मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|भगवद्गीतास्तोत्र| अध्याय बारावा भगवद्गीतास्तोत्र नमन अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा भगवद्गीतास्तोत्र - अध्याय बारावा तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhanggitamarathisanttukaramअभंगगीतातुक्राराममराठीसंत अध्याय बारावा Translation - भाषांतर ॥७७११॥तेणें आशीर्वाद दिला । ना तो कर्णी मंत्र आला ॥१॥विश्वरुप पाथदावी । मज निद्रिता चेववी ॥२॥गेला संशय उडोन । तुका तुष्टला भगवान ॥३॥॥७७१२॥जाणुनि श्रीपतीचें मन । द्वादश प्रसंगीं अर्जुन ॥१॥ जीवीं विचारी कीं हीत । हेच असल्या संतत ॥२॥मग आपण वंचूं नये । देवा दिसे अंतराये ॥३॥तरी विश्वरुपाचिया । प्रशंसी तो वाक्यमया ॥४॥तरी अव्यक्त चांगलें । किंवा कृष्णरुप भलें ॥५॥बरें एकवेळां पुसों । मग तैशा स्थितीं वसो ॥६॥ह्मणोनि बोले हर्षमय । अहो यादववंशराय ॥७॥असे तत्वीं सदा युक्त ॥ भक्त तुज जे भजत ॥८॥कोणी निर्गुण मात्रातें । त्यांत उत्तम कोणते ॥९॥सांगे महाराज भक्तांच्या । प्रीति ठेवा तुकयाच्या ॥१०॥॥७७१३॥बोले भगवान दासा । निज मानसा मद्रूपीं ॥१॥योजुनियां स्वरुपीं मन । हें साधन नित्याचें ॥२॥आत्म भक्तीनें भजती । जयां चित्तीं ते थोर ॥३॥मज संमत पांडवा । तुका बरवा वाटतो ॥४॥॥७७१४॥नात्या बोलवे क्षरेना । उपासना जरी त्याची ॥१॥अव्यक्तीं लागे चित्त । सर्व अलिप्त अचिंत्य ॥२॥जे अढळ शाश्वत । श्रुति संमत जाणवी ॥३॥तुका तेथिचा रहिवासी । गुरुदासीं पावला ॥४॥॥७७१५॥इंद्रियातें आटोपुन । स्वात्मज्ञानीं चोख जो ॥१॥समबुद्धीनें सर्वत्र । नेणें क्षुद्र उत्तम ॥२॥जें हो मातेंच पावती । क्रिया शक्ती सहित ॥३॥तुका जैसा सर्वा भूतीं । रत हिंतीं निर्मळ ॥४॥॥७७१६॥कष्टी होती ते अधिक । ते मी ऐक सांगतों ॥१॥चित्त योजितां अव्यक्तीं । देहासक्ती मुकला ॥२॥देहीं गती ते अव्यक्त । मना अर्पूनी बुजत ॥३॥तुका पावे नाना दु:खें । यास्तव तीखें पावती ॥४॥॥७७१७॥मातें मानुनीयां थोर । सोडी घोर अन्यत्र ॥१॥समर्पिती सर्व कर्मे । विधी वर्मे सूचक ॥२॥तरी अद्वैत योगेंची । बुद्धि त्यांची सोडीना ॥३॥उपासिती ध्याती मातें ॥ तुकया चित्तें समतोल ॥४॥॥७७१८॥मजमधें ऐसें चित्तें । झेंपावते जे झाले ॥१॥भवसागरीं त्यांचा मी । अंतर्यामी तारकू ॥२॥वेळ न लावितां पार्था । ऊर्ध्वपंथा पाठवी ॥३॥तारक होतो तुकयासम । प्राचिन श्रम हारुनी ॥४॥॥७७१९॥मन मद्रूपीं यालागीं । असलागीं असावें ॥१॥मला बुद्धींत तूं घाली । हाताखालीं अक्षर ॥२॥मग तूं मज माजीचरे । चराचरे विरहीतू ॥३॥प्रवेशसी ना संशय । गवसे सोय तुकयाची ॥४॥॥७७२०॥स्थिर करुं चित्त आतां । अभ्यासितां येईना ॥१॥मदंतरी ना प्रवेश । तदुद्देशें सांगतों ॥२॥अभ्यास मत्प्राप्तीचा । सव्यसाची करिइच्छा ॥३॥धनंजया सहजें मग । लागे लाग तुकयाचा ॥४॥॥७७२१॥न करवे अभ्यासही । ऐसी कांहीं अडचण ॥१॥मदर्पण करी कर्मे । हो का वर्मे भलतैसीं ॥२॥ज्ञानी मत्कर्मे करित । प्राक् संचिता जाळित ॥३॥तूं या स्थितिसी पावसी । जे तुक्यासी सुलभ गती ॥४॥॥७७२२॥हेंही नव्हे मन तरी । स्वाधिन करी पुरतें ॥१॥मदाश्रित सख्या हो रे ॥ मग मोहरे गतलाभु ॥२॥त्यागीं फळे सर्व कर्मी । नित्य धर्मी वासना ॥३॥फळ शब्दें सुखस्पृहा । करी तुका आपुला ॥४॥॥७७२३॥अभ्यासाहुनि विश्वात्मा । सच्चिदात्मा ओळखे ॥१॥तैं गा ज्ञान ध्यान त्याला । विशेषाला सृजीतें ॥२॥श्रेयकर्म सुखत्याग । पावे लाग आमुचा ॥३॥तुका ह्मणे जीवन्मुक्त । हरिभक्त चांगले ॥४॥॥७७२४॥सूत्रचाळकू परेशू । जाणे सर्वात्मा विशेषू ॥त्याची लागा नुठी द्वेषु । पैं गा तोची निर्वैर ॥१॥जीवन रंगाच सारिखें । होय तेवीं जो हरीखें ॥करुणा मैत्र तेवीं देखें । भूतभावी दयेला ॥२॥मीपण गेलें या जयाचें । तेथें माझें ऐसे वाचे ॥ना सिवे तो दु:खाचें । खतकधीं उकलीना ॥३॥तुका वंदी सदा ज्याला । क्षमा धरे सत्य त्याला ॥कष्टी देखे जो सुखाला । अनुपम साधु तो ॥४॥॥७७२५॥धालें मन तोचि तृप्त । योग मार्गात चालत ॥सर्वदा ही अखंडित । जना हित निवेदी ॥१॥नायकतां तो क्षोभेना । उपरोधें दुखविना ।स्थिर चित्ताची वासना । दृढवत या नाव ॥२॥मन बुद्धीस कालवी । दोघां बांधून पालवी ॥ जो कां आला आमुचे गांवीं । विडा पाउड वाहाया ॥३॥तुका विनवितो तया । माझा दास ह्मणोनियां ॥प्रियत्यागें त्या सुप्रियां । मी गा प्रेमें आलिंगीं ॥४॥॥७७२६॥बुबुळें भ्रमताच क्षाळी । वातें अंदोळु कमळीं ॥न क्षोभवी भूतावळी । ऐसे ज्याचें वागणें ॥१॥तो ही लोकापासूनियां । त्रास नेघे गुरुराया ॥जीव जेवीं पाळी काया । ऐसा सदा संरक्षी ॥२॥हर्ष क्रोध दोन्ही नाहीं । त्रास नघे तपदेही ॥सुलक्षणु ऐसा मही । वरी माझा आवडता ॥३॥तुका वंदी त्याचें पद । उणें वर्णी ज्या गोविंद ॥जनामाजी त्या आनंद । विजनींही त्याहोनी ॥४॥॥७७२७॥लोक पूजनीं ना गुंते । शुद्ध वासनाच्या हितें ॥शाहणा वागवी लोकांतें । हे दक्षता चोखटू ॥१॥गृह दारा सुत सुता । उदासीनु भाग्य येतां ॥व्यथा न मानी जो चित्ता । भागवतीं कदर्यु ॥२॥करी न काम फळ पावों । ऐसा न धरीच लाहो ॥आरंभास सरी पावो । जान्हवीचा कापडी ॥३॥असा मद्भक्त तो प्रीय । नाहीं या विषयीं संशय ॥तुका निजानंदें गाय । तेथें कान मी देतों ॥४॥॥७७२८॥हर्षद्वेषां विरहीत । वांच्छा शोक न धरीत ॥ टाकी पाउलें शुभांत । अशुभांत त्या तुल्य ॥१॥आणि मद्भक्त मजला । प्रिय ऐशा गुणीं झाला ॥एकुलता एक आवडला । वृद्धबंधें वाळकु ॥२॥कामनास्तव भक्ति बारे । कोटयावधी करणारे ॥तुका निष्काम सखा रे । जन्मोजन्मीं दुर्लभ ॥३॥॥७७२९॥गाई चांग व्याघ्र खोटा । नदी नेणें या बोभाटा ॥शत्रु मित्रा तैसा होटा । तळीं शब्दु नालवे ॥१॥बाल पीडलें पूजिलें । कल्प नेणें तैसें झालें ॥शीत उष्णें उबगलें । स्थळ झाड न सोडी ॥२॥तेंवी सुखदु:खांतरीं । भजे समान श्रीहरी ॥ समयीं धीर परउपकारी ॥ तुका जैसा नि:संग ॥३॥॥७७३०॥मौनी आरवाचीक नेणे । स्तुति निंदा केली कोणें ॥तुष्ट लाभ तोष घेणें । जैसा तैसा संतत ॥१॥निराश्रय भगवंतीं । ज्ञानें केली शुद्ध मती ॥माझी भक्ती आचरती । मार्ग इतरां कळावया ॥२॥तो मत्प्रिय किती वाणूं । लटिकें नव्हे तूझी आणू ॥तुका ह्मणे थोरपणू । देव सांडी आपुलें ॥३॥॥७७३१॥बोलिल्याच परी जे हें । धर्मामृत जाणून हें ॥उपासिती सर्वदा हे । आत्म भक्ती चोखटी ॥१॥श्रद्धाळू माझ्या मार्गी । मीच थोर ऐशा लागीं ॥भक्ती वांटी या विभागी । भक्त जे कां ममप्रिय ॥२॥तेही प्रीत किती सांगूं । आतां आमूचा जिवलगू ॥त्याची कीर्ती वर्णी चांगू । त्यासही मी बोलतों ॥३॥नाहीं तरी गीता शास्त्रें । पुढें जयाचें वक्र ॥अथवा ऐकतील श्रोत्र । कायावाचामनोज्ञें ॥४॥ते मी प्रीतीच्या पडिभरें । मुगुटीं वाईजें आदरें ॥जैसा तुका स्वाधिकारें । तैसा मातें तो प्रीय ॥५॥॥७७३२॥ऐसें बोलिलें अनंतें । सांगे संजय नृपातें ॥तैसा जन्मेजयातें । वैशंपायन बोधितु ॥१॥गीता भीष्मपर्वा आदीं । कीं हे मुक्तिची गवादी ॥किंवा लडिवाळा खांदी । वाहे समर्धी लौकीकी ॥२॥येथें अर्जुनाचा प्रश्न । सगुण निर्गूण उपासन ॥ त्यासी बोलिला भगवान । भक्तियोग निर्मळ ॥३॥आतां त्रयोदश पुढें । देवो वर्णील सदृढें ॥जेथें पार्थ प्रश्न गाढे । जढमूढा तारक ॥४॥तुकया सद्गुरु संसर्गे । द्वादश अध्याय या मार्गे ॥आला समाप्तीस अंगें । ऐकिलाच ऐकावा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 19, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP