पुरंदरायण - हसूं मज येते
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
हसूं मज येते
देवा हसूं मज येते ॥ध्रृ॥
देवा मनुज या जगती
दुजांची निंदा ते करिती
वरी जपतप आचरिती
काय जपाचे फळ मिळते
हसूं मज येते
देव हसूं मज येते ॥१॥
घर प्रपंच सोडून नारी
बाहेर सारी अनिती करी
करी भजन पूजन नानापरी
स्वत:सी पतिव्रता म्हणविते
हसूं मज येते
देवा हसूं मज येते ॥२॥
काम क्रोध मनी ठेवती
नाना भोगामाजी बुडती
पुरंदर विठ्ठल ते जपती
दांभिक जन किती वर्णू ते
हसूं मज येते
देवा हसूं मज येते ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP