मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|अगस्त्यगीता| शांतिव्रत अगस्त्यगीता मोक्षधर्मनिरुपण मोक्षधर्मनिरुपण पशुपाल आख्यान उत्तमभर्ताप्राप्तिव्रत शुभ्रव्रत धन्यव्रत कांतिव्रत सौभाग्यव्रत अविघ्नव्रत शांतिव्रत कामव्रत आरोग्यव्रत पुत्रप्राप्तिव्रत शौर्यव्रत सार्वभौमव्रत नारदीय पंचरात्र अगस्त्यगीता - शांतिव्रत अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला. Tags : agastyagitaअगस्त्यगीता शांतिव्रत Translation - भाषांतर अध्याय दहावा शांतिव्रत अगस्त्य म्हणाले -हे राजा ~ आता मी तुला शांतिव्रत सांगतो, ज्याचे आचरण केले असता गृहस्थांना मन:शांती मिळते. ॥१॥हे व्रत कार्तिक शुक्ल पंचमीला प्रारंभ करावे. व्रताच्या वर्षभरात उष्ण पदार्थ सेवन करू नयेत. ॥२॥रात्रौ शेषशायी विष्णुची पूजा करावी. विष्णुच्या पायांची अनंत समजून कंबर म्हणजे पद्म, हात म्हणजे महापद्म, मुख म्हणजे शंखपाल, आणि डोक म्हणजे कुटिल समजून अशा प्रकार संपूर्ण विष्णुची पूजा करावी. या नागांची वेगवेगळी पूजा देखील करता येते. मात्र त्यांना विष्णुमय मानावे. ॥३-५॥नागांना मनात ठेवून विष्णुला दुधाने स्नान घालावे आणि दूध आणि तीळ यांचा होम करावा. ॥६॥व्रताच्या शेवटी एक वर्षाने ब्राम्हणांना भोजन द्यावे आणि त्यापैकी एकाला नागाची सुवर्णप्रतिमा द्यावी. ॥७॥हे राजा ! हे व्रत जो भक्तीने करील त्याला मन:शांती मिळेल आणि नागापासून भयमुक्ती मिळेत. ॥८॥अगस्त्यगीतेमधील शांतिव्रत नावाचा दहावा अध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : March 04, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP