बृहज्जातक - अध्याय १०

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


अर्थप्राप्तिचे वैशिष्ठ्य

अर्थ -- जन्मकाळी लग्न किंवा चंद्र यापासून, दशमस्थानी जो ग्रह असेल त्यासारिख्या जनापासून अर्थ प्राप्ति जाणावी, ती जशी, -- सूर्य दशमस्थानी असता ' पित्यापासून ' -- चंद्र दश० असतां मातेपासून, -- मंगळ द० स्थानी असता शत्रूपासून -- बुध द० असता मित्रापासून, -- गुरु द० असतां बंधूपासून, -- शुक्र द० असता स्त्रीपासून -- शनि द० असता सेवकापासून, - इत्यादि जनापासून, अर्थप्राप्ति होतें, - लग्न, चंद्र, सूर्य, याजपासून दशमस्थानी जो राशि त्याचा स्वामी त्या नवमांशी असेल, त्या नवमांश स्वामीचे संबंधीचें पदार्थापासून उपजीविका ( धंदा रोजगार ) चालेल, या नवमाशाचा विस्तार खाली आहे.

अर्थ -- तो जर सूर्याचा नवमांश असेल तर, तृणसंबंधी, सूवर्णसंबंधी उणीसंबंधी, औषधादिकसंबंधी, जे पदार्थ याहीकरुन उपजीविका चालेल, -- चन्द्राचा नवमांश असला तर, कृषीचे ( शेतकीचे ) संबंधानें, जमजांच्या ( शंख, भौक्तिक प्रवालांच्या ) संबंधीने, स्त्रियाचे संबंधाने उपजीवन होईल; -- मंगळाचा नवमांश असता, धातुसंबंधी, अग्निसंबंधी, शस्त्रसंबंधीं, साहसादिकसंबंधीं पदार्थानी उपजीविका प्राप्त, -- बुध नवमांश असतां, लिपिसंबंधाने, गणितसंबंधानें, शिल्पसंबंधानें इत्यादिसंबंधानें उपजीवन होईल.

विशेष

अर्थ -- तो जर गुरुचा नवमांश असेल तर, द्विज ( ब्राह्मण, क्षत्रिय ) त्रिबुध ( देव, पंडित ), आकार ( रत्नादिकांच्या खाणी ), धर्म ( यज्ञ, दान, उपासनादि ) यांच्या संबंधेंकरुन उपजीवन होईल, -- शुक्र नवमांश असतां, मणि ( हिरे, माणके, पाचादि ), ख्यादि ( त्यांचे व इतर धातूचे पदार्थ ), गायी, म्हशी, इत्यादिक संबंधानें, उपजीवन, -- शनीचा नवमांश असतां, श्रमसंबंधानें अधसंबंधानें, भारसंबंधानें, नीच शिल्पसंबंधानें, इत्यादिकापासून उपजीविका प्राप्त होईल, -- आणि लग्नापासून दशम स्थानस्वामी ज्या नवमांशीं असेल, त्या नवमांशाचा जो स्वामी त्याचे संबंधी ( वर सांगितलेल्या ) पदार्थाचेच कर्मानें ( छंद्याने ) सिद्धी प्राप्त होते.

अर्थ -- वर सांगितलेले ग्रह ( नवमांश स्वामी इत्यादि ) जर मित्रगृही असेल तर ' मित्रसंबंधानें, अर्थप्राप्ति, शत्रुगृही असतां ' शत्रुसंबंधानें ' अर्थ प्राप्ति, स्वगृही असतां ' स्वगृह ' संबंधानें अर्थप्राप्ति, -- आणि लाभ, धन, लग्न या स्थानी शुभ ग्रह बलयुक्त असतील तर, ' अनेक प्रकारांनी धनप्राप्ति ' येईल असे जाणावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP