मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय आठवा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय आठवा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय आठवा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥सद्गुरो ! तुझियासारखा । असता मज पाठीराखा ।आता कवणाचा करू लेखा? कासया स्वामी !॥१॥मज चातकाची तहान । पुरविसी तूचि अमृतघन ।करी मायानिवारण । आत्मगुज दाखवी ॥२॥म्हणोनि पुढतपुढती चरणी। आर्तपणे शिष्य घे लोळणी ।संबोखी सद्गुरु कृपादानी । वरद हस्ते ॥३॥म्हणे ऐकपा शिष्यराया! असे कुठली कोण माया? ।ही तव कल्पनेचीच छाया । नशी विलया तूच की ॥४॥आणि आत्मा काय अप्राप्त? अरे तूचि तो निभ्रांत ।काय तळमळसी व्यर्थ । शब्द जंजाळी गुंतोनि? ॥५॥एकाचे दुसरेच भास । तया नाव माया असे ।हे तरी कल्पनेचेचि पिसे । उगाचि भास विपरीत ॥६ ॥गडके गाडगे रांजण परळ । ती तर माती केवळ |रूपाकारे नामे सकळ । वेगळी भासती ॥७॥तैसीच भूतभौतिक सृष्टी । असो व्यष्टी की समपष्टी ।मुळी पाहता तत्वदृष्टी । एकमय सारे॥८॥निवांत सच्चिदानंद ब्रम्ही । बहु व्हावे ही स्फुरली ऊर्मी ।ती साकारली साउमी । विश्वरूपाने ॥९॥भिन्न भिन्न सारी रूपे नामे । तेणे भिन्नत्व भासे भ्रमे ।मुळी पाहता एकेचि ब्रह्मे । व्याप्त हे सारे ॥१०॥शेला सदरा धोतर लुगडे । पाहता सूतचि ते उघडे ।भेद व्यवहारी, तत्वी न घडे । तैसे विश्व ब्रम्ह ॥११॥कैची व्यष्टी कैची समष्टी ? एकचि व्यापक परमेष्टी ।व्याघ्र-गाय ही सारखेची सृष्टी । एक गोडीच साकारली ॥१२॥भिन्न रूपमाने इतुकीच माया। ती मिथ्याम्हणोनि मोह सोडी राया ।शोधी मूळच्या तत्वठाया । ज्ञानदृष्टी उघडूनि ॥१३॥दोर सर्प नाहीच झाला । तो भ्रमेचि भासला ।दुःखदायी भयकंप उपजला । आपुल्याच भावे ॥१४॥तैसे विश्वाचिया नामरूपे । आसक्तिद्वेषादि वाढली पापे ।जीव पोळला विविध तापे । स्वप्नसृष्टीपरी ॥१५॥मुळी तू सच्चिदानंदरूप । बिंव परब्रह्मस्वरूप ।जाणोनि घेता हरशील ताप । आपणचि की ॥१६॥सोह तत्वमसि अयं आत्मा ब्रम्ह। हाच श्रुतीचा मंत्र परम ।साधुसंतही वाजविती डिंडिम। जीव तो शिव म्हणोनि ॥१७॥स्थूल-सूक्ष्म-कारण-महाकारण। पंचकोश तनु-मन-प्राण ।यांचा सोडूनि दे अभिमान । अधिष्ठान यांचे तू ॥१८॥तुझे साक्षित्व जिवी पटले । अभ्यासे ते दृढावले ।तरी हे अभिमान सर्व गेले । आपैसेचि ॥१९॥आणि अभिमानांच्या आधारे। लिंगदेही भरले वासना -वारे ।तेही मग केवी उरे ? एक तूचि शुद्धबुद्ध ॥२०॥महावाक्याचे हेचि वर्म । स्वये तुचि शुद्ध ब्रह्म ।अहं ब्रम्हास्मि घोष उत्तम । ब्रम्हांडी घुमूदे ॥२१॥परी मी एक साक्षी ब्रम्ह । अभिमानही असे भ्रम ।त्याचाही देखणा आत्माराम । स्वये तूचि ॥२२॥स्वये अपुला अनुभव घेई। परी अनुभविता भिन्न न होई ।जाणत्यासी जाणता ठायीचे ठायी । मौनत्व लाभे ॥२३॥ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान त्रिपुटी । भिन्न करूनि न होई हिंपुटी ।आपुल्यातचि होऊ दे आटी । पाहतेपणाची ॥२४॥दुजेपणासह एकपणा । विरू दे आपणात आपला ।स्वसंवेद्य नू निरंजना । स्वस्थ राही ॥२५स्वस्थ तरी मुळीच आहे । वृत्त्यादि उठती विरती पाहे ।विचलित न हो त्यांच्या प्रवाहे। होवो जावो काही किती ॥२६॥तू तो केवळ तूचि होई । देहादि भाव झुगारी सर्वही ।मग व्यष्टिपण मिळे हेही । समष्टीमाजी ॥२७॥समष्टी तरी वेगळी कैची ? सारे विश्व रूप तुझेचि ।उपाधी पिंड-ब्रम्हांडाची । कल्पनारूप ॥२८॥एरवी पाहता कणोकणी । चराचरी चतुर्दश भुवनी ।नाही स्वरूपावाचूनि । वेगळी वस्तू ॥२९॥वेगळा भास ते अन्यथा भान । मुळी तू एक चैतन्यघन ।सागरामाजी बर्फासमान । अद्वैत सारे ॥३०॥दागिना असताचि सुवर्ण बघावे । तैसे जगी ब्रम्ह ओळखावे ।जगासी त्यागोनि पळावे । नलगे काही ॥३॥नाही वनगमनाचे काम । नलगे धूंडावे तीर्थधाम ।नको कायाक्लेशादि तपसंभ्रम । लाभे सार संसारी ॥३२॥देह करो का प्रपंची काम । मनी परोपकारी प्रेम ।हृदयी अनुभवी आत्माराम । पंथ हाचि सर्वोत्तम ॥३३॥इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्त-सार-संमत ॥तुकड्यादास विरचित । अष्टमाध्याय अमोलिक I।३४॥सट्गुरुनाथ महाराज की जय ! N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP