मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह ३|
सर्वात्मका शिवसुंदरा स...

बालगीत - सर्वात्मका शिवसुंदरा स...

महापुरुषांची चरित्रे स्फूर्तिदायक असतात. त्यांच्या उदात्‍त जीवनमूल्यांचे त्या चरित्रांतून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून मनाला उभारी मिळते.


सर्वात्मका शिवसुंदरा

स्वीकार या अभिवादना ।

तिमिरातुनी तेजाकडे

प्रभु आमुच्या ने जीवना ॥

सुमनात तू गगनात तू

तार्‍यांमध्ये फुलतोस तू

सद्‌धर्म जे जगतामधे

सर्वांत त्या बसतोस तू ॥

चोहीकडे रुपे तुझी

जाणीव ही माझ्या मना

श्रमतोस तू शेतांमधे

तू राबसी श्रमिकांसवे॥

जे रंजले वा गांजले

पुसतोस त्यांची आसवे

स्वार्थाविना सेवा जिथे

तेथे तुझे पद पावना ॥

न्यायार्थ जे लढती रणी

तलवार तू त्यांच्या करी

ध्येयार्थ जे तमि चालती

तू दीप त्यांच्या अंतरी ॥

ज्ञानार्थ जे तपती मुनी

होतोस त्यांची साधना

करुणाकरा करुणा तुझी

असता मला भय कोठले ॥

मार्गावरी पुढती सदा

पाहीन मी तव पावले

सुजनत्व या हृदयामधे

नित जागवी भीतीविना ॥

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP