मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| आई श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - आई काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड आई Translation - भाषांतर आईच्या मायेचा तराणा चादरीचा ताना बाना ॥ध्रृ॥तो दाता काही काळ प्रकाश देऊनत्या रजनीच्या ओठीत टाकुन गेला तरीही जी स्वयंभू तेजस्वी, प्रेमळ तिने या देहालाच दीप बनवूनउबारा दिला जो पुरेल अनंतकाळ आई नावाचे दीप दिसतात उजेड देताना ॥१॥जो शीतल चांदणें देण्यासाठी आला तो सुधाकर पार ढगाआड गेला तरीही आईने मायेच्या चांदण्यातहातचा पाळणा करुनी झुलवूनचंदन बनून झिजली रात्रंदिनतोच सुगंध दिसतो विश्वात दरवळताना ॥२॥पांढरपेशे नि बागायतदाराची खोटी दानन दिसत होती भोवती तेव्हा आईने रक्ताचे पाणी करुनवृक्ष बनवुनी जिरायत रोपालाकर्तव्याने फुलण्याला मार्ग दाविला तीच मूर्ती आता कार्याची फुले वहाण्या दिसेना ॥३॥एक दिवस चोवीस तास अंधार एक दिवस भुताटकीचा कहर अशा काही रात्री आल्या तरीहीतत्त्वापासुन ढकली नाही थोडी ही गात राहिली ती माझ्यासाठीं अंगाई तेव्हा होतो अनभिन्न आता आतुरली दर्शना ॥४॥सवित्या असाच प्रकाश देईल चंद्रमा चांदण्याने न्हाऊ घालील काळजाचा निवारा अमर राहील समई जळदच रोषणी देईलवृक्ष असाच सावली देत राहीलआईच्या मायेचा अंत भविष्यालाही सापडेना ॥५॥काहीच्या घरी अखंड दिवाळी चालेकुठी ती तीनचार दिसाची पाहुणी कधीतरी एकदा चूल फुलायची तेव्हा तेव्हा आई अर्धपोटी राहुनस्वाभिमानाची दिपवाळी करायची दिपवाळीचा सण कायमचा गेला आई जाताना ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP