॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥
स्वामी! मी तो जाहलो धन्य। पावलो तुमचे कृपानिधान ।
वैराग्य झालिया मनन । काय कैसे करावे? ॥१॥
तव बोले श्रीगुरु साक्षी । जो का कामदिकांचा भक्षी ।
निरिच्छ निर्मल हंसपक्षी । पदवी जया न लागे ॥२॥
ऐक जीवाचे शरीर । तया तीन अवस्थांतर ।
स्थूल-सुक्ष्म-कारण घर । तया जीवासी जाणिजे ॥१३॥
स्थूलाआत सृक्ष्म घट । सूक्ष्माही आतकारणमठ ।
जीव अभिमानियाचे पीठ । निश्चयेसी जाणावे ॥१४॥
तया जीवास घटाभिमान । म्हणोनि तो देहाभिमानी पूर्ण ।
विश्व-तैजस-प्राज्ञ । नामाभिधान तयासी ॥१५॥
जीवासी घटीचा अभिमान । ईश्वर सांभाळी विश्वजन ।
तयास हिरण्यागर्भादि भान । पाळावे लागे सर्वदा ॥१६॥
चौथा देह महाकारण । जेथे न राहीच अज्ञान ।
कूटस्थ ईश्वर मुक्त चैतन्य । दृश्यातीत ॥१७॥
जीव तरी घटाभिमानी । म्हणोनि फिरतसे बहु योनी ।
तया बुध्दी मलीनपणी । संगे फिरवी सर्वदा ॥१८॥
बुध्दी ही तो जडचि जाण । जीवात्मा तो असंगी पूर्ण ।
परी सुखदुःखाचे अवघटन । भोगावे लागे संमेलनी ॥१९॥
तयाचे मुकावया भोगतेपण। चुकवावया दु:खादि दारुण ।
म्हणोनि वैराग्य हे साधन । धरणे लागे तयासी ॥२०॥
अवघी सृष्टी भासिक जाणे । नैसर्गिक पथे निर्वाहणे ।
नातरी विनाश अभिमाने । भासरुप जीवाचा ॥२१॥
तयाचे तोडावया भासरुप । पाजळावया आत्मप्रदीप ।
वैराग्यादि साधने अमूप । करणे लागे सायासे ॥२२॥
वैराग्य ते कासयासी । करावे होऊनि सायासी? ।
हेचि बोलणे अनायासी । बोलू आता निश्चये ॥३॥
जीव तो अविद्येत बुडाला । षड्विकारे गुंडाळला ।
रजतमाने वेष्टिला । मागेपुढे ॥४॥
तव शिष्य आक्षेपी भला। ईश्वरांश अज्ञानी का ठरला ? ।
हे तो स्वामी ! मला । कृपा करुन सांगावे ॥५॥
तव बोले सद्गुरु वचन । जे का भानूचे उजेडपण ।
ते आरशात प्रतिबिंव जाण । तेजरुन दावीतसे ॥६॥
तैसाचि येथीचा प्रकार । मायादर्पणी सुंदर ।
चैतन्यसूर्य निर्विकार । उजेड दावी आपुला ॥७॥
चिदात्मा तो विद्यारुप । धरी जीवाचे स्वरुप ।
अविद्येत प्रतिबिंबी अमूप । म्हणोनिया ॥८॥
चिदात्मा अविद्येत गुंगला । म्हणोनि विकारा पावला ।
तयासी जीव ऐसे बोलिला । श्रृतिवाद । ९ ॥
रजोतमादिक गुणेकरुन । अविद्या चंचलत्व पावे जाण।
म्हणोन जीव द्वैत भान । अंगी बाणवून घेतसे ॥१०॥
सोडिनिया शुध्दात्मभाव । करी अनंतरंगी लाघव ।
म्हणोन अविद्यागुणे जीव । ऐसे नाव ठेविले ॥११॥
तव शिष्य आनंदून । श्रीगुरुसी करी कथन ।
स्वामी ! जीवाचे स्थानमान । कोणे ठायी वदावे ॥१२॥
जीव शुध्दरूपा आला । शुध्द आत्मबिंबी मिळाला ।
म्हणजे जन्ममरणादि गलबला । भोगावा न लागे ॥२३॥
यासी पाहिजे वैराग्य साधन । प्रथम सत्वगुणी जीवन ।
रजतमादि लोपून । शुध्दसत्व मिळावया ॥२४॥
चित्तशुध्दी प्रगटली पूर्ण । मग शोधावे ज्ञान- अज्ञान ।
साक्षीरूप काय ते जाणोन । तयारूपी मिळावे ॥२५॥
आता पुढिलिये निरूपणी । ज्ञान-अज्ञान उभारणी ।
कळवू विशद करूनी । जाणावया साधका ॥२६॥
इतिश्री वेदान्तसार संमत । तुकड्यादास-विरचित ।
आत्मप्रभाव ग्रंथ । चतुर्थोऽध्याय गोड हा ॥२७॥
सद्गुरुनाथ महाराजकी जय !

N/A

References : N/A
Last Updated : August 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP