मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय दुसरा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय दुसरा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय दुसरा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥जय जयाजी निपुणात्मा ! भक्तकाम कल्पद्रुमा ! ।धावसी दासाचिये कामा । नाम घेता सद्गुरु ! ॥ १ ॥मी तो अज्ञान पामर । न जाणे ज्ञानाचा विचार ।म्हणोनि जोडोनि द्वय कर । शरण आलो स्वामिया! ॥ २॥कैसा पावेन तुझिया स्वरुपा । नेणेवेचि पंथ सोपा ।म्हणोनि काळाचे आटोपा। बुडालो सर्वस्वी गुरुमाते! ॥ ३ ॥मी पण देहाभिमानी झाले। माझे करिता व्यर्थ गेले ।एकाएकी चोर भरले । देहामाजी न सांगवे ॥१५॥कैसी होईल माझी स्थिती ? काय सांगू अवगुण किती।व्यर्थ जाईल देहस्थिती । भोगावया जीव हा ॥१६॥किती सांगावे सांगणे ? पाठी घेतली अवगुणे ।संसारहेतू तुटे जेणे । ऐसे करा स्वामिया ! ॥१७॥आता फार काय बोलावे । समर्थाला सर्व ठावे।दासे दासत्वपण राखावे । ऐसे करी माते वो ! ॥१८॥सोडूनिया ऐसी माता । इतरा कवणा वंदू आता ? ।जयजयाजी सद्गुरुनाथा ! पुरवी काजा येवोनिया ॥१९॥सोडोनिया ज्ञातेपण । सद्-भावे आलो शरण।दासा दावोनि भवतरण । पार लावी नौकाही ॥२०॥तोडी द्वैताचा संबंध । मिटवी वैखरीचा वाद।भरवी आनंद-संवाद । हृदयी माझ्या ॥२१॥तव रसना अमृत गोमटी । ती या वाचे पूर रोटी ।भरवी मन हृदय-संपुष्टी । येवोनिया सद्गुरो ! ॥२२॥देखोनिया शिष्य-भाव । प्रसन्न झाला सद्गुरुराव ।पुढिलिये प्रकरणी ठेव । दावियेली सद्-भावे ॥२३॥इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्तसार संमत ।तुकड्यादास विरचित । द्वितीय अध्याय संपूर्ण ॥२४॥0 सद्गुरुनाथ महाराज की जय ! 0हा तव अज्ञ पुत्र बापुडा । अंधकारी बुडाला गाढा ।काढावयासी हा पवाड़ा । चरणी वदिंतो सद्-भावे ॥४॥सर्वचि माझे ऐसे वाटे । भोगपणी येती काटे ।म्हणोनि हा बहु ओक्षटे । भोगतसे स्वामिया ! ॥५॥जी जी भावे करणी । ती ती होतसे शिर-कापणी ।ऐसाचि हा अज्ञानी । नाना दु:खी बुडाला ॥६॥मायापाशी गुंडाळला । आळसी झाला उपासनेला ।न दिसे मार्ग दुजा मनाला । उद्धरावया जीव हा ॥७॥कळेना काय केवी करावे? कोणा धरूनी काय हरावे ?।कैसे कृत्य करी घ्यावे ? तुटावया भवपाश ॥८॥कैसा नेम मी धरावा ? जेणे भवाब्धी हा तगवा ।शुद्ध प्रेमा हृदयी भरावा । निजानंद पाहावया ॥९॥बहु पंथ मते फार । न कळे मतांचा विचार ।न मिळे मार्ग सविस्तर । ऐक्यरुप व्हावया ॥१०॥मृगजळ सत्यचि वाटे । वाटते पण नवचे, आटे ।चाखू जाता हदय फाटे । न फिटे भ्रांति-पडळ ॥११॥माते! तूते न सांगवे । ऐसे अवगुण धरिले जीवे ।पुन्हा पुन्हा वृत्ती धावे । असत्याकडे ॥१२॥जडी आसक्ती न सुटे । मन चंचल भटके वाटे ।स्थिर क्षण न एकटे । निश्चली ते राहात ॥१३॥पंचविषयी रतले बरवे । जडले सर्वस्वी स्वभावे।कसे तुटेल न आठवे । मज लागूनि सद्गुरो ! ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP