मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित| गीतार्णव वामन पंडित अनुभूतिलेश भागवत रामायण ब्रम्हस्तुति द्वारकाविजय श्रीहरिगीता कर्मतत्व वामनपंडित कृत स्फुट काव्यें नाम सुधा साम्राज्यवामनटीका वेणुसुधा राजयोग मुकुंदविलास ध्यानमाळा प्रियसुधा तत्वमाळा शुकाष्टक स्फूटश्लोक गीतार्णव चरमगुरुमंजरी. वामनचरित्र विश्वास वध दंपत्य चरित्र भरत भाव रुक्मिणी पत्रिका सीता स्वयंवर रामजन्म अहिल्योद्धार लोपामुद्रा संवाद यज्ञपत्न्याख्यान कंसवध रुक्मिणी विलास भामाविलास चित्सुधा गजेंद्र मोक्ष वामन पंडित - गीतार्णव कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : poetvaman panditकवीवामन पंडित गीतार्णव Translation - भाषांतर प्रथम वंदुनियां भगवत्तमा मग तदात्मक भागवतोत्तमा अनुभवें भगवत्पद देखिलें कथिन जें मनिं वासन रेखिलें ॥१॥ मन रमे भगवत्पदलक्षणीं पुरुष तो पुरुषोत्तम - लक्षणी जग जगत्पति एकचि होतसे परम भागवतोत्तम हो तसे ॥२॥ पाहती जगचि हें गुण सा जे त्या बुधांस भगवत्पण साजे पावले भजत वास्तव - भावा त्यांस भागवत त्यास्तव भावा ॥३॥ ऐश्वर्ये ज्ञान पाहे जगचि तरि अहो तेंचि वैराग्य आहे धर्माची मूर्ति ही हें प्रभु - यशहि तई विश्व होवूनि राहे मावा गंगाच वाहे स्थिर चर अवघें श्रीहरीतेंचि साहे हें जाणे तो न मोहे क्रमविहित गुण स्वामिचे सा न मोहे ॥४॥ ऐश्वर्य - सामर्थ्य - गुणें सुजाणा ज्ञानत्व - बोधेंचि विराग जाणाविरागहेतूस्तव धर्म - सिद्धी धर्मे यश श्री असि हे प्रसिद्धी ॥५॥ म्हणे कृष्ण पार्था अलंकार हेमीं धरीतों तसे सर्वही लोक हे मी नगीं तें न तो त्या सुवर्णी असेना पहातां असी सर्वही भूत - सेना ॥६॥ ऐश्वर्य हें सर्वहि येरितीचें पाहें असें वाक्य जगत्पतीचें गीर्तित जो दे गुरु - राज विद्या अध्याय तो यास्तव राजविद्या ॥७॥ हा विश्व - सर्प म्या दोरें व्यापिला स्व - अमूर्तिनें सर्व भूतें मजमधें त्या सर्पी दोर मी नसें तोही न मज रज्जूंन पाहे हे युक्ति ऐश्वरी भूतीं नसोनि धरितों कीं माझी बुद्धि कल्पिते ॥९॥ पाहें माजीं शतशतें रुपें पार्था सहस्त्रशा नानाप्रकारिचीं दिव्यें जे नाना वर्ण आकृती ॥१०॥ ऐश्वर्य - युक्तचि म्हणे जग सर्व पाहे हें पाहणें परम अद्भुत मत्कृपा हे चिच्छक्ति मी मजवरी जड विश्वरुपें मद्वुद्धि दाखवि असा गुण विश्वरुपें ॥११॥ हा ज्ञाननाम गुण दाखवि विश्व - रुपीं स्थाणुत्व जेविं नर कल्पितसे स्वरुपीं सर्वज्ञता तरिच कीं स्वयमेव सारें गीतेंत येचरिति सर्वहि गुत्द्य सारें ॥१२॥ एवं प्रपंच अवघा लटिकाच झाला वैराग्य हें सहज नित्य अधोक्षजाला कां श्रुक्ति - बोध रजतीं अनुराग दावी वैराग्य विश्व - रचनाच तई वदावी ॥१३॥ मी अलिप्त रचुनी रचना ही कीं मला तदभिलाषचि नाहीं हा विरागगुण पांडुसुतातें वर्णिला कमल - संभव - तातें ॥१४॥ कर्मे न लिंपती मातें कीं न कर्म - फलीं स्पृहा मातें जाणे असा तोही बद्ध कर्मी नव्हे कधीं ॥१५॥ अधर्म तो जो करि बंधनासी तो धर्म कीं जो भव - बंध नासी करुनि स्रुष्ट्यादिकहि विरागी धर्मिष्ठ तो भक्त जनाऽनुरागी सत्कर्म आणि समता सदयत्व - रीती हा मुख्य धर्म निगम स्फुट हें करीती वैषम्य - निर्दयपणाविण लोक सारे झाला स्वयें जगचि धर्महि तो असा रे ॥१७॥बरें कर्म जें तें यशोरुप दावी जगत्कल्पना कीर्ति ही हे वदावी म्हणे अर्जुना विश्व - ऐश्वर्य पाहें करी कीर्तिही सूचऊनी कृपा हे ॥१८॥घडेना तें केलें जड जग तसें आणि गवसे वसे ऐसें चित्तीं अनुभव जया नित्य नवसे मनीं होती तों ती अभिनव गमे कीर्ति परमा रमाकांताची ते मग निज - यशोरुपचि रमा ॥१९॥ यश - श्री - निमित्तें धनश्री - व्ययातें करीती भरीती यशा अव्ययातें जगत्कीर्तिची श्रीच हें विश्व सारें असारें जगीं होति ती सर्व सारें ॥२०॥ एका वाइट एक ते प्रिय दुज्या वाटे बरी श्रीच ते एवं सृष्टि समस्त मायिकहि जे श्रीहोवुनी संचते विश्वातें धरितो रमेसहि धरी विश्वंभर श्रीधर द्यूतालागिंहि जो विभूति म्हणतो गीतेंत बिंबाधर ॥२१॥ अपरा कार्यरुपा हे मूळप्रकृति ते परा चिदंशें जीव जे झाले जाणिजे तें जिणें जग ॥२२॥ श्रीच हें जग म्हणूनि रमा ते ईश - बुद्धि - सदनांतचि माते जींत विश्व धरि त्या स्वमतीतें ठाव त्दृत्कमल तोचि सतीतें ॥२३॥ भूतीं नसोनि धरितों कीं माझी बुद्धि कल्पिते या गीतावचने विश्व त्दृदयींच रमातसी ॥२४॥ आत्मशब्दें बुद्धि जेथें भावना विश्व - कल्पना बुद्धि माझी मजमधें कल्पिते जग अर्थ हा ॥२५॥अहो बुद्धि चिच्छक्ति सर्वेश्वराची जगत्कल्पना युक्तिजे श्रीवराची जसें विश्व बुद्धींत तैसी रमा ते मतीच्या स्थळीं श्री त्दृहञ्जांत माते आपणा सुतपणें उपजाया स्त्री वरी पति म्हणे तिस जाया जींत जीवपण ते पर माया स्त्री करी जसि वधूच रमाया ॥२७॥ एवं अविद्यांशगुणेंचि माया जीवांचिया होय मती रमाया तिला खरेंसे जग पाहिजेतें सहुद्धिनें षड्गुण पाहवें तें ॥२८॥ विश्वरुप परि षङ्गुण दावी कीं असी भजन - भक्ति वदावी आत्मवित् परम भक्त असा रे अन्य निर्गुण - उपासक सारे ॥२९॥ अध्याय हे धरियले मनिं याच भावें पार्थे मुकुंद - निकटत्व - गुण - प्रभावें ते द्वादशी द्विविधही भजणार साचे जाणूनि घे कवळ भक्ति - सुधा - रसाचे ॥३०॥ कळोनि स्व - आत्मत्व - निर्धार साचा तदाधार या पङ्गुणाच्या रसाचा जगत् भाव पाहे सुखी तोचि जाणा वदे येरिती कृष्ण पार्था सुजाणा भजे निर्गुणातेंचि तो कष्ट भारी अहो पावतो हें वंदे कैठभारी निजीं निर्गुणीं षङ्गुणी विश्व पाहे बहू आवडे भक्ति त्या विश्वपा हे ॥३२॥ अनायासें सार प्रभुगुण पहा सावध असा असाध्या अव्यक्तासचि धरुनि आत्मज्ञ रमती मनी त्यांच्या क्लेशें उपरमति वेगें न शमती ॥३३॥ निर्गुणत्व पहिलें समजावें षङ्गुणत्व मग हें उमजावें भक्तिनें जरि असेंचि भजावें कष्टल्याविण श्रुभाश्रुभ जावें ॥३४॥ पहातां जगीं षडुणाचाच पावा मनामाजि आवेश त्याचाच यावा अहो बोलतों स्वानुभूतीच हे मी भरे तावितां अग्नि संपूर्ण हेमीं ॥३५॥ ऐश्वर्य ऐश्वर्य असेंच दावी कीं स्वानुभूतीच तसी वदावी हें ज्ञान जें ज्ञान - उपासकांही कीं जाणणे तों नउरेच काहीं ॥३६॥ वैराग्य वैराग्य असेंच दावी कीं जागरीं स्वप्न - कथा वदावी म्हणे प्रपंचास अधोक्ष जागा तो कां स्मरे स्वप्निक - भोग जागा ॥३७॥ वैराग्य दे यास असीच ठेवी कीं विश्व वैराग्य करुनि ठेवी इच्छी न जो मुक्तिहि वीतरागी जो भक्त वैकुंठ - पदाऽनुरागी ॥३८॥ जे सर्वसाम्यें करुणाच वाटे न चित्त चाले विषमत्ववाटे ध्यातां जगीं धर्म जगत्मयाचा होतो वरा त्याहूनि धर्म त्याचा ॥३९॥ कर्मानुरुपें फळ ईश याजी तैंही म्हणे हा मजला नयो जी न ब्रम्ह - रुद्रादि - पदीं असोसी कीं दुःख दातृत्व न चित्त सोसी ॥४०॥ सर्वैद्रियीं मिरवि कीर्तिस याच वाटे कीं - विश्व - विश्वकर कीर्तिच याचवाटे सप्रेम गाय अवतार - पवित्र वार्ता कर्णामृतें निववि अन्यजना भवार्ता ॥४१॥ अनुभवि मनिं आत्मा श्रुक्ति तो विश्व रुपें मनचि त्दृदय त्यांत श्रीच हे विश्वरुपें नर - सुर - विधि - लक्ष्मी जो तदंशी न मोजी भव - विभव - विरक्ता स्वात्मभक्ता नमो जी ॥४२॥ बुद्धीस निर्गुण दिसे अपरोक्ष साचें जें इंद्रिया विदित तें जग सार साचें प्रत्यक्ष निर्गुणिच येरिति लोक सारे पाहे स्वयें न भगवान् हरि तो कसा रे ॥४३॥ दिसे भास हा निर्गुणोपासकाला करीतो जरी अन्वयें ब्रम्ह - काला मृषा भासही षङ्गुणत्वेंचि पाहे तरे शीघ्र हा ज्यास मोठी कृपा हे ॥४४॥ भवार्णवीं यास मुकुंद तारी कृपानिधी जो विविधावतारी तेतों तरों पाहति साधनानें साधी धनें वैश्य जसा धनानें ॥४५॥ तो ज्ञान होतो सगुणा उपेक्षी हा बोध आत्माच बहू अपेक्षी वर्णूनि दोघां स्वउपासकांही तारीन त्याला नम्हणेंच कांहीं ॥४६॥ कर्मे समर्पुनि समस्त उपासनाही अद्वैत अन्य मजवांचुनि वास नाहीं मी थोर एक निज - तारक ज्यांस वाटे तारीन त्यांस भव - सागरि पायवाटे ॥४७॥ असा द्वादशाध्याय येथें हरी तो किरीटीचिया संशयातें हरीतो बहू क्लेश आधीं तयाला वदोनी स्वभक्तां असे बोलतो श्लोक दोनी मातेंचि मानुनी थोर कर्मे सर्व समर्पिती तरी अद्वैतयोगेंची मातें ध्याती उपासिती ॥४९॥ ऐसीं चित्तें मजमधें त्यांचा मी भव - सागरीं पार्था नलावितां वेळ होतों केवळ तारक ॥५०॥ नबोले असें निर्गुणोपासकाला तिहीं विश्व केलें जर्ही ब्रम्हकाला जयांला न हा तारक श्रीश वाटे स्वयत्नेंचि ते धांवती मोक्षवाटे ॥५१॥ न टीका असी निर्गुणोपासकांची अशा पक्कअर्थापुढें होय कांची न आत्मज्ञ ते भक्त यालागिं देवा स्वकर्मे म्हणे अर्पिता वासुदेवा ॥५२॥ हे आत्मवेत्ते न जई गणावे ज्ञात्याहुनी थोर कसे म्हणावे कीं सप्तमाध्याय - विरोध होतो ज्ञानी म्हणे थोर हरी अहो तो ॥५३॥ याकारणें ज्ञानगुणें समान देवूनियां यास्तव त्यास मान हे थोर त्याहीहुनि बोलताहे कीं भक्तिची शीघ्र फळे लता हे ॥५४॥ हरी बोलिला येस्थळीं अर्थवादा असें बोलती एकते व्यर्थ वादा मत - प्राप्त - युक्तीस जाणे हरी तो असे तर्क अध्याय - अंती हरी तो ॥५५॥ बोलिल्याच परी हें जे धर्म्यामृत उपासिती श्रद्धाळू थोर मी ज्यांला भक्त ते बहु मत्प्रिय ॥५६॥ जसें बोलिलों अर्जुना याचरीती असी षङ्गुणीपासना जे करीती बहू प्रीति त्यांची मला श्रीहरी तो म्हणे अर्थवादत्व येथें हरीतो ॥५७॥ जे श्रद्दधान भजतीलचि याप्रकारें हे श्रद्दधान करिती स्तव शास्त्रकारें कृष्णेंचि योजुनि दुज्यां स्वउपासकांची अश्रद्दधानमति सूचविलीच कांची ॥५८॥ यथोक्तशद्धावरि अर्थवादा कोठें उरे हो अवकाश वादा ढीकामुखीं हा परिहार सारा असो वदावें किति त्या असारा ॥५९॥ उपासना हे भव - रोग - मात्रा ढांकूनियां निर्गुण - तत्वमात्रा उपासिती क्लेश तयांस भारी होती म्हणे हे स्फुट कैठ भारी ॥६०॥ येथें दिसे विषमता त्रिजगत्पतीतें तेही तसेंच परिसा समता - गतीतें कल्पद्रुमें जसिच कल्पित कल्पना ही देवूनि अर्थचि तयास विकल्प नाहीं ॥६१॥ सम मी सकळां भूतीं न द्वेषी मज न प्रिय परि जे भजती प्रेमें मी त्यांत मजमाजि जे ॥६२॥ ये यथार्माप्रपद्यंते तांस्त थैव भजाम्यहं हेंही गीतेंतचि वदे यासि वैषम्य हो कसें ॥६३॥ जे जसे भजति त्यांस तसा रे मी भजें मज समानचि सारे यागुणेंचि कमलोद्भव - तातें होइजे सुलभ भागवतातें ॥६४॥ ऐश्वर्य जे ध्याति तयांस देव स्व - अंश तो दे प्रभु वासुदेव अनीश्वरत्वा मग ठाव नाहीं अनीश हे नेणति भावनाहीं ॥६५॥ कष्टी अधिक ते होती अव्यक्तीं चित्त योजितां अव्यक्तगति ते देहीं दुःखें पावति यास्तव ॥६६॥ जरी निर्गुणीं बुद्धि योजूनि घाली न ऐश्वर्य - शक्ती स्वचित्तीं निघाली नव्हे ईश तो देह धारीच साचा नये स्वाद श्रद्धामृताच्या रसाचा ॥६७॥ म्हणे त्यास देही हरी याच भावें असे भक्त तो ईश्वरत्व - प्रभावें जरी निर्गुणाभ्यास दोघां समान स्वभक्तां जसा दे न दे त्यांस मान ॥६८॥ यागुणेंचि म्हणतो निजभक्तां होय तारक अरे अविभक्तां कीं तयांत विभ - शक्ति निघाली निर्गुणीच मन आणुनि घाली ॥६९॥बोधमात्रचि जयासहि आगळा ईश - भक्त म्हणती अजागळा विश्व ईश्वर असें कसें कळे पावले न तरि काय हो कळे ॥७०॥ सर्वाकृती कल्पुनि ईश आहे नजाणतां हे विषयाग्नि आहे तो बोधही पूर्ण कसा म्हणावा जीहीं उगा भासचि हा गणावा ॥७१॥जों आपणा प्रभु न कल्पिल विश्वरुपें तों केविं श्रुक्तिचवरी जड विश्व रुपें पाषाण - गर्भ - कठिणत्व जनेंद्रियांसी ठावे न कल्पक वदा तरि कोण यासी ॥७२॥ ईशास जों ज्ञानगुणें भजेना तों ज्ञान तें छिद्रचि जें विजेना यालागिं याला बहु कष्ट भारी म्हणूनि बोले प्रभु कैठभारी ॥७३॥ उगेंचि मिथ्या जग हें पहाती वैराग्य दे आणुनि ताप हातीं वैराग्यशक्ती प्रभुते भजेना वैराग्यता दाभण लाभ जेना ॥७४॥ जेव्हां विवेक - बळ तेचघडी विरागी चित्त क्षणाउपरि त्या विषयानुरागीं तें नावरे म्हणुनि त्यासचि कष्ट भारी यालागिं होति म्हणतो मधुकैठभारी ॥७५॥ वैराग्य षङ्गुणपणीं कळलें जयाला माझें तया श्रम घडे न मनोजयाला गीतेमधेंच हरि सूचवितो स्ववाचा श्लोक प्रमाण अजि मागति तेचि वाचा ॥७६॥ कर्मे न लिंपती मातें कीं न कर्मफलीं स्पृहा मातें जाणे असा तोही बद्ध कर्मी नव्हे कधीं ॥७७॥ स्पृहा - अभावें स्व - विराग दावी हे शक्ति सांशाक्तिमधें वदावी मी यागुणें कर्म - विमुक्त साच ऐशा मला लक्षिल तो तसाच ॥७८॥ ऐश्वर्य - शक्ति नव मी स्फुट दाखवीली हे शक्तिची जसि फलश्रुति हे वदावी ऐश्वर्य बोधफळ तेंच तयास दावी ॥७९॥ म्हणे कृष्ण ऐश्वर्य युक्तीस पाहें पहातांचि होणार ऐसी कृपा हे असें पाहणारांत भूतें न भूतीं असे तो न तीं त्यांत हे स्वानुभूती ॥८०॥ सगुणसा अपरोक्ष भजे असें तरि तदशचि देतचि तो असे नभजतां सगुणा मन नावरे विवश कर्ण धराविण नाव रे ॥८१॥ जे पाहती स्थिरचरात्मक हा पसारा पूर्वोक्त धर्म भगवद्गुणरुप सारा ते धर्म टाकितिहि अन्य तरी सदेवां विघ्नें तयां करवती न कदापि देवां ॥८२॥ एका मातें शरण ये सर्व - धर्मास टांकुनी संचितें क्रियमाणें हीं मी नाशीन भिवूं नको ॥८३॥ एकीं अनेक जग त्या मज वासुदेवा एका अशा शरण येशिल देव - देवा टांकूनि अन्य - सुर - धर्म तधीं भयातें हे मांडितील नव्हतां क्रतुलाभ यांतें ॥८४॥ विघ्नें जरी करिति इंद्रिय - देव - सेना मी रक्षणार तुज धाक कधीं असेना कीं पातकें सकळ कर्ममयें असारें नाशीन मी भिवुं नको निज - बोध - सारें ॥८५॥हे गोड गोष्टि सहजें जसि चाखवीली जरी टांकिले धर्म सर्वा सुरांचे ऋतू - कामधेनूचिया वासुरांचे भजे विश्वधर्मात्मका वासुदेवा मनीं देखतां उद्भवे त्रास देवां ॥८६॥ न हा लाभ त्यां निर्गुणोपासकांला करीती जरी अन्वयें ब्रम्हकाला म्हणूनीच ते पावती कष्ट भारी असें अर्जुनानें वदे कैठभारी ॥८७॥ निर्दयत्व विषमत्व असेना निर्मिली असि चराचर सेना विष्णुधर्म जन हा अवलोकीं तो दयाळु सम मानव लोकी ॥८८॥ कृपेचा जो सिंधू निखिल - जनबंधू अधिपती तयाचा जो धर्म स्थिरचर जया सर्व जपती तयां सर्वा भूतीं सहज करुणा पूर्ण उकळी उठे कीं अंशत्वें हरिच दिसतो त्यास सकळीं ॥८९॥ उगा सर्वभूतीं परब्रम्ह पाहे तयाहूनि तो थोर ज्याला कृपा हे स्वटुःखासुखातुल्य जो सर्व - भूतीं कृपाळू प्रभूचीच होतां विभूती ॥९०॥ सर्वभूतीं स्वदृष्टांतें जो पाहे मज अर्जुना सुखा दुःखासही योगी तो थोर मज संमत ॥९१॥ जगाच्या पटाची धरुनी दसोडी जगद्वस्त्ररुपास तंतूस सोडी हिसे साधनें पावतो व्यर्थ कंषा न तो लाधतो वासुदेवानुकंपा ॥९२॥ कीर्तन श्रवण विष्णु - यशाचें नाशितें भजन विघ्नपिशाचें आत्मता कळलिया यशरुपें विश्व - श्रुक्तिवरि त्या जड रुपें ॥९३॥ ते आत्मता कळलिया श्रवणादिरीती टांकूनि निर्गुणचि एक अहो धरीती तें चित्त होवुनि न वश्यहि कष्ट भारी क्लेशी तयांस म्हणतो मधु - कैठभारी ॥९४॥श्री जे चराचर नदीच अगाध वाहे तारुं तिचा भजति त्याप्रति माधवा हे यालागिं मी त्वरित भागवतांस तारीं ऐसें म्हणे हरिच वृष्णिकुलावरारी ॥९५॥ मी देव माझी त्रिगुणा हे माया तरवे न जे मातेंचि जे भजनि ते मायेतें तरताति या ॥९६॥ मायानदीच्या प्रभुतारका या उपेक्षुनी पाहति विश्वकाया ते पावती यास्तव कष्ट भारी गीतेंत बोले प्रभु कैठभारी ॥९७॥ विहित - भजन - मूळें यत्न भक्तांजनाही श्रम तरि म्हणतो कां श्री महाराज नाहीं वदतिल तरि ऐका प्रश्न सद्भाव योजी अधिकतर तयां हा शब्दही देव यो जी ॥९८॥ बहुत अधिक त्यांला लागती कष्ट भारी अधिकतर म्हणूनी बोलतो कैठभारी नधरिति भवसिंधूमाजि ते कास याची धरितिल तरि चिंता त्यांसही कासयाची ॥९९॥ पडति उभयवर्गी पोहणी तत्समानें तरि गिरिधर तारुं तें स्व - बोधाऽभिमानें बहुत अधिक त्यांला यास्तव क्लेश भारी म्हणवुनि म्हणतो जी ये स्थळीं कैठभारी ॥१००॥ ब्रम्हीं ब्रम्हत्व वाटे सगुणपण असें द्वैत तेथें न वाटे माया - संकल्प फाटे स्थिर - चर लटिकें होवुनी हीन दाटे अज्ञानाचेच कांटे वरि परि फणसीं षङ्गुणाचेच सांटे जो अव्यक्तींच आटे सुख - फळ परि तें साधितां ऊर फाटे ॥१०१॥ असी काढी गीता मथुनि हरि गीतार्णव सुधा सुधारा हे गंगा करु अमृत - संतृप्त वसुधा सुधा ब्रम्हांडीं हा सुपथ रचिला वामनपणीं जगाच्या उद्धारा हरि करितसे षङ्गुणपणीं ॥१०२॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP