नृसिंह जयंती - हिरण्यकश्यपुची उन्मत्तता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


हिरण्यकशिपु , आणि हिरण्याक्ष, । झाले सर्वभक्ष, घोर दैत्य ॥१॥
तपश्चर्याबळे अमित मातले । सर्व आक्रमिले जगत्रय ॥२॥
व्रह्मदेववरे सामर्थ्य तयांसी । त्यांच्या वैभवासी मिती नाही ॥३॥
सलिलांत शिरे जेव्हां हिरण्याक्ष । तेव्हां विरुपाक्ष प्रगटला ॥४॥
क्रोडरुपे आला हरी झुंजवया । युद्ध झाले तयां अपूर्व की ॥५॥
शेवटी वराहाने मारिला राक्षस । तोच धरी द्वेष बंधु त्याचा ॥६॥
विष्णुद्वेषे मत्त गांजित अवनी । धर्म बुडवोनी पायांखाली ॥७॥
भृत्यां आज्ञापित निज तो राक्षस । पीडा, त्रिभुवनास घोररुपे ॥८॥
जेथे जेथे गाई श्रोत्रिय ब्राह्मण । वेदाचे पठण जेथे जेथे ॥९॥
जेथे जेथे वर्णाश्रम धर्म चाले । विष्णुभक्त भले जेथे जाणा ॥१०॥
जाळा तो मुलूख जाळा घरदारे । उठा एकसरे आज्ञापित ॥११॥
विनायक म्हणे ऐसा कहर केला । हाहा:कार झाला जगत्रयी ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP