सत्यदत्त व्रत कथा - अध्याय पहिला

योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीदत्त॥ दीपक उवाच ॥ दत्तात्रेयामिधः कोऽयं देवः सिद्धेशवन्दितः ॥
वर्णयन्ति महात्मानो यच्चरित्रमनुत्तमम्॥१॥
वेदधर्मा उवाच ॥ धन्योऽसि कृतकृत्योऽसि सौभाग्योऽसि धरातले ॥
श्रीदत्तात्रेयमाहात्म्ये यस्य ते मतिरुत्तमा ॥२॥
योगीशस्य परं वक्ष्ये माहात्म्यं पापनाशनम् ॥
सद्यः सिद्धिप्रदन्नृणां सत्यदत्तव्रताश्रयम् ॥३॥
कलिमागतमाज्ञाय शौनकाद्या महर्षयः ॥
सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्त्रसममासत ॥४॥
त एकदा तु मुनयः प्रातर्हुतहुताग्नयः॥
सत्कृतं सूतमासीनं पप्रच्छुरिदमादरात् ॥५॥
॥श्रीगणेशाय नमः॥श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः॥
वेदधर्मामुनींचा सच्छिष्य श्रीदीपक, एके दिवशी त्यांना असे विचारता झाला की, "श्रीगुरुजी ! मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन
करतात व ज्याचे सर्वश्रेष्‍ठ चरित्र वर्णन करतात, असे श्रीदत्तात्रेय नाव असलेले हे कोण देव आहेत ?" ॥१॥
शिष्याचा प्रश्न ऐकून श्रीवेदधर्माऋषी म्हणाले की, "हे दीपका ! या भूतलावर तू मोठा धन्य आहेस, कृतकृत्य आहेस व तसाच
अत्यंत भाग्यवानही आहेस; कारण तुला श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम बुद्धी उत्पन्न झाली
आहे. ॥२॥
योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य तुला सांगतो. ते श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना
तात्काळ सिद्धी देणारे आहे. ॥३॥
कलियुग प्राप्त झालेले जाणून श्रीशौनकादिमहर्षींनी स्वर्गलोक मिळविण्याकरिता एक सहस्त्रसंवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरु
केला. ॥४॥
एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी श्रीअग्निनारायणाला हविर्भाग देऊन स्वस्थ बसले असता, मान्य अशा पुराणज्ञ श्रीसूतांना त्यांनी
आदराने असा प्रश्न केला. ॥५॥
ऋषय ऊचुः ॥ सूत सूत महाबुद्धे सर्वशास्त्रविशारद ॥
वासुदेवस्य माहात्म्यं दत्तदेवस्वरुपिणः ॥६॥
परमानन्दजननं सर्वसम्पत्प्रदं नृणाम्॥
सदानन्दस्य नो ब्रूहि योगाख्यानानि सर्वतः ॥७॥
ऐश्वर्यमतुलं प्रापुस्तद्भक्ता इति शुश्रुम ॥८॥
सूत उवाच ॥ शृण्वन्तु मुनयः सर्वे वेदवेदाङगपारङ्‌गाः ॥
भवतां परितोषाय दत्तदेवप्रसादतः ॥
माहात्म्यं श्रावयिष्यामि निबोधत यथाश्रुतम् ॥९॥
कुलाद्रिमृक्षं ब्रह्मज्ञवरीयांश्चविधीरितः ॥
पत्नीयुतोऽत्रिः पुत्रार्थं त्र्यधीशोपास्तये ययौ ॥१०॥
ऋषी असे म्हणाले की, "हे महाबुद्धिमान् व सर्व शास्त्रात निष्णात असणार्‍या सूता ! सच्चिदानंदरुप श्रीदत्तदेवस्वरुपी वासुदेवाचे,
मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्‍ठ आनंद देणारे माहात्म्य आम्हाला सांग व त्या श्रीप्रभूंची सर्व बाजूने योगप्रभाव व्यक्त करणारी
आख्यानेही सांग.॥६-७॥
त्याच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे." ॥८॥
श्रीसूत त्यांना असे म्हणाले की, "हे वेदवेदांगनिष्णात ऋषीहो ! आपण सर्व सावधानतेने श्रवण करा. श्रीदत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने
पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूंचे माहात्म्य, तुमच्या संतोषाकरिता मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही एकचित्ताने ऐका. ॥९॥
ब्रह्मज्ञवरीयान् अशी पदवी असणारे म्हणजे सहाव्या ज्ञानभूमिकेवर आरुढ झालेले श्रीअत्रिमहर्षी श्रीब्रह्मदेवांच्या प्रेरणेने,
पुत्रपाप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करावी म्हणून श्रीअनसूया या आपल्या पत्नीसह ऋक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. ॥१०॥
तार्क्ष्यासनस्थोऽब्दशतं संयतात्माऽनिलाशनः ॥ निर्द्वन्द्वः सुतरां दध्यावेकं तादृक्‌प्रजाप्तये ॥११॥
प्रापुरत्रिं कविष्ण्‍वीशाः स्वस्वचिह्नान्वितास्ततः ॥ तपसा तस्य सन्तुष्‍टा वरदानोत्कमानसाः ॥१२॥
ऊचुस्त ऋषे सत्सङकल्प न तेऽसत् ॥ ह्रद्यं हि य एको ध्यातः स इतः कः ॥१३॥
मादृक्सुतलब्ध्यै वृत्तश्रमसिद्धयै ॥ दत्तोऽद्य मयाऽऽत्माऽयं ते सकलात्मा ॥१४॥
एवं दत्वा वरं सद्यो देवा अन्तर्हितास्त्रयः ॥ अथावतरदग्रेऽत्रेर्दत्तात्रेयश्चतुर्भुजः ॥१५॥
चित्त ताब्यात ठेवून व केवळ वायूचा आहार करुन तप करणार्‍या द्वंद्वातीत श्रीअत्रिमुनींनी, श्रीगरुडासनावर राहून त्या
एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान, तसा पुत्र व्हावा म्हणून शंभर वर्षे केले. ॥११॥
अशी तपश्चर्या झाल्यावर, त्या तपाने संतुष्‍ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे श्रीब्रह्मा, श्रीविष्णू व श्रीमहेश्वर हे तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करुन श्रीअत्रिऋषींच्या आश्रमात प्राप्त झाले. ॥१२॥
आणि असे म्हणाले की, "हे ऋषे ! तू सत्यसंकल्प आहेस व तुझे मनीषित असत्य होणार नाही. ज्या एक तत्त्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस, ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे ? ॥१३॥
माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस, याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता, मी सर्वस्वरुप असा माझा
आत्माच तुला दिला आहे." ॥१४॥
याप्रमाणे तीनही देवांनी श्री अत्रिमुनींना वर देऊन ते तत्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्रीदत्तात्रेय श्रीअत्रिऋषींसमोर प्रकट झाले.
॥१५॥
आप्तकामोऽपि भगवान् श्रीदत्तो योगमायया ॥ दर्शयन् भक्तवशतां सन्तोष्य पितरौ स्थितः ॥१६॥
अथ कश्चिद्‌द्विजवरः सर्वसंस्कारसंस्कृतः ॥ अधीतवेदवेदाङगश्चरिताश्रमसत्क्रियः ॥१७॥
चतुःसाधनसम्पन्नो दैवीसम्पत्समन्वितः ॥ एवं सन्नपि नो शान्तिं प्राप्तोनानाश्रुतभ्रमात् ॥१८॥
"गुरुक्तार्चाकल्पनया ह्रत्स्थैर्याद्बोध उद्भवेत् "॥ इत्यौपनिषदं दत्तं ध्यात्वा सम्पूज्य यत्नतः ॥१९॥
तिष्‍ठन्तं खिन्नह्रदयं विषीदन्तं शुचान्वितम् ॥ त्रातुमाविरभूत् श्रीमान् दत्तात्रेयो दिगम्बरः ॥२०॥
नित्यतृप्त असे भगवान् श्रीदत्तप्रभू, आपली भक्ताधीनता दाखविण्याकरिता, मातापितरांना संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात
राहिले. ॥१६॥
नंतर कोणे एके काळी, एक ब्राह्मण, गर्भादानादि सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा, वेदवेदांगांचे अध्ययन करुन आश्रमधर्माचे
अनुष्‍ठानही ज्याने केले आहे असा, एके ठिकाणी राहात होता. ॥१७॥
विवेकवैरागयादिसाधनचतुष्‍टयसंपन्न व अभय, सत्त्वशुद्धी इत्यादि श्रीमद्‌भगवदीतोक्त दैवी संपत्तीने युक्त असूनही, अनेक शास्त्रे
श्रवण करुन झालेल्या धर्मामुळे तो ब्राह्मण चित्तशांती मिळवू शकला नाही. ॥१८॥
श्रीसद्गुरुंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होऊन तत्त्वबोध उत्पन्न होतो म्हणून उपनिषत्प्रतिपाद्य श्रीदत्तांचे ध्यान-
पूजन प्रयत्नपूर्वक करुनही, दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या व विषाद्, शोक यांनी युक्त असणार्‍या त्या ब्राह्मणास
तारण्याकरिता, योगश्रीमान् दिगंबर श्रीदत्तप्रभू त्याच्यासमोर प्रगट झाले. ॥१९-२०॥
मनोहरे मार्गशीर्षे शुक्लपक्षे गुरोर्दिने ।
प्रदोषे पूर्णिमायां भे मृशशीर्षाभिधे शुभे ॥२१॥
प्राह विप्र किमर्थं त्वं दुर्मना इव लक्ष्यसे ॥
वद सर्व ममाग्रे त्वं दौर्मनस्यस्य कारणम् ॥२२॥
तं प्रत्युवाच तद्भक्तियन्त्रितो नतकन्धरः ॥
विमुक्तो मुच्यतेऽनर्थादिति श्रुत्वा तदीहया ॥
प्रवृत्तस्य ममाज्ञस्य भ्रमदोऽभूत्‌श्रुतार्णवः ॥२३॥
एतेषां कतमः श्रेयान् शिवः पन्था भयोझ्झितः ॥
सुगमो मेऽद्य कृपया सम्प्रदर्शय सद्गुरो ॥२४॥
श्रीदत्त उवाच ॥ समीचीनः कृतोऽयं हि प्रश्नोऽतोऽवहितः शृणु ॥
श्रुत्या युक्तयानुभूत्या च यत्सत्यं तद् ब्रवीमि ते ॥२५॥
मनोहर मार्गशीर्ष मास, शुक्लपक्ष पौर्णिमा तिथी, मृग नक्षत्र, गुरुवार अशा समयी प्रदोषकाळी भगवान् श्रीदत्तात्रेय प्रगट झाले.
॥२१॥
आणि त्या ब्राह्मणास असे म्हणाले की, "हे विप्रा ! तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर सांग." ॥२२॥
त्या वेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन भगवान् श्रीदत्तात्रेयांना नमस्कार करुन तो ब्राह्मण असे म्हणाला की, "ज्ञानवान् पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून, त्या इच्छेने, मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले; परंतु माझा भ्रम गेला नाही. ॥२३॥
तेव्हा यांपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कोणता कल्याणकारक, कोणता निर्भय व कोणता मार्ग सुगम आहे, हे सद्गुरो ! तो कृपा
करुन मला सांगा." ॥२४॥
श्रीदत्त असे म्हणाले की, "तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे. म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन
केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य ते तुला सांगतो. ॥२५॥
ईश्वराराधनधिया स्वधर्माचरणात् सताम् ॥
ईशप्रसादस्तद्रूपः सुलभश्चात्र सद्गुरुः ॥२६॥
सद्गुरोः सम्प्रसादेऽस्य प्रतिबन्धक्षयस्तथा ॥
दुर्भावनातिरस्ताराद्विज्ञानं मुक्तिदं क्षणात् ॥२७॥
सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये ॥
सत्यस्य सत्यमुत सत्यनेत्रं सत्यात्मकं मां खलु विद्धि सत्यम् ॥२८॥
द्विपैकदेशमालम्ब्य यथान्धा द्विपवेदिनः ॥
अन्योन्यं कलहायन्ते शास्त्रौघोऽयं तथाल्पदृक् ॥२९॥
विज्ञाय तत्त्वं भवता मदुक्तेर्बुध्द्वा सदैवोपनिषन्मतं सत् ॥
स्थेयं तदालोचन एव तेन मुक्तिः कृतार्थत्वमिहैव तेऽस्तु ॥३०॥
इति श्रीह्रत्पुण्डरीकाधिष्‍ठित श्रीमत् परमहंसपरिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तव्रताख्याने प्रथमोऽध्यायः ॥१॥
श्रीगुरुदेवदत्त ॥
मी ही ईश्वराची आराधनाच करीत आहे, अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे अनुष्‍ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वराचा
प्रसाद होतो. म्हणजे तद्रूप श्रीसद्गुरु सुलभ होतात. ॥२६॥
श्रीसद्गुरुंचा उत्तम प्रसाद झाला असता, जीवांच्या अज्ञानरुप प्रतिबंधाचा नाश होतो तसेच दुष्‍ट भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी
मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. ॥२७॥
सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्‍ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे, हे तू
निश्चयपूर्वक जाण. ॥२८॥
जसे एक एक अवयव चांचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे, हत्ती असाच आहे असे आपापसात
भांडण करतात; तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रौघाविषयी होतो. ॥२९॥
याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून, उपनिषदांना संमत असलेले सत्तत्त्व जाणून, त्याचे आलोचन करण्यातच तू मग्न
असावेस. त्या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील" असा त्या ब्राह्मणास प्रभुश्रीदत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला. ॥३०॥
॥इति श्रीसत्यदत्तव्रताख्याने प्रथमोऽध्यायः॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP