मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|अगस्त्यगीता| कामव्रत अगस्त्यगीता मोक्षधर्मनिरुपण मोक्षधर्मनिरुपण पशुपाल आख्यान उत्तमभर्ताप्राप्तिव्रत शुभ्रव्रत धन्यव्रत कांतिव्रत सौभाग्यव्रत अविघ्नव्रत शांतिव्रत कामव्रत आरोग्यव्रत पुत्रप्राप्तिव्रत शौर्यव्रत सार्वभौमव्रत नारदीय पंचरात्र अगस्त्यगीता - कामव्रत अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला. Tags : agastyagitaअगस्त्यगीता कामव्रत Translation - भाषांतर अध्याय अकरावा कामव्रत अगस्त्य म्हणाले -हे राजा ! आता मी तुला कामव्रत सांगतो ते ऐक. हे व्रत केल्याने इच्छित भोग मिळतात. ॥१॥हे व्रत षष्ठी तिथीला करावयाचे असून केवळ फळ भक्षण करावे लागते. ॥२॥पौष शुक्लपक्षाच्या पंचमीला भोजन करून षष्ठीला मात्र फळच घ्यावे. ॥३॥त्यानंतर ब्राम्हणासह रोज शांतपणे भात सेवन करावा. वाटल्यास इतर भात असताना याने एकट्याने फळ खावे. ॥४॥विष्णुला स्कंद समजून त्याची पूजा करावी आणि विधीवत् होम करावा. असे वर्षभर करावे. ॥५॥षडानन, कार्तिकेय, सेनानी, कुमार, स्कंद या त्याच्या नावांनी विष्णुची पूजा करावी. ॥६॥व्रताच्या सांगतेला ब्राम्हणांना अन्नदान करून एकाला स्कंदाची सुवर्णप्रतिमा द्यावी आणि म्हणावे - ॥७॥हे भगवन् कुमार, तुमच्या कृपाप्रसादाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्याव्या. हे ब्राम्हणा, तू याचा स्विकार कर. ॥८॥वस्त्रासह हे स्वर्णदान ब्राम्हणाला देतानाच पूजकाच्या इच्छा या - जन्मीच पूर्ण होणे सुरु होते. ॥९॥पुत्रहीनाला पुत्र,धनहीनाला धन,राज्यभ्रष्टाला राज्यपाप्ती होते यात काहीही संशय नाही. ॥१०॥फार पूर्वी ऋतुपर्ण राजाच्या सेवेत असताना नलाने हे व्रत केले. तसेच अनेक राज्यभ्रष्ट राजांनी हे व्रत केले आणि ते यशस्वी झाले. ॥११-१२॥अगस्त्यगीतेमधील कामव्रत नावाचा अकरावा अध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : March 04, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP