पुरंदरायण - शिवस्तुती
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
सत्य शिव सुंदर आज पाहिला ॥धृ०॥
पंपापूरवासी श्री शिवशंकर
काशिविश्वेश्वर आज पाहिला
भस्मचर्चित गजचर्मधर
मदन अरिहर आज पाहिला
सत्य शिव सुंदर आज पाहिला ॥१॥
त्रिनेत्रधारी तो करुणाकर
सांब सदाशिव आज पाहिला
मृत्युंजय तो महाभयंकर
रुंडमालाधर आज पाहिला
सत्य शिव सुंदर आज पाहिला ॥२॥
कर्पूरगौर, सर्प, भालचंद्र
तो गंगाधर आज पाहिला
पुरंदरविठ्ठल अभयंकर
ऐसा हरिहर आज पाहिला
सत्य शिव सुंदर आज पाहिला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP