रीती कीं एक यत्न नव्हतां दुसरा करीती प्रार्था अशाचि तुह्मिं जाउनि विप्रदारा त्या अन्न देतिल तुह्मांसि महा - उदारा ॥१९॥ अत्यंत मी प्रिय जयांसि जगन्निवास ज्यांच्या मतीस मज माजि सदा निवास माझ्या कथा बहु रुचीं परिसोनि कानीं ध्यानीं तिही स्तवियेलें मज बायकांनीं ॥२०॥ स्नेह स्वभाव सहज स्वत एव साचा तन्नपि वास मज माजिच मानसाचा तो मी असे जवळि हे परिसोनि वाणी देतील अन्न बहु त्या न करुनि वाणी ॥२१॥ ऐकूनि हे शब्द अगाध वाचे गडी पुन्हा धांवति माधवाचे ते यज्ञ शाळेचमधें द्विजाती तों पत्नि शाळेप्रति गोप जाती ॥२२॥ विप्रस्त्रिया सारुनि पाक सारा ध्याती मुकुंदा जगदेक सारा आलंकृता मौक्तिक - माणिकानीं मनीं मुखीं माधव आणि कानीं ॥२३॥ देखूनियां हे हरिदास त्यांतें नमो ह्नणूनी नमिती सत्यांतें सन्मान देऊनि अनेक रीती आला हरी हे श्रुत ते करीती ॥२४॥ द्विजांच्या पल्या हो वचन वदतों हें मनिंधरा तुह्मीं प्रेमें चित्तीं स्मरत असतां ज्या गिरिधरा स्वयें आला आहे बहुत जवळी येथुनि हरी तया द्या अन्नें जो स्वजन - जठराग्रीं परिहरी ॥२५॥ ऐकतां निकट आगमनातें नावरेच अनुराग मनातें अन्न षड्रस चतुर्विध जाती घेउनी हरिस सन्निध जाती ॥२६॥ समुद्रातें उच्च - स्थळिं हुनि मिळों जाति सरिता सुखाब्धीतें जाती त्वरितचि तशा प्रेम भरिता पिता पुत्र भ्राता जिस तिस निवारी निजपती तर्ही गेल्या तेथें पशु पजन - युक्त व्रजपती ॥२७॥ गडी गाती कीर्ती स्तविति वडिला बंधुस बळा पहाती ते दृष्टीं करुनि अबळा भाग्य सबळा तटीं कालिंदीच्य सुललित - अशोक द्रुम - वनीं स्व गोपाळांमध्यें करि पदरजें धन्य अवनी ॥२८॥ ऐकोनि जो स्व त्दृदयांतचि रेखिला हो प्रत्यक्ष तोचि नयनीं हरि देखिला हो आलंगिला निजमनें प्रभु त्या सत्यानीं केलें तया उपरि वंदन त्यास त्यानीं ॥२९॥ श्रुतिसहि वदवेना जो त्दृषीकेश वाचे पुसिति कुरळ केशीं पाय त्या केशवाचे चरण कमल - युग्मीं शामला भृंग माला मिरविति सुख तेव्हां स्थावरा जंगमाला ॥३०॥ हरी ह्नणे कीं तुह्मिं विप्रदारा महा - सभाग्या परमा उदारा पहावया पातलि याच मातें अलभ्य जो मी त्रिदशोत्तमातें ॥३१॥ जडा अनर्थात समान साचा जो अर्थ तो मी प्रिय - मानसाचा सर्वासही गोडचि वाटलों कीं प्रीतीस ही एकचि वाट लोकीं ॥३२॥ स्वयें स्वात्मा तोहा हरि ह्नणुनि या पावन कळे न घेती भक्तीचा परम निज सद्भाव न कळे स्वभक्ती मुक्तीचे विरजण न नामीं प्रियपणा विलंबें सिद्धीची उडवि रुचि ते भक्ति कृपणा ॥३३॥ अशा प्रियातें पुरुषोत्तमातें पहावयां पातलियाच मातें हे युक्ति कीं मी प्रिय मानसाचा सर्वा प्रिया माजि समान साचा ॥३४॥ तनु - धन - विषयांचा सर्व जो जो पसारा अनृतचि परि माझा त्यामधें व्याप सारा लहरिहि तृषितातें गोड ते जीवनानें प्रिय सकळाहि केले म्यां जग ज्जीवनानें ॥३५॥ प्रियें सारीं जेणें प्रिय परम तो वो स्वभजनीं असा मी त्या मातें तुह्मिं गवसिलें प्रेमभजनीं असें जें हें केलें बहु उचित वाटे मज परी पती जेथें तेथें गमन करणें एतदुपरी ॥३६॥ तुह्मीं जावें जेथें स्व पति करिती देवयजन स्त्रियांच्या योगें तें करितिल समाप्ती द्विजजन सुखाच्या त्या गोष्टी वदत सुख दे श्रीहरि परी बहु क्लेशी झाल्या गमन वदला जें तदुपरीं ॥३७॥ बहु क्लेशी झाल्या श्रवणिं पडतां हें द्विजसत्या जळातें नेत्रांच्या पुसुनि वदति श्रीपतिस त्या अहा हा देवा तूं परम - करुणा सागर हरी तयाही मध्यें हें नवल उठिली क्रूर लहरी ॥३८॥ हे शब्द योग्य न तुतें पुरुषोत्तमातें मिथ्या नको करुं तुझ्या निगमाऽगमात्तें वायां न जाय निज भक्ति असी स्ववाणी साची करुनि न करी करुणेसि वाणी ॥३९॥ पदापासीं आलों चरणरज निर्माल्य तुळसी धराया माथां जे ढकलिसि पदें तें अतुळसी परी पुत्र भ्राते सुत्दृदजन लंघूनि सकळां निघालों त्या आह्मां गति न तुज वांचूनि विकळां ॥४०॥ अंगी करील न पती न पिता न बंधु आह्मांसि तूंचि गति यावरि दीन बंधु ज्याच्या पदाजवळि लोकुनिया प्रकारें द्यावें न अंतर तयां अजि निर्विकारें ॥४१॥ पद जयांसि तुझें परमा - गती त्यजिसि त्यांसि अतः पर मागती वदसि यावरि शब्द झणी असा ह्नण पदाजवळीच तुम्हीं असा ॥४२॥ करुनि हास्य ह्नणे हरि कांपती त्यजिति सर्व तुह्मांसचि कांपतीधुवुनि ते तुमच्या पदपंकजा पितिल तो अति पार न पंक ज्या ॥४३॥ किमपि दोष तुह्मांसि कदापि ते पति न लाविति आणि सखे पिते सकळ ते सह बंधु सहोदर स्मरति हे तुमचा गुण सागर ॥४४॥ अहो तुमचिया द्विजां सुकृतपुण्यसांटा किती तुह्मांसि सुर वंदिती नभिंहुनी फूलें टाकिती ह्नणोनि तुह्मिं जा गृहा त्यजुनि शीघ्र या आग्रहा ह्नणे तुम्हिं करा मनीं स्वपद भक्तिच्या संग्रहा ॥४५॥ घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगें न साधे तसी माझिया अंग - संगें मनीं ध्या मला शीघ्र पावाल मातें स्मरा अंतरीं सर्व सर्वोत्तमातें ॥४६॥ शुक ह्नणे हरिची असि वैखरी द्विज सत्या मनिं मानुनियां खरी परतल्या अवघ्या स्वसुखालया अशन अर्पुनियां स्वसुखालया ॥४७॥ द्विज न ले शहि वाइट वाटती परम सादर त्यांसिच मानिती दिधलि सद्य जिला परमा गती स्मरति तीसचि मागुति मागुती ॥४८॥ जातां हरी जवळि एक सती पतीतें जें सांपडे हरि मनींच समीप तीतें ध्यानीं दिसे तनुं सुटे सह लिंग देहा सारुप्य मोक्ष निज तीस मुकुंद देहा ॥४९॥ देखूनि कृष्णपदभक्तिचिया प्रतापा स्वाऽन्याय आठविति पावति विप्र तापा धन्यत्व वर्णिति तया अबळा - जनांचें सान्निध्य ज्यांसि घडलें भवभंजनाचें ॥५०॥ शुक ह्नणे द्विज ते अनुतापले स्मरति जे अपराधहि आपले स्तविति आपुलिया अबळाजना जिहिं सदन्न दिल्हें भव भंजना ॥५१॥ श्रीकांत - भक्ति अवलोकुनि त्या सत्यांची ते वाटली परम सन्मति त्यांस त्यांची यालागिं वानिति अशा अबळापणातें धिक्कारिती निज गुणासह आपणातें ॥५२॥ विश्वंभर त्रिभुवनेश्वर विश्व - पाळी तो मागतो ह्नणुनियां स्फुट धेनुपाळीं सांगीतलें तरि तया दिधलें न कांहीं तें अन्न नेउनि दिल्हें निज - बायकांहीं ॥५३॥ आह्मीं गुरु सर्व - दिनां द्विजाती दाऊं जनां मार्ग तसेचि जाती ऐशा सहीते करिते भ्रमाया तया हरीची तखे न माया ॥५४॥ माया असी ह्नणुनी जें वदतों जनातें तेही नसो समजलों भवभंजनातें मायापती सहि करी भ्रम विष्णुमाया जीवित्व जी करुनि तोचि धरी रमाया ॥५५॥ पहा हो नारीचें हरिचरण - पद्म - प्रियपण द्विजां आह्मां नाहीं पढत पशु जे मूर्ख कृपण अहो ज्या सद्धावें जनन - मरणाचा उपरम स्त्रियांच्या ठांई तो द्विज ह्नणति आश्चर्य परम ॥५६॥ ज्या अंगना कधिं न आचरल्या तपातें सोसूनि ही परम वर्ष हिमाऽतपातें लावी न ज्यांस निज अद्वय - लाभ - वार्ता जे मुक्ति मार्ग - पद दाखवितो भवार्ता ॥५७॥ संसार तो द्विजपणीं अबळांसि नाहीं ज्याला नसे गुरुपणीं सदुपासना ही ऐशा ही भक्ति पद अंबुजपाणिजीची आह्मां अशा द्विजवरांसहि वाणि जीची ॥५८॥ पुरुष ते भजती अबळाजना स्मरत वामन त्या भवभंजना ह्नणतसे कमलापुरुषा त्वरें मनिं धरील तया पुरुषत्व रे N/A References : N/A Last Updated : July 04, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP