नृसिंह जयंती - बापाचा कोप

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


भयभीत द्विज सांगती दैत्यासी । आपुल्या पुत्रासी सांभाळावे ॥१॥
पोरे फ़ितविली भक्ति शिकविली । तेणे बहु मांडिली आळी असे ॥२॥
कळेना की आम्हां कैसा हा शिकतो । कैसा हा बोलतो ब्रह्मज्ञान ॥३॥
बाळा लागी मात मति एवढी कुठली । आमुची खुंटली मति जाणा ॥४॥
ऐकतांच दैत्य खवळला फ़ार । म्हणे हा कुमार मृत्यु माझा ॥५॥
मरण तुझे आतां खास जवळि आले । कैसे तुज भरले पिसे ऐसे ॥६॥
कोठ तुझा देव मज कां तो भीतो । सांग कां लपतो, सांग आता ॥७॥
किती तरी त्याचा शोध मी करितो । मुख न दावितो मजलागी ॥८॥
कोठे आहे तुझा देव प्रगटवी । मजला झुंजवी त्याजपाशी म॥९॥
देवासह तुज आज मी वधितो । तुज मी दावितो पराक्रम ॥१०॥
विनायक म्हणे क्रोधाने बोलत । थरथर कांपत तनु त्याची ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP