संदर्भ - इतर ९

पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.


सरला माझा दळप

सती भरली गंगा

कापुराची आरती

मींया ओवाळी पांडुरंगा ।१२१।

सरला माझा दळप

सुप सारीता पलीकडे

सासरी नि माहेरी

राज्य मागते दोनीकडॆ ।१२२।

सरला माझा दळप

पीठ काढी मी परातीत

माझ्या त्या गुरुजीचा

नाव घेई मी आरतीत ।१२३।

माहेरीच्या नि रे देवा

तुला कैशाची धाडू भेट ?

फुलांनी भरी ताट

दुरसून जोडी हात. ।१२४।

न्हाननी माझा घर

सप्या लोट्यांनी दिसे थोर

कापासाच्या गाद्येवर

पटी वाचिता माझो बाळ ।१२५।

वाटेनि वयला घार

येत्या जात्याची म्हनी पानी

आई बापाची मींया तानी

हात उचलून देई म्हनी ।१२६।

पिकला कवणाळ

मुनापासून ताम्यालाल

पिरतीचो भरतार

मनापासून करी खेल. ।१२७।

वांजीच्या नि रे घरा

तीन दिसांचा शेळा पानी

सकाळी उठोनिया

सुर्या घाली ध्यानी ।१२८।

वांजीच्या नि रे घरा

धान्या मुडयांचो पडलो दाळ

सकाळी उठोनिया,

शेजेबाईचा ताना बाळ

त्याला बघूनी करी जाळ ।१२९।

वांजीच्या नि रे घरा

सोन्याचे सपे लॉटे

पोरी नाही पूत्र फळ

सत्यार कोण बसे ? ।१३०।

वाजीच्या नि गे घरा

सोन्याचा पाळणा

देवा तू नारायणा

करु नको छळना ।१३१।

दिस नि माऊळलो

एकवीस वारा खाली गेलो

वांजीन नवस केलो

रा्मा, फुकट वाया गेलो ।१३२।

पोटी नाही पूत्र फळ

पोसू घेतीलो गे जायेचो

पंढरे गे पुरामधी

पिड दिलो धरमाचो ।१३३।

पोटी नाही पुत्र फळ

पोसूं घेतीलो सवतीचो

पंढरे गे पुरामधी

पिंड दिलो वंवशाचो ।१३४।

पंढरे पुरामधी

उभी होतय चिर्‍यांवरी

नजर गेली माझी

रुक्मीण बाईच्या गोपावरी ।१३५।

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP