बृहज्जातक - अध्याय २४

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


विशेष फळांची योजना

अर्थ -- पुरुषजन्मास जें फल फल ते जर स्त्रीजन्मास असंभवित असेल तर ते किंवा सर्वही तिचें पतीस योजावे. तिच्या पतीचे मरण तिच्या अष्टमस्थानाप्रमाणें व तिचें शरीर लग्न व चंद्राप्रमाणे आणि सौभाग्य व पतीचे लक्षण सप्तमस्थाना वरुन जाणावे.

स्त्रीजातीचें लक्षण ( वसंततिलका )

अर्थ -- लग्न चंद्र हे समराशीत असता ' स्त्रीस्वभावाची ' व असे असून त्यांजवर शुभग्रहांच्या दृष्टि असतील तर ती सच्छीलभूषित अशी होते. लग्न व चंद्र हे विषम राशीस असतील तर ती ' पुरुषस्वभावाची ' असें असून त्याजवर पापग्रहांची दृष्टि असेल तर किंवा ते लग्न व चंद्र हे पापयुक्त असतील तर ती पापशील व गुणानी हीन अशी होते.

जन्मकालिन चंद्र व लग्न त्रिंशांश फळ

अर्थ -- लग्न व चंद्र हे त्या राशीस ज्या त्रिंशांशी असतील त्यांच्या स्वामीवरुन त्यांची फळें खाली कोष्टकांत दाखविली आहेत त्यावरुन जाणावी.

त्रिशांशापति फल कोष्टक

       मंगळ              शनि            गुरु          बुध            शुक्र

मंग - दुष्टकन्या         दासी          साध्वी       मायावी      कुचरित्रा

शुक्र - दुष्टा                 पुनर्भू        गुणवती   कलाकुश    गुणख्याता

बुध - कपटी              क्लीबा        साध्वी    गुणाढ्या      मदनवि०

चंद्र - स्वच्छव        पतिघाति     बहुगुणी     शिल्पा      असाध्वी

सूर्य - पोरुषा            कुलटा      राजपत्नी    पुरु. चेटा      अगम्य

गुरु - बहुगुण         अल्परति      बहुगुण    ज्ञानयुक्ता    असाध्वी

शनि - दासा           नीचरता     पतिरता       दुष्टा            अप्रजा

पूर्वोक्त फळांची योजना

अर्थ -- ही वर सांगितलेली त्रिंशांशकांची फळे त्यावर लग्न व चंद्रहेयुक्त असता, वली हीनबली त्यामध्ये असेल तसा विचार करुन योग्य तेंच घ्यावे.

विरुद्ध योग

अर्थ -- शनि शुक्र हे परस्परांच्या नवमाशी असून एकमेकास पहात असतील तर किंवा वृष तूळ हे कुंभवयमांशी होत्साते लग्नी असतील तर ती स्त्री दुसर्‍या स्त्रीकडून पुरुषासारिखी कृति करवून विषाग्निरुप जो मदन तो प्रदीप असता याची शांति करवून घेत्ये.

पतिविषयी सामान्य भविष्य

अर्थ -- लग्न व चंद्र यांपासून सप्तमस्थान हें शून्य ( ग्रहावाचून ) असेल; किंवा त्या सप्तमस्थानी निर्बळ ग्रह असून सोम्य अशा ग्रहाशी दृष्टि नसेल तर; कुत्सितभर्ता. सप्तमस्थानी बुध शनि असता, पति नपुंसक. सप्तमस्थान हें चर शशियुक्त असेल तर भर्ता निरंतर प्रवासी. सप्तमस्थानी सूर्य असेल तर पतीने टाकलेली. सप्तमस्थ मंगळ असेल तर बालविधवा. सप्तमस्थ शनि असेल तर बाल्यजरा. हे सूरं, मंगळ, शनि जर पापदृष्ट असली ; तर असें होते; शुभ दृष्ट अन्यथा असें जाणावे. येथें सप्तमस्थ म्हणजे लग्नापासून सप्तमस्थान किंवा जन्म राशीपासून सप्तमस्थान असें समजावे.

वैधव्यादि दुष्टयोग

अर्थ -- उग्र ग्रह, सप्तमस्थानीं असतील तर, विधवा -- मित्रग्रह, सप्तमस्थानी असतां पुरर्भु -- सप्तमस्थ क्रूर ग्रह बलहौन असा सौम्य ग्रहांचे दृष्टीनें युक्त असेल तर पतीनें टाकलेली -- शुक्र, मंगळ हे परस्परांचे नवमांशी ( कोणत्याहि राशीस व स्थानी ) असतील किंवा तें उभयतां चन्द्राशीं युक्त होत्सातें सप्तमस्थानीं असतील तर, पतीच्या आज्ञेनें परपुरुषगमन असें जाणावें.

मातेशींसह जारिणी

अर्थ -- शुक्र, चन्द्र हे लग्नीं शनिमंगळाचें गृहीं असतील, व त्याजवर पापग्रहाची दृष्टी असेल तर, ती स्त्री मातेसह जारिणी -- सप्तमस्थान राशी ही मंगळाचें नवमांशी असून तेथे शनीची दृष्टी असेल, तर त्या स्त्रीची योनि व्याधीचे पिडीत असेल -- सप्तमस्थान राशीचा नवमांश जर शुभ ग्रहांचा असेल तर ती स्त्री कटीसुंदर व प्रिय अशी होते.

पतिलक्षण

अर्थ -- सप्तमस्थानीं ग्रहांच्या राशी किंवा नवमाश याजवरुन पतिलक्षण जाणण्याचें कोष्टक खाली दाखविले आहे.

सूर्य - वृद्ध किंवा मूर्खं            चन्द्र - कामवश व मृदु

मंगळ - स्त्रीवश व क्रोधी        गुरु - गुणवान, जितेंद्रिय

शुक्र - अतिस्वरुप, अतिप्रिय   शनि - अतिमृदु, अतिकर्मयोगी

बुध -  विद्वान, ज्ञाननिपुण.

बुध, शुक्र व चंद्र लग्नी असता फळे

अर्थ -- लग्नीं प्रत्येक ग्रह असता स्त्रीलक्षणें खाली दाखविलीं आहेत.

शुक्रचन्द्र -- ईर्ष्यायुक्त व सुखासक्त

बुधचन्द्र -- कलानिपुण, सुखी, गुणाढ्य

शुक्रबुध -- स्वरुपवान, सौभाग्ययुक्त, कलाकुशल

चन्द्रबुधशुक्र -- घन, सौख्य. गुण, हीं विपुल. जर हे ग्रह शुभ असतील, तर याप्रमाणें फलें मिळतील.

वैधव्य अल्पसंततित्व

अर्थ -- अष्टमस्थानीं क्रूर असतां वैधव्यप्राप्ति -- परन्तु त्या स्थानाचास्वामी ज्या नवमांशीं असेल, त्या नवमांशस्वामीच्या वयामध्ये तो वैधव्ययोग होतो -- द्वितीय स्थानी शुभ ग्रह असलें तर तिला स्वयमेव मृत्यु प्राप्त होतो कन्या; वृश्चिक, वृषभ, सिंह बांवर चन्द्र असतां अल्प संतानयोग जाणावा. यासंबंधीचा विचार कुंडलीतील अनेकयोग पाहून करावा कारण यायोगांचा भंग करणारे दुसरे योग असतात.

दुराचरणयोग व ब्रह्मज्ञानयोग

अर्थ -- शनि हा मध्यमबली, चन्द्र, शुक्र, बुध हे बलहीन व बाकीचे ग्रह ( सू.मं.गु. ) बलिष्ट असतील व लग्नीं विषमराशी असेल, तर तीं स्त्री पुरुषाचरणी ( पुरुषासारखी वागणूक करणारी ) होतें. गुरु, मंगळ, शुक्र, बुध हे बलिष्ट असून लग्नीं समराशी असतील, तर भूमंडळी विख्यात. अनेक शास्त्रनिपुण आणि ब्रह्मज्ञानी अशी ती स्त्री होते.

प्रव्रज्यायोग वगैरे

अर्थ -- सप्तम स्थानीं पापग्रह असून, जर नवमस्थानीं कोणी ग्रह असेल, तर त्या नवमस्थानस्थ ग्रहाच्या गुणाप्रमाणे निःसंशय ती स्त्री प्रव्रज्या ( वैराग्यदीक्षां ) धारण करते -- जा प्रकारे हे ' स्त्रीजातक ' विवाहकाली कन्या वरतेवेळी, कन्यादानकाळी, प्रश्नकाळी सर्व प्रकारे योजावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP