TransLiteral Foundation

नृसिंह जयंती - हिरण्यकश्यपूचा वध

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


हिरण्यकश्यपूचा वध
आहे का, या स्तंभी, ऐसे विचारत । शिशु तो बोलत सर्वा ठाय़ी ॥१॥
अणुरेणुमाजी असे तो भरला । रिता ठाव भला नाही कोठे ॥२॥
परम कोपा चढे लत्ता हाणी स्तंभी । आवाज तो नभी थोर होय ॥३॥
कडाडिला स्तंभ प्रगटे पद्मनाभ । कोटी-सूर्यप्रतिभ तेजे जो का ॥४॥
विकराळ सुख कराळ त्या दाढा । करकरां गाढा खात असे ॥५॥
देह तो नराचा वदन सिंहाचे । ऐसे रुप साचे प्रगटले ॥६॥
भयभीत झाले सारे त्रिभुवन । मिटुनि लोचन जग राहे ॥७॥
पृथिवी कांपली बहु आंदोळली । तेजे म्लान झाली तारकांची ॥८॥
सूर्य चंद्र म्लान होवोनि राहिले । भान विसरले सर्व जग ॥९॥
नाद थोर झाला ब्रह्माण्डी भरला । सकळ कांपला भूगोल हा ॥१०॥
घेतनिज अंकी तया दैत्यालागी । नखे रोवी अंगी देव कोपे ॥११॥
संध्यासमयसी दैत्य तो मारीला । भयानक भला अत्युन्मत्त ॥१२॥
देव स्वर्गातूनी पुष्पे वर्षताती । गंधर्व ते गाती मधुर स्वरे ॥१३॥
अप्सरा नाचती किन्नर आलापिती । घेवोनी आरती देवी येती ॥१४॥
सकळही विश्व दर्शना पातले । शरणागत झाले नरहरीला ॥१५॥
सांवरेना कोप, न होय शांत, देव । परम कोपभाव, चढलासे ॥१६॥
प्रल्हादासी मग पुढे करिती देव । त्याविण त्या वाव उरला नाही ॥१७॥
भक्तराज धरी चरण देवाचे । म्हणे काय वाचे बोलावे म्या ॥१८॥
स्तवितां प्रल्हाद शांत झाले देव । परम कृपाभाव त्याचेवरी ॥१९॥
वरमाग, ऐसे तयास म्हणती । पितया सद्गती मागतसे ॥२०॥
विनायक म्हणे ऐसे हे आख्यान । यांत रस गहन भक्तीचाच ॥२१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-01-26T19:10:58.5700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

lienogastric

  • Zool. (pertaining to or leading to the spleen and the stomach) प्लीहा जठर- 
RANDOM WORD

Did you know?

विद्या माहित आहे, पण अविद्या हे काय आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.