ध्यानमाळा

’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.


वंदूनियां जलधिजा - पतिच्या पदोंतें

वर्णीन त्या हरिचिया तनु संपदांतें

बोले मुनी कपिल भागवतीं स्ववाचे

मानेस तेचि गुण गाइन केशवाचे ॥१॥

घ्यावें बरें हरिचिया पद - पंकजांतें

वज्यांऽकुश - ध्वज - सरोरुह अंक ज्यांतें

आरक्त वर्तुळ नखें हदयीं प्रभा ते

नाशी अनादि तम सूर्य तसा प्रभाने ॥२॥

प्रक्षालिनां चरण ते शिव त्या जळाला

घेनां शिरीं गरळ - दाह निवे जळाला

माथां धरुनि शिवे तें शिवे नीर झाला

घ्यावें असें स्मरत त्या पदनीरजाला ॥३॥

मांडीवरी चरण - सुंदर - पाद - पद्मा

प्रीतीकरुनि चुरिते जननी जनाची

माता विधीचिहि वधू भव - भंजनाची ॥४॥

ज्या मांडिया खग - भुजांवरि वर्तमाना

ज्या सांवळ्या अनसिका - कुसुमा - समाना

पीतांबरावरिकटी अतिरम्यकांची

पंक्तीजिला मणि भया लघुघंटिकांची ॥५॥

नाभी र्‍हदीं कमळ पुत्र विरंचि ज्यांत

त्रैलोक्य - उद्धव जया जगदंबुजांत

विस्तीर्ण ऊरु नव - यौवन - भाव दावी

ज्या चिद्वनीं उगवल्या असि भावदावी ॥६॥

श्रीयुक्त त्दृत्कमळ त्या भव - मोचनाचें

जें दे मनासि सुग्व वाढवि लोचनाचें

घ्यावें चराऽचर - नमस्कृत - कंधरातें

जो कौस्तुभा मिरवितो अति कंधरातें ॥७॥

जे मंदरें मथिति बाहु सुधांबुधीनें

घ्यावें तया सकळ - वीर - सुधांबुधीनें

धारा दहाशत सुदर्शन चक्र हातीं

पद्मांत हंस करि शंख असा पहाती ॥८॥

कौमोदकी प्रिय गदा स्मर अंतरंगें

जे माखिली असुर - मर्दनि रक्त - रंगें

गुंजार वें करुनि सेविति भृंगमाळा

कंठीं मणी जिववितो स्थिर - जंगमाला ॥९॥

झाला स्व - भृत्य - करुणेच करुनि रुपी

त्याचें मुरवाञ्ज - सुख कोण जगीं निरुपी

गंडस्थळीं मकर - कुंडल - मौक्तिकांची

डोळे प्रभा सरळता अति नासिकाची ॥१०॥

जी ज्यांत लुब्ध कुटिलाऽलक - भृंगजाला

श्री मीन - युग्म करि ज्या वदनांबुजाला

सुभुमुखाज नयनाञ - युगें करुनी

शोभे जळ - स्थळ - सरोरुह भा हरुनी ॥११॥

घ्यावें विशेष अवलोकन लोचनाचें

तापत्रया निवविजें भव - मोचनाचें

सस्त्रेह ज्यांत अति सुंदर हास्य मंद

प्रेम - प्रसाद शुभ ज्यांत असे अमंद ॥१२॥

शोषी अशेष भव - शोक - समुद्र - वारी

हांसे असा परम सुंदर दानऽवारी

पीडा करी मुनि - मनांत रिघोनि काम

भूमंडलें भुलवि त्यासहि पूर्ण - काम ॥१३॥

ध्यानास आश्रवअसें अतिहास्य देवें

केलें जसे इतर नाठविजे सदैवें

आरक्त दंत अधरामृत - तेज यांत

घ्यावा असा स्मरत विष्णु त्दृदंबुजांत ॥१४॥

रुपीं अशा हरिचिया जडतांचि भाव

प्रेमें महा उठनि सात्विक अष्टभाव

तो नाठवे हरिहि मानस - हंस - रुपीं

जाऊनियां मन बुडे निज - चित्स्वरुपीं ॥१५॥

हे ध्यानपद्धति चतुर्दश - रत्न - माळा

पायीं समर्पिलि तथा पुरुषोत्तमाला

पद्यासि पद्यचि निघे मुखिं वामनाच्या

वृत्ती असोनि हरि - रुपमया मनाच्या ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP