मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र| अध्याय नववा गुरूचरित्र विशेष माहिती प्रस्तावना श्रीगुरुचरित्र पारायण-पद्धती पारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहेतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तीसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतीसावा अध्याय अडतीसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा अध्याय बेचाळीसावा अध्याय त्रेचाळीसावा अध्याय चव्वेचाळीसावा अध्याय पंचेचाळीसावा अध्याय सेहेचाळीसावा अध्याय सत्तेचाळीसावा अध्याय अठ्ठेचाळीसावा अध्याय एकोणपन्नासावा अध्याय पन्नासावा अध्याय एकावन्नावा अध्याय बावन्नावा अध्याय त्रेपन्नावा गुरुचरित्र - अध्याय नववा श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi. Tags : gurucharitrapothipuranगुरूचरित्रपुराणपोथी अध्याय नववा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ।ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन । विनवीत कर जोडून । भक्तिभावे करोनिया ॥१॥श्रीपाद कुरवपुरी असता । पुढे वर्तली कैसी कथा । विस्तारूनि सांग आता । कृपामुर्ति दातारा ॥२॥सिद्ध म्हणे नामधारका । पुढे कथा अपूर्व देखा । तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव । विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ॥४॥नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती । लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ॥५॥ज्याचे दर्शन गंगास्नान । त्यासी कायसे आचरण । लोकानुग्रहाकारण । स्नान करीत परियेसा ॥६॥वर्तता ऐसे एके दिवशी । श्रीपाद यति येती स्नानासी । गंगा वहात असे दशदिशी । मध्ये असती आपण ॥७॥तया गंगातटाकांत । रजक असे वस्त्रे धूत । नित्य येऊनि असे नमित । श्रीपादगुरुमूर्तीसी ॥८॥नित्य त्रिकाळ येवोनिया । दंडप्रमाण करोनिया । नमन करी अतिविनया । मनोवाक्कायकर्मे ॥९॥वर्तता ऐसे एके दिवशी । आला रजक नमस्कारासी । श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्ते परियेसा ॥१०॥श्रीपाद म्हणती रजकासी । का नित्य कष्टतोसी । तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी । सुखे राज्य करी आता ॥११॥ऐकता गुरूचे वचन । गाठी बांधी पल्लवी शकुन । विनवीतसे कर जोडून । सत्यसंकल्प गुरुमूर्ति ॥१२॥रजक सांडी संसारचिंता । सेवक जाहला एकचित्ता । दुरोनि करी दंडवता । मठा गेलिया येणेचि परी ॥१३॥ऐसे बहुत दिवसांवरी । रजक तो सेवा करी । आंगण झाडी प्रोक्षी वारी । नित्य नेमे येणे विधी ॥१४॥असता एके दिवशी देखा । वसंतऋतु वैशाखा । क्रीडा करीत नदीतटाका । आला राजा म्लेछ एक ॥१५॥स्त्रियांसहित राजा आपण । अलंकृत आभरण । क्रीडा करीत स्त्रिया आपण । गंगेमधून येतसे ॥१६॥सर्व दळ येत दोनी थडी । अमित असती हस्ती घोडी । मिरविताती रत्नकोडी । अलंकृत सेवकजन ॥१७॥ऐसा गंगेच्या प्रवाहात । राजा आला खेळत । अनेक वाद्यनाद गर्जत । कृष्णावेणि थडियेसी ॥१८॥रजक होता नमस्कारित । शब्द झाला तो दुश्चित । असे गंगेत अवलोकित । समारंभ राजयाचा ॥१९॥विस्मय करी बहु मानसी । जन्मोनिया संसारासी । जरी न देखिजे सौख्यासी । पशुसमान देह आपुला ॥२०॥धन्य राजयाचे जिणे । ऐसे सौख्य भोगणे । स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा भक्त ईश्वराच ॥२१॥कैसे याचे आर्जव फळले । कवण्या देवा आराधिले । कैसे श्रीगुरु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ॥२२॥ऐसे मनी चिंतित । करीतसे दंडवत । श्रीपादराय कृपावंत । वळखिली वासना तयाची ॥२३॥भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । जाणोनि अंतरी त्याची स्थिति । बोलावूनिया पुसती । काय चिंतिसी मनांत ॥२४॥रजक म्हणे स्वामीसी । देखिले दृष्टी रायासी । संतोष झाला मानसी । केवळ दास श्रीगुरूचा ॥२५॥पूर्वी आराधोनि देवासी । पावला आता या पदासी । म्हणोनि चिंतितो मानसि । कृपासिंधु दातारा ॥२६॥ऐसे अविद्यासंबंधेसी । नाना वासना इंद्रियांसी । चाड नाही या भोगासी । चरणी तुझे मज सौख्य ॥२७॥श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी । वांछा असे भोगावयासी । राज्यभोग तमोवृत्ति ॥२८॥निववी इंद्रिये सकळ । नातरी मोक्ष नव्हे निर्मळ । बाधा करिती पुढे केवळ । जन्मांतरी परियेसी ॥२९॥तुष्टवावया इंद्रियांसी । तुवा जावे म्लेछवंशासी । आवडी जाहली तुझे मानसी । राज्य भोगी जाय त्वरित ॥३०॥ऐकोनि स्वांमीचे वचन । विनवी रजक कर जोडून । कृपासागरू तू गुरुराज पूर्ण । उपेक्षू नको म्हणतसे ॥३१॥अंतरतील तुझे चरण । द्यावे माते पुनर्दर्शन । तुझा अनुग्रह असे कारण । ज्ञान द्यावे दातारा ॥३२॥श्रीगुरु म्हणती तयासी । वैदुरानगरी जन्म घेसी । भेटी देऊ अंतकाळासी । कारण असे येणे आम्हा ॥३३॥भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होल तुझे मानसी । न करी चिंता भरवसी । आम्हा येणे घडेल ॥३४॥आणिक कार्यकारणासी । अवतार घेऊ परियेसी । वेष धरोनि संन्यासी । नाम नृसिंहसरस्वती ॥३५॥ऐसे तया संबोधूनि । निरोप देती जाय म्हणोनि । रजक लागला तये चरणी । नमस्कारीत तये वेळी ॥३६॥देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती । इह भोगिसी की पुढती । राज्यभोग सांग मज ॥३७॥रजक विनवीत श्रीपादासी । झालो आपण वृद्धवयेसी । भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनगोड राज्यभोग ॥३८॥ऐकोनि रजकाचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण । त्वरित जाई रे म्हणोन । जन्मांतरी भोगी म्हणती ॥३९॥निरोप देता तया वेळी । त्यजिला प्राण तत्काळी । जन्माता झाला म्लेछकुळी । वैदुरानगरी विख्यात ॥४०॥ऐसी रजकाची कथा । पुढे सांगून विस्तारता । सिद्ध म्हणे नामधारका आता । चरित्र पुढती अवधारी ॥४१॥ऐसे झालीया अवसरी । श्रीपादराय कुरवपुरी । असता महिमा अपरंपारी । प्रख्यात असे परियेसा ॥४२॥महिमा सकळ सांगता । विस्तार होईल बहु कथा । पुढील अवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ॥४३॥महत्त्व वर्णावया श्रीगुरूचे । शक्ति कैची या वाचे । नवल हे अमृतदृष्टीचे । स्थानमहिमा ऐसा ॥४४॥श्रीगुरु राहती जे स्थानी । अपार महिमा त्या भुवनी । विचित्र जयाची करणी । दृष्टान्ते तुज सांगेन ॥४५॥स्थानमहिमाप्रकार । सांगेन ऐक एकाग्र । प्रख्यात असे कुरवपूर । मनकामना पुरती तेथे ॥४६॥ऐसे कित्येक दिवसांवरी । श्रीपाद होते कुरवपुरी । कारण असे पुढे अवतारी । म्हणोनि अदृश्य होते तेथे ॥४७॥आश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसी । श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥४८॥लौकिकी दिसती अदृश्य जाण । कुरवपुरी असती आपण । श्रीपादराव निर्धार जाण । त्रयमूर्तिचा अवतार ॥४९॥अदृश्य होवोनि तया स्थानी । श्रीपाद राहिले निर्गुणी । दृष्टान्त सांगेन विस्तारोनि । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥५०॥जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ । कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ । असे प्रख्यात भूमंडळी ॥५१॥सिद्ध सांगे नामधारकासी । तेचि कथा विस्तारेसी । सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ॥५२॥इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ॥९॥ओवीसंख्या ॥५२॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु N/A References : N/A Last Updated : December 09, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP