मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय तिसरा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय तिसरा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय तिसरा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥श्रोती व्हावे सावधान । परिसावया विमल ज्ञान ।गुरु शिष्याचिये वचन । पूर्ण करी सद्-भावे ॥१॥अपूर्णाते पूर्णपण । दावावया सद्गुरु पूर्ण ।तेचि श्रोतेजनी परिसोन । लीन व्हावे आपैसे ॥२॥श्रेष्ठांचेचि ऐकोन वाद । अल्पज्ञ तो होई शुध्द ।जेणे मिटेल द्वतबंध । मायोपाधी पाशाचा ॥३॥मागिलिये प्रकरणी । ऐकोनि दास-विनवणी ।सद्गुरु तो कृपा-पाणी । पाजितसे सद्-भावे ॥४॥तव पाहोनी सद्-भाव पूर्ण । प्रसन्न झाले सद्गुरुचे मन ।म्हणे एकाग्र करी श्रवण । प्रेमे कथीन वाक्यासी ॥५॥जीव अविद्यातम अज्ञानी। चौऱ्यांशी लक्ष फिरता योनी।तया अवचित वेळा नरतनी । प्राप्त झाली पुण्यत्वे ॥६॥पापपुण्य समान असती तई मिळे मनुष्यदेहगती ।तयासी नसता सुसंगती । व्यर्थ जाय आसक्तीने ॥७॥विषयी आसक्तपण आघवे । जडले तयासी स्वभावे।वैराग्येविण केवी सुटावे ? । ऐक भावे करुनिया ॥८॥जयासी अनुताप न बाणला । तो आसक्तीत बुडाला ।पुन:पुन्हा जन्मासी आला । गर्भवास भोगावया ॥९॥विषयी आसक्तपण तुटणे । पाहिजेत वैराग्य लक्षणे ।तयाविण मिथ्या भावे । सत्यचि वाटे ॥१०॥वैराग्यास द्वय साधन । प्रथम चित्तशुध्दी जाण ।दुसरे नित्यानित्यविवेक पूर्ण । साधला पाहिजे ॥११॥चित्तशुद्धीचिया कारणे । उपासना संपादणे ।तेणे तुटती भवबंधने । युगायुगी ॥१२॥उपासना ती ऐसी करावी । प्रथम लीनता हृदयी धरावी ।गुरुवचनी ती ऐसी करावी । निश्चयेसी जाणपा ॥१३॥घेउनिया लहानपण । होई सद्गुरुची वहाण ।ऐकोनिया तयाचे वचन । पूर्णपणे मानावे ॥१४॥सोडुनिया हयगयी आळस । शरीरी राहावे उदास ।तव तुटेल विषयपाश । मायिकांचा ॥१५॥।अंगी वागलिया वाचोन । वैराग्य नवचे कधी जाण ।शब्दज्ञाने व्यर्थ भान । लटकेपणी शोभतसे ॥१६॥ईश्वरभजनी धरी प्रेम । कर्मोपासना हा तो नेम ।साधावी भक्ती निष्काम । चित्तशुद्धीसाठी या ॥१७॥हृदयी राखावा सद्-भाव । तेणे प्रसन्न होय सद्गुरराव ।तयाचे बोधावरी अभाव । न करी केधवा जाणपा ॥१८॥ये देही तो प्रपंच करिती । लक्षी ईश्वरचरणी प्रीती ।ऐसी चित्तशुद्धीची रीती । निश्चयेसी जाणपा ॥१९॥सत्संगतीचिये वाचोन । विवेकबुद्धी नवचे जाण ।नित्यानित्य करावया प्रमाण । सत्संगती धरावी ॥२०॥सत् म्हणजे नित्य जाण । संगती तो अनुसरण ।अज्ञानी सत् भरवीन । असत्य लोपवावे ॥२१॥वारंवार पाहोनी विवेक । नित्याचे मानावे कौतुक ।अनित्यी अभाव सत्यक । सर्वठायी ठेवावा ॥२२॥ऐसी ही सत्यसंगती । विवेक प्रगटेल चित्ती ।नाशिवंत वाटेल देहस्थिती । निश्चयेसी जाणपा ॥२३॥तुच्छ वाटेल देहाभिमान । अंगी बाणेल लीनता पूर्ण ।अंतरी प्रगटेल ज्ञान । नित्यानित्य वस्तूचे ॥२४॥तुच्छ दिसेल धनदारा । सर्वचि मायिक पसारा ।मन ते फिरोनि माघारा । सत्यतत्वी धावेल ॥२५॥अंगी प्रेमाचा पाझर । भक्ति-आनंद परिकर ।तुच्छ वाटेल दृश्यभार । विवेक येता अंगी या ॥२६॥बापा! स्वये वागलियावाचोन । कैसे विरेल कपटथान?।न बाणेल शुद्धज्ञान । अनुभवा पावावयासी ॥२७॥ऐसा बाणता विवेक । चित्तशुध्दी होय निःशंक ।वैराग्यभाव अमोलिक । वाणे शरीरी प्राणिया ॥२८॥विषयाची मुरेल मुरडी । कामना जळेल काळतोंडी ।राहील नित्याची आवडी । सशंय न धरी यामाजी ॥२९॥बाणता वैराग्य अंतरी । तव होय बंद वृत्ती विकारी ।स्थिरावेल मन ते निर्धारी । निश्चयेसी जाणपा ॥३०॥जोवरी स्वये न वागला । तोवरी पाखंडी ठरला ।शुकमुखीचा गलबला । व्यर्थ जाय ॥३१॥ऐकोनिया ऐसे वचन । दास बोले दीनवदन।वैराग्यावरी साधन । काय करावे स्वामिया? ॥३२॥ऐकोनी सद्-भाव-वचन । गुरु बोले प्रेमेकरुन ।ऐक गड्या ! अकर्तेपण । कासयाने होतसे ॥३३॥अवस्था-साक्षी झालियावाचुनी। अकर्ता न होयचि प्राणी ।तोवरी त्या वाटणी । भोगावी लागे अज्ञाने ॥३४॥इतिश्री वेदान्तसारसंमत । दास तुकड्या विरचित ।आत्मप्रभाव ग्रंथ । तृतीयोध्याय निरुपण कथियले ॥३५॥सट्गुरुनाथ महाराज की जय ! N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP