मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|भगवद्गीतास्तोत्र| अध्याय तेरावा भगवद्गीतास्तोत्र नमन अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा भगवद्गीतास्तोत्र - अध्याय तेरावा तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhanggitamarathisanttukaramअभंगगीतातुक्राराममराठीसंत अध्याय तेरावा Translation - भाषांतर ॥७७३३॥पूर्व प्रसंगीं ऐकिलें । भक्ति साकल्य वर्णिलें ॥तेणें आशंका घेतले । ह्मणोनि प्रश्न हे साहा ॥१॥देहामाजिल लिगाडें । निवारुनीयां नीवाडें ॥उघड शुद्धता सांपडे । ऐसें कांहीं कल्पी तूं ॥२॥अहो तो दाटुगा पार्थिव । दांडाइत त्याची ठेव ॥यास्तव पुसे वासुदेव । वश झाला जाणून ॥३॥तेथें तुकयाचे संगती । कांहीं प्रसाद पंगती ॥लाभे ऐसी केली युक्ती । नका घेऊं कंटाळा ॥४॥॥७७३४॥देव शिरोरत्ना योगिया चिद्रत्ना । ऐकावें जी प्रश्ना दुर्बळाच्या ॥१॥यया देहामाजीं ठाणेदार राजी । बसले ते आजी चाळवीती ॥२॥ऐसे कांहीं भासे तरी बोला कैसें । प्रकृतिविलासे आणि पुरुष ॥३॥क्षेत्र क्षेत्रज्ञातें कळों हें इच्छितें । ज्ञानही ज्ञेयातें तुका ह्मणे ॥४॥॥७७३५॥षड्गुणालंकृत भगवान बोलत । लावी बापा चित्त सांगतों गा ॥१॥शब्दाच्या आशंका अल्पा भेऊं नका । पूतना सविखा जिर्विली म्यां ॥२॥ देह हेंच क्षेत्र ह्मणुनी पवित्र । ह्मणिजे जे तें विचित्र कुंतीपुत्रा ॥३॥यास जो जाणेल क्षेत्रज्ञ होईल । तद्वेत्याचा बोल ऐसा तुर्की ॥४॥॥७७३६॥क्षेत्रज्ञ सर्वाचें जो तो निश्चयाचें । मीच ऐसा वाचें सांगतों गा ॥१॥भारता तूं जाण न धरी अनुमान । दोहींत जें ज्ञान ज्यांचें असे ॥२॥तें ज्ञान माझेंची गोष्टी संमताची । तुका ह्मणे तेंची बोलेलकीं ॥३॥॥७७३७॥तें क्षेत्र जे जैसें ज्यानें कल्पीलसें । विकारी जें जैसें जयास्तव ॥१॥क्षेत्रज्ञ तो जाण प्रकारेंच खूण । संक्षेप लक्षण सांगूं एक ॥२॥तुका ह्मणे हीत सांगे भगवंत । मायीक साद्यंत तोडावया ॥३॥॥७७३८॥ऋषीश्वरी बहुविध स्वानुभवु । वैदीक समूहू वर्णीलेंसे ॥१॥नाना युक्ती त्यांच्या भाषा गीर्वाणीच्या । सिद्धांत गर्भीच्या ठेवण्या ज्या ॥२॥वाक्याचे प्रबंध ब्रह्मसूत्र बोध । करुनी विवीध अपादीलें ॥३॥तुका ह्मणे वाणी प्राकृत शिराणी । झाली हे काहाणी नका ह्मणूं ॥४॥॥७७३९॥महाभूतें पांच अहंकार साच । जाणपां ऐसाच बुद्धि भेद ॥१॥अव्यक्त आठवें हें तर्केची घ्यावें । इंद्रिय मेळावें विपंचक ॥२॥मन त्या अगळें शब्द स्पर्श कळे । पंचक प्रबळें विषयीक ॥३॥तुका ह्मणे ऐसें चोवीस या मीसें । मीच जीव भासें वाचाद्वारें ॥४॥॥७७४०॥द्विद्वाश ऐसी मिळणी संघातासी । क्षेत्र इच्छा तैसी सुखासुखें ॥१॥द्वेषप्रतीती हे वृत्तीची सत्यहे । धारणा जाण हे तद्विकारु ॥२॥तुका ह्मणे ऐसें खटलें सांचलेंसें । तेथें चाले कैसें शाहाणीव ॥३॥॥७७४१॥श्लाघेचा आधार दंभही साचार । त्याग शांतिसार अवक्रता ॥१॥भक्ति श्रीगुरुची स्वामीण गुणाची । कीं ज्ञानमार्गीची दिवटी जे ॥२॥शौच स्थिरत्व गा चित्त निग्रहो गा । आणी वीतरागा विषयांच्या ॥३॥वैराग्य असावें निरहंकारभावें । तरी सुख भोगावें तुकयाचें ॥४॥॥७७४२॥जन्म हा ओखटा अद्वैतीं वसोटा । झाला वारा वाटा उधळी जो ॥१॥मळमुत्रीं शीणला योनिद्वारें आला । पुढें गंधीयाला योनीची गा ॥२॥लांचावला हाटी सोडीना पिनकुटी । मागें पुढें दाटी तीची करी ॥३॥ऐसें जन्म जाणें तेणें न्यायें मरणें । जरा रोग घेणें नित्य दु:ख ॥४॥हा दोष पाहातो तो हा ज्ञानी होतो । मुक्त लीलें जातो तुक्या ऐसा ॥५॥॥७७४३॥आसक्त झालीया लिंपे न कुरुराया । पुत्र किंवा जाया पडे दृष्टी ॥१॥चांगले सदन सामग्री साधन । इष्टत्वादि करुन अनिष्टादि ॥२॥इष्ट झाल्यावरी फुगा रानधरी । समानची वरी वृत्तिराखे ॥३॥सखया सुमित्रा पार्था क्षत्रपुत्रा । सर्व दया पत्रा वाची तुका ॥४॥॥७७४४॥अद्वैत योगाचें भजन याचें । माझीया रुपाचें लागेवेड ॥१॥भक्तीची सिराणी परी अव्यभिचारिणी । कांता पुण्य़खाणी नाथसेवे ॥२॥एकांताची प्रीती जन पदीं खंती । कांटाळा ज्या चित्तीं राजसभे ॥३॥तुका ह्मणे जीणें धन्य झालें पणें । लोह पालटणें परीसेंनी ॥४॥ ॥७७४५॥अध्यात्मविचारें बोधा जाणें खरें । परी तें प्रखरें नित्यत्व गा ॥१॥जडीं अजड हें निवडी संदेहें । हाचि अर्थ पाहे निज ज्ञानीं ॥२॥पार्था हीं लक्षणें शुद्ध ज्ञानी होणें । आमुचें राहणें तया गर्भी ॥३॥हाची उलटा योग अज्ञान प्रयोग । तुका ह्मणे सोंग वायां जाये ॥४॥॥७७४६॥आतां तूं ह्मणशी ज्ञेयवार्त्ता कैसी । ते तूझ्या कर्णासी लावीतसों ॥॥जया ज्ञानें मोक्ष आतुडे प्रत्यक्ष । न उरे त्या लक्ष चौर्याशींगा ॥२॥अनादी अनंत शुद्धाशुद्धि देत । जेथें मुरे चित्त चांचल्यता ॥३॥नसत नासत उचित संवाद । तुका ह्मणे भेद निमे जेथें ॥४॥॥७७४७॥तें दोर अही या देहाचिया ठायां । पाय नेत्र तया शिरें मुखें ॥१॥सर्वत्र तें श्रोत्रयुक्तचि पवित्र । व्यापूनि सर्वत्र असे तेजें ॥२॥वैष्णवांच्या राया ऐके शब्दा यया । श्रुति संमती या मिळे स्मृती ॥३॥आतां याच बोले होईल रुप केलें । द्वय लोकीं भलें मानी तुका ॥४॥॥७७४८॥इंद्रियें ज्या सत्तें विषयास घेती । किंवा वोळखती खोटें चांग ॥१॥विषय इंद्रियें भासक झालें जें । परी ना विरजे जयामाजी ॥२॥जीविती किंवा रे गुण भोगाठायीं । दीपवत पाही साक्षी सदा ॥३॥जे कां राया ऐसें निर्गुण ह्मणावें । तुक्यानें जाणावें सर्वाधार ॥४॥॥७७४९॥ब्रह्म अंतरंग सर्व भूतांलागीं । वायु नभ अंगीं व्यापकत्वें ॥१॥स्थावर जंगम तेणें न्यायें वागें । शूण्य तरी जागे सर्व काल ॥२॥अतींद्रियपणें आकळे योगींद्रा । दूरी जे कां इंद्रा संनिध तें ॥३॥तेथें तो घेणारा निवडीत तुका । जो कां झाला असका निका मुका ॥४॥॥७७५०॥नसोनी वेगळें भूतमात्राठायीं । वागे हे नवाई असंभाव ॥१॥ऐसा जैं सेवीतो वेगळीचीपणें । त्याचें काय कोणें कीजेलगा ॥२॥गिळीतो उगळी सर्व भूतां तोची । परी नाघे त्याची ओळखण ॥३॥तोची ज्ञेयरुप तुका ह्मणे पाहे । धरी ही मही हें ऐसें बळ ॥४॥ ॥७७५१॥जें कांहीं प्रकाश आत्मा तो तयाचा । काम जे रंग त्याचा पालटेना ॥१॥अंधाराचें कुंडें काळोखें निजबीज । असोनी निस्तेज ज्योतिर्मय ॥२॥ज्ञान ज्ञेय ज्ञान लभ्यतें अर्जुना । सर्व हृद्भुवना सत्ताधार ॥३॥ अधिष्टूनी ऊरे जगत्रयांत जें । न लागे अंत जैं वस्तु तुका ॥४॥॥७७५२॥थोडक्या गोष्टींत तुज आह्मी वदों । पाल्हाळें विवादो ऐसें नसे ॥१॥क्षेत्र सांगूनीयां ज्ञान दर्शवीलें । अज्ञाना वर्णिलें थोडक्यांत ॥२॥ज्ञेय तरी हेंच क्रमानें बोलीलों । भक्तीनें भुललों तुझ्या सख्या ॥३॥मत्स्वरुपा याचे तोची तुक्यासम । जो कां जाणे वर्म याचें वीरा ॥४॥॥७७५३॥प्रकृती आणीक पुरुष पैं द्वय । ज्या भेदीं अद्वय विकारलें ॥१॥अनादीच पार्था यांची क्रीडा दीसे । जेथुनी उमसें भूतलोकु ॥२॥आतां रजसत्वतमादि त्रिगुण । विकार उत्पन्न झाला जी कां ॥३॥तुका जीणें झालें प्रकृती पासूनी । प्रकृती असूनी अक्षयी नसें ॥४॥॥७७५४॥अगळीक दीसे इचे कर्तेपणीं । पुरुषा करणी चिव्र दावी ॥१॥कार्य कीं कारण हेतु प्रकृतीचा । श्रवणें जीवींचा बोधू पाहे ॥२॥सुखा आणि दु:खाच्या भोग्तृत्वीं जो हेतु ॥ तुका ह्मणे होतु पुरुष स्वयें ॥३॥॥७७५५॥भोगी प्रकृतीचे गुणांसि पुरुष । तज्जळीं विशेष बिंबूनियां ॥१॥नानाविध योनी निर्मी तया पार्था । पुरुषास आस्ता भोगी वासु ॥२॥अर्जुना गा तोची दुजा देहीं भोक्ता । पुरुष अनुरक्ता प्रतिबिंबे ॥२॥मार्ग दुर्लभ तो जेथें कां सांपडे । तुकयास वेडें जेणें केलें ॥३॥॥७७५६॥जो द्रष्टा जाणता भर्त्ता परमात्मा ॥ परेश चिदात्मा अव्यय जो ॥१॥अर्जुना गा तोची दुजा देहीं भोक्ता । पुरुष अनुरक्ता प्रतिबिंबे ॥२॥मार्ग दुर्लभ जेथें कां सांपडे । तुकयास वेडें जेणें केलें ॥३॥॥७७५७॥जाणेल कीं जो या पुरुषास कोणी । प्रकृतीसी गुणीं विकाराच्या ॥१॥प्रपंचीं जरी कां वर्तला तो नर । न बाधे शरीर द्वंद्व त्याच्या ॥२॥जान्हवी तटाकीं मेल्या मंगळ जें । ऐशा स्थळीं विरजे आत्मा तुका ॥३॥॥७७५८॥पाहाती जे योगी निर्विशेष आत्मा । ध्यानीं सच्चिदात्मा लक्षूनीयां ॥१॥कोणी कितेक ते सांख्याचे विचारें । विश्वात्मा हा बरें न्याहाळीती ॥२॥योगेंही कर्मेही ब्रह्म ऐसे कीती । आपुलाले मतीं सारीखे गा ॥३॥ तुका ह्मणे पथ ज्यास जो आवडे । तेणें केलें उघडें लोकांतैसें ॥४॥॥७७५९॥आत्मा नेणोनी ही कोणी । ऐकुनि तैसें वाखाणी ॥१॥अन्य उपासिती भावें । मृत्युसिंधुस तरावें ॥२॥ते ही तप्तर श्रवणीं । तुका ह्मणे ज्ञानखाणी ॥३॥॥७७६०॥उपजे जे जे कां प्रतीत । सृष्टीकारण संभूत ॥१॥चराचरी जेव्हां जेव्हां । न सुटे चित्त अव्हा सव्हा ॥२॥क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगें । द्वैत विंध्ये संप्रयोगें ॥३॥जाण भरतर्षभा तें तूं । तुक्या होय पारंगतू ॥४॥॥७७६१॥सर्वाभूतीं जो समान । नसे ऊंच नीचस्थान ॥१॥परमेश्वर आहे तया । लावी मानस अक्षया ॥२॥अनित्यांत हि नित्या । घेतूं प्रतीतीने सत्या ॥३॥तोचि डोळस जो पाहे । तुका व्यापी अंतर्बाह्ये ॥४॥॥७७६२॥असा पाहे पटींत तूं । देउन दृष्टीला एकांतू ॥१॥समईश्वरा सर्वत्र । पाहे अदेखणें नेत्र ॥२॥आत्मघाती न एकतो । देहासह पावन होतो ॥३॥त्यावरि जाय मुक्ती पदां । तुकया नलगे आपदा ॥४॥॥७७६३॥सर्व क्रिया प्रकृतीनें । करिजेताती सुमनें ॥१॥असें पाहे तो सर्वदा । नेघे पातक आपदा ॥२॥पैं गा तेव्हां आत्मयाचें । तो पाहतो अकर्त्याचे ॥३॥अकर्तृत्वीं कैंचा दोष । जैसा तुकाच निर्दोष ॥४॥॥७७६४॥तरंगातें देखे जड । परी बुद्धिचा नीवाड ॥१॥एका चैतन्यसागरीं ॥ बाबुड विकल्प लहरी ॥२॥विस्तारतो त्यापासुन । गंधी व्यापिती सुमन ॥३॥तुका ह्मणे सांडी मावा । ब्रह्म पावतो तेधवां ॥४॥॥७७६५॥अनादित्वें जो कां असे । निर्गुणत्वें तो विलसे ॥१॥चिदात्माच ह्मणती ज्यास । अज पाहतां अविनाश ॥२॥असोनीही सर्व शरीरीं । अकर्त्ताच निर्विकारीं ॥३॥नव्हे लिप्त हें नवल । तुकया प्रेमे देतो डोल ॥४॥॥७७६६॥नभ लिंपेना कौंतेया । वसवूनी छिन्न ठायां ॥१॥सर्व स्थळांत सूक्ष्म जें । स्थळ दोष ना आप जे ॥२॥सर्वा देहांत सर्वत्र तेवि व्याप्य व्यापी सूत्र ॥३॥आत्मा लिप्त तेव्हां होये । तुका पीडे कलिभयें ॥४॥॥७७६७॥एक जैसा प्रकाशिं तो । सर्वही जग भास्कर तो ॥१॥सर्व क्षेत्रां तें क्षेत्रज्ञ । प्रकाशित एक सुज्ञ ॥२॥ऐक भरतवंशोप्तजा । भारती तूं भक्तराजा ॥३॥भक्तराज तुका कैसा । धन लोभ्या जैसा पैसा ॥४॥॥७७६८॥हा क्षेत्रज्ञ क्षेत्र भेद । तुज दर्शवूं प्रसाद ॥१॥ज्ञान दृष्टीनें क्षेत्रही । दाखविलें येथें पाही ॥२॥भूतसंसार जडत्व । जाणें सोडोंत्या मुक्तत्व ॥३॥तुका विनवितो संतां । ऐका मागील संमता ॥४॥॥७७६९॥झालें प्रसंग पैं तेरा । जनार्दन मुख्य गिरा ॥१॥येथें ज्ञान आणि जड । क्षेत्र क्षेत्रज्ञ नीवाड ॥२॥केला पुढें चौदाव्यास । ऐका ठेवूनी मनास ॥३॥वदे संजया कुरुपती । श्रोत्या तुकया संगती ॥४॥शेवटीचें अध्ये साहा । ज्ञानकांड असे पाहा ॥५॥सुटे पाप ताप बोध । पदप्राप्तीचें अमोघ ॥६॥शिष्य शिष्याचा सेवक । प्रार्थी तुकयाचा रंक ॥७॥ N/A References : N/A Last Updated : June 19, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP