१.

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

मांडव गोताचा दणका भारी

घाणा जी घातिला खंडीभर भाताचा

आधी मान देती कुंकवाला

आधी मान देती हळदीला

२.

गुंडयान बांधल तळ राखेन बांधल आळ

त्यात पान येल रुजू घातली

एक पान पानवेली दोन पान झाली

दोन पान पानवेली बी खवली

दोन पान पानवेली तीन पान झाली

तीन पान पानवेली कुडी फुटली

तीन पान पानवेली चार पान झाली

चार पान पानवेली वेलू चढली

चार पान पानवेली पाच पान झाली

पाच पान पानवेली सहा पान झाली

सहा पान पानवेली फळ कुंबेटी झाली

सहा पान पानवेली सात पान झाली

सात पान पानवेली फळ सोकावली

३.

नकी तेल ग चढईल चढईल राजाराणी

महादेवाच्या घरी यो

तेल जे चढीवताना अंकराच्या पार्वती ईश्वराच्या दामावंती

अशा येतील पाचजणी नवरीस तेल लाविती

पोटरी तेल ग चढईल चढईल राजाराणी

महादेवाच्या घरी यो

तेल जे चढीवताना अंकराच्या पार्वती

ईश्वराच्या दामावंती

अशा येतील पाचजणी नवरीस तेल लाविती

४.

माळाच्या माळसेणी गंगेच जाय पाणी

पाणी तापीव भैणी नवरीच्या

आमची नवरी गिंडीन पाणी न्हाइ

सारंग लोटू जाई केळी बना

५.

आठ शेर कापूस नऊ शेर वळल्या वाती

पाचजणीतली एक सखी कुंकू लाविती

आठ शेर कापूस नऊ शेर वळल्या वाती

पाचजणीतली एक सखी हळद लावित्ती

पाचजणीतली एक सखी आरती करीती

६.

करे भरू आल्या रुक्मीणी नारी

थंडेसी सावळी फणवसडे दारी

लेक मागते कमळाबाई तिला नाकच न्हाई

७.

चीपनळी सारजा आहा लागली गरजा

लागली गरज वाशिंगाची

लागली गरज मंगळसुत्राची

८.

गंदा धुपावरन चला मामान पेरावा केला

शेली याचे जोड कृष्णा लेवू लागला

गंदा धुपावरन चला मामान पेरावा केला

गळ्यातली कंठी कृष्णा लेऊ लागला

९.

भरताराच्या पायी पुजीवली आकीता

कुळदेव म्हणतो कौतुक लेकी पड गे पाया

पायाजी पडताना कुळदेव हासतो

खांबल्या तासतो चंदनाच्या

भरताराच्या पायी पुजीवली आकीता

आई बाप म्हणती कौतुक लेकी पड गे पाया

पाया जी पडताना कुळदेव हासतो

खांबल्या तासतो चंदनाच्या

१०.

साडे सोळा गहू दळा साडे सोळा गहू दळा

बढाण भर गे भागडणी नवरीच्या भैणी सुगडीनी

त्या बढणात काय काय परी

भात भरला शिगोशिगी पापड लावले हारोहारी

सांडगे लावले परोपरी तूप ओतल धारोधारी

त्यात खोबर्‍याची वाटी त्यावर नवरंगी सूप

त्यावर चोळीचा खण त्यावर पानाचा विडा

त्यावर नवलाक दिवा घे गा नवर्‍या नवरीच नाव

घे गे नवरी नवर्‍याच नाव उघड बढाण दोघे जेऊ

११.

दिष्ठ झाली सावळ्या नवरा नवरीस्‌

दिष्ठ झाली म्हणुनी त्यांचे आजा आजी उतरू गेले

गडियावैन पाय देवुन चला

पाय जे देतान मिठाचे साकोरे

दुनियातले कंकोरे बजीर चूड

दिष्ठ झाली म्हणुनी त्यांचे आईबाप उतरू गेले

१२.

दार धरीयो पाय धरीयो का भैनी दार धरीयो ?

बंधु तुझी कन्या मिया मागो आलो

भरली घागर हालेना डुलेना

बंधु तुझी लेक मागतो राणी का बोलेना

१३.

मायबापान दिल ताट त्यात वतल त्याल

देव्हार्‍यावर मारले चट्‌टे देवाजी मामजीनु हाव पुसू

आपल्या कुळदेवा घालू जाती उदू

१४.

दे रे देवा बुद जलम जोगी

केसरी त्याल दे उतरीयो उतरीयो राजाराणी

महादेवाच्या घरी यो

तेल जे उतरताना अंकाराच्या पार्वती

ईश्वराच्या दमावंती

अश येतिल पाचजणी नवरीस तेल लावती....

छाती त्याला दे उतरीयो

१५.

भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो

भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो

पाटाच पाणी सारंगी जातो

हळदीचा लोट पारवा पितो.....

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP