मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|लग्नातील गाणी| सौ . कुमुदिनी पवार लग्नातील गाणी सौ. मीनाक्षी दाढे सौ. यशोदा पाटील सौ . कुमुदिनी पवार संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्राहिका - सौ . कुमुदिनी पवार लग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत. Tags : ganigeetlokgeetmarriageगाणीगीतलग्नलोकगीत संग्राहिका - सौ . कुमुदिनी पवार Translation - भाषांतर नवरदान घेता होतों अंगाचा थरकाप हावशा बाळा माज्या आहे पाठीशी उभा बापहळद गजबजी पिवळं झाल्याती माजं पायीनवरदेवा बाळा लेका तुजी मी वरमाईमारुतीरायाच्या देवळी लहान नवरा सांगीयीतीबाळाला माज्या मामा पिवळामंदील बांधीयीतीहळद गजबजी हळदीबाईचा पिवळा ठसासयांना किती सांगू बाळ माझा ग देवमासाहळद गजबजी पिवळं झाल्याती माझं बाहूसयांना किती सांगू नवरदेव ग माझा भाऊआयांनू बायांनू ग तुम्हा सांगते वाणायालाहळद लागय़ीली माज्या चंदरबाणायीलामोठयाचा नवयीरा कसा निघाला घाई घाईकरवली ग चतूईर त्येच्या गालाला काळं लाईआयांनू बायांनू ग तुम्हां पदर पालवीतेबाळाच्या माझ्या तुम्हा हळदीची ग जाती आयांनू बायांनू ग तुम्हा येती मी काकुलती बाळाची माझ्या बाई येळ हळदीची ग जाती आयांनू बायांनू ग आपून मानाच्या पहीयील्याबाळाचा घाणा चला भराया बोहीयील्यानवरदेवा परायास करवली ग उताय़ीळ दिव्याच्या उजेंयीडी बाई वविती मुंडायीळ वाजत गाजयीत आली दुरडी केळायाची वरमाई ग झाली गोरी आपुल्या बाळाचीनवर्या परायास करोलीबाईचा दिमाईखबाई ग माझी चाले हिल्लाळ समुयीखकन्यादानाची करा घाई मामा आणि मावळण मानाची मावळण आहे भाग्याची गवळण हळद गजबजी बाई पिवळा माझा गोट नवरदेवायाला कोण भरीते मळवटवर्हाड उतरीलें आंबा सोडुन चिंचेखालीगावात वर्दी गेली मैन भावाची यीन झाली मांडवाच्या दारी बाजा वाजतो र्हाऊ र्हाऊपायामधी तोडा उभा नवर्याचा भाऊमांडवाच्या दारी बाजा वाजत र्हाऊंद्याबाळायाचा घोडा मला खेळता पाहूंद्यामांडव बाई घाला जागा पईस रुंद धरालई गोताचा नवय़ीरामांडव बाई घाला जोतं सोडून सव्वा हात नवर्या बाळाचं लई गोत मांडव बाई घाला निच्चळ झेंडवाचाछंद नवर्याच्या बंदवाचाइवाई करु गेल दीर दाजीबा बोलेनातमला इवाई पेलेनात इवाई करु गेले यीनी नाईत्या माज्या तोलाबंधूसाठी म्या बोल दिलावीस पुतळ्यावरी सरी दाब झळकीतो साडीवरी नवरी मामाच्या कडीवरी N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP