आदिप्रकरण - अध्याय चौथा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


निवृत्ति सोपानक दिव्य मुक्ता। ज्ञानेश सर्वेश्वर मूर्तिधर्ता ।
चौघें मुलें देवचरित्र यातें । विलोकितां हर्ष महाजनांतें ॥१॥
यांची असीं परिसतां अतिदिव्य नावें
ते बोलती द्विज सभासद हो वदावें
’नामार्थ बाळक कसे वदती तयांते ॥२॥
मी तो निवृत्त न पडेंचि प्रवृत्तिमार्गी
भोगीं अखंड स्वसुखामृत राजयोगी ।
मी ज्ञानदेव ह्मणिजे सकळागमाचा
वेत्ता असे कथिन मी पुसतां त्रिवाचा ॥३॥
सोपान मी भजन दाउनि केशवाचें
वैकुंठ पावविन भक्तिमतांसि साचें ।
मुक्तायि मुक्ति उघडी जगदीशलीला
दावावया प्रकटली भुवनी कलीला ॥४॥
हें बोलती लघु मुलें आंत थोर गोष्टी
तैं हासती द्विजसभासद मंददृष्टी ।
जे गर्ववंत मदमोहित कर्मवादी
शास्त्रज्ञ जे म्हणविती भरले उपाधी ॥५॥
ज्ञानी जगीं म्हणावेतां तरि ज्ञानदेवा
कांही करामत अम्हांसि करोनि दावा ।
तैं ज्ञानदेव म्हणती करितांचि आज्ञा
दाऊं सकों करुनि साच गुरुप्रतिज्ञा ॥६॥
सारे विचार करिति द्विज विप्रमेळीं
तैं यांसि मात वदति स्वसभांतराळी ।
हा ज्ञाननामक समर्थ हल्या पहावा
याच्यामुखे सरस वेदचि बोलवावा ॥७॥
हा बोलिला तरि हल्या तुज साच मानूं ।
बोले तदां निरखवा मज ज्ञानहेला
देखाल सर्वगत आत्मविलास डोळां ॥८॥
माया अगाध विलसे जगदीश्वराची
तीची अचिंत्य रचना न कळेचि सांची ।
बोलेल तो नवल काय महेश्वरेच्छा
आहे अगाध न कळे मतिमंद तुच्छा ॥९॥
तेव्हां पखाल वरि दाविति थोर ह्यैसा
हा देख बोलविसि याप्रति सांग कैसा ।
ते त्यासि ताडिति बळेंचि असूड तेव्हां
ते वोळ ऊठति तनूवरि ज्ञानदेवा ! ॥१०॥
आत्मा ममांतरित तोचि समस्त देहीं
आहे तदां मजचि होतिल भाव तेही ।
तैं बोलती द्विज यया वदनीं श्रुतीतें
उच्चारवीं प्रकट दाविं महामतीतें ॥११॥
तेव्हां नमी सकळ सद्विजवृंद त्यांतें
हेला धरोनि उतरोनि पखाल हातें ।
बोले मुखें श्रुतिस वाहन तूं यमाचा
तूं नाशितां घडसि विप्रमतीतमाचा ॥१२॥
तैं ’अग्निमीळे’ स्वरयुक्त बोले । हें ऐकतां विस्मित विप्र झाले ।
कांही यजुर्वेदहि साम कांही । ऐसा नये सुस्वर सामकांही ॥१३॥
ते ऐकती सकळ एक मुहूर्त सारे
तैं चोज मानिति हल्या वदला कसा रे ।
"हे मुख्य देव हरि शंकर हा विधाता
लोकोद्धरा प्रकटले कलिमाजि आतां ॥१४॥
हे चित्कळाचि दिसते अमुतें कुमारी
जीच्या प्रभेसि तुळणा न पवे तमारी
आम्ही पहा कुटिल कर्मठ साभिमानें
यां ईश्वरां न गणिलें मदमोहमानें ॥१५॥
बंदी अखंड पडिलोंचि असों विधीच्या
कैसे निघूं अमित मोहमहानिधीच्या ।
आह्मांसि भेदमति हे जडली उदंड
यां सज्जनांसि रचिला बहुसाल दंड ॥१६॥
आह्मीं जनांसि कथितों न करुंच कदांही ।
कामधि हुंबरतसों पशुतुल्य माजें
आहों प्रतिष्ठित जगात म्हणोनि माजे ॥१७॥
धिक्कार ते करिति आपण आपणातें
ऐसे महाजन जये अभिमान यांते ।
हे लीन पूर्ण निधिसे भरले सदांही
उर्मी विकारवश हे नव्हती कदांही ॥१८॥
यांच्या स्थितीस निरखोनि समस्त वेत्ते
टाकोनि गर्व नमिती बहुसाल यातें
वाचे जयोक्ति वदताति पिटोनि टाळ्या
तैं नागरी करिति आरतिया निराळ्या ॥१९॥
यांचा अमानुष पराक्रम लोक सारे
पाहोनियां म्हणति मानव तो न सारे ।
पुष्पें तदां वरुषती कितिएक माथां
चौवर्णिचे नमिति सादर ज्ञाननाथा ॥२०॥
तैं ज्ञानदेव म्हणती द्विजमंडळातें
मी पात्र आजि घडलो तुमच्या कृपेतें ।
हे साच सर्व महिमा तुमच्या कृपेची
नोंहे मदीय पुरुषार्थ वदों त्रिवाची ॥२१॥
तुम्ही द्विजेंद्र समुदे हरि रुप आहां
वेदांसि आश्रय तुम्ही धरिता स्वदेहा
तुम्हांसि वंदुनि निरीक्षुनि मोक्षपंथा
हे लागती सकळ जीव यथार्थ वार्ता ॥२२॥
तीर्थासि आस्पद यथार्थ असां समस्तां
गंगादि वंदिति नदी पदरेणु माथां
तैं दोष काय उरती अमुचेचि देवा
झालों पुनीत तुटला भवबंधगोवा ॥२३॥
हा धन्य कीं दिवस जी कृतकृत्य झालों
भेटोनि तंतचरणांसि बरे निवालों ।
हा ब्रह्मवृंद अवलोकुनि त्याचि वेळां
झालों महत्कलिमलाहुनि मी निराळा ॥२४॥
सोपान तैं विनविती द्विजनायकातें
वानूं सके कवण या वचनें तुम्हांतें ।
दूरोनि तें पळत पातक देखतांना
तीर्थासि पावन पदांबुज हे ठिकाणा ॥२५॥
पादाब्जरेणु कलिकल्मषनाशकारी
देवादि उद्धरति काय पुन्हा शरीरी ? ।
हे पाय आजि निरखूं नयनीं अम्ही ते
जे योगकोटिकृतपुण्यफलासि दाते ॥२६॥
श्रीवासुदेव हृदयावरि नित्य वाहे
त्याची तनूचि तुह्मि भूसुर अन्य नोहे ।
हे वेदशास्त्र वसती तुमच्याच देहीं
यावेगळें अणिक सुस्थळ त्यांसि नाहीं ॥२७॥
होते सुतृप्ति वचनें पितरांसुरांते
स्वाहास्वधा भजति या मुखपंकजातें ।
याकारणें वदुनि निश्चय एक वाणी
लावा अम्हासि विभु धर्मपथीं दयेनी ॥२८॥
उच्छिष्टशेषग्रहणासि का विभागी
सोपान याप्रति वदे प्रभु राजयोगी ।
तैं बोलती सुजन विप्र समस्त यांतें
वर्ता तुम्ही प्रभु कळेल तसें तुम्हातें ॥२९॥
तुह्मी असा त्रिजगतीश्वर हेंचि माने ।
आम्ही नहोंचि कथनाप्रति योग्य कांही
सर्वेंश्वरांसि जगिं शासिल कोण पाही ? ॥३०॥
ऐसेंचि वाक्य कथिलें द्विजनायकांही
हे ईश्वरांश दुसरा न विचार कांही ।
हे वर्ततो जसजसे सकळा जनातें
निश्चिंत संमत असेचि सदां अह्मातें ॥३१॥
ऐकोनि विप्रमुखनिर्गत रम्य वाचा
यांच्या मनासि घडला अतितोष साचा ।
मोठ्या तपें निरखिती गयनी निवृत्ती
तेणें दिल्हें सरस चिन्मय रत्न हातीं ॥३२॥
वेदांतशास्त्र निशिवासर चर्चिती हे
योग्यापरीं करुनि योगचि राहती हे ।
गीतार्थ शोध करिती श्रुतिमस्तकांचा
वेदांतशास्त्रपठणीं अतिहेतु त्यांचा ॥३३॥
भोगावती करुन प्रत्यह मज्जनातें
श्रीकालिका निरखिती अतितुष्ट चित्तें ।
जेथें यती वसति जाउनि त्याजपाशीं
वेदांत मात्र श्रवणी अतिहेतु ज्यांसी ॥३४॥
प्रज्ञा विलोकुनि यतीश्वर ते ययातें
ते धन्यधन्य ह्मणती लघु बाळकांते ।
सच्चित्सुखैकपद एक त्रिरुप झालें
या तीरुपेचि परतत्व जगी उदेलें ॥३५॥
छदें पुराण कथिती हरिकीर्तनातें
त्या पैठणीं वसति संमत सद्विजातें
तैं जाहले परम कौतुक एक ऐका
ऐश्वर्य दाविति जनांसि विचित्र जें कां ॥३६॥
आली श्राद्धतिथी तदां द्विजगृही मंत्रेंचि अव्हानिलें
ज्ञानेशें पितृलोकचे पितर या पृथ्वीतळा आणिले ।
झालें श्राद्धविधान देव पितरीं पावोनियां तृप्तता
आशीर्वाद करोइ जात अपुल्या स्थाना द्विजादेखतां ॥३७॥
तेव्हां ब्राम्हण चोजले सकळही देखोनि लीला असी
तेव्हा धन्य असें ह्मणती अन्या घडे हे कसी ।
आह्मी वेद षडंग सांग पडलो तैशी क्रियाही करों
शास्त्रें सर्व पुराण धर्म सुजनां सांगो मुखें आचरों ॥३८॥
हें सामर्थ्य अम्हांस येइल कसें प्रत्यक्ष हे देव की
यांचे दुर्लभ मर्त्य कृत्य दिसतें देखों नये लौकिकी ।
जेणें वेद पशूमुखें वद्विले पित्रां दिठी दाविलेवं
बाळत्वें असतां स्वपादभजना सर्व जगा लाविलें ॥३९॥
हा एका मुखिचा विरंचि अथवा हा दों भुजांचा हरि
दोंनेत्री त्रिपुरांत हा अवतरे कीं व्यास या भूवरी ।
ऐसा ज्ञानेश्वर पूर्णवस्तु विलसे विज्ञानदाता सतां ॥४०॥
चौवर्णात्मक मंत्रमूर्ति विलसे हें गुह्यदृष्टीं दिसे
हें एकाक्षर तत्व मानुष वपू घेवोनि आलें कसें ।
श्रीमद्विठ्ठल या रुपा धरितसे साधूंसि ऐंसे दिसे
मौनत्याग करोनि बोध जनका देहासि या घेतसे ॥४१॥
तेव्हां समस्त मिळती क्षितिदेव दोषें
पत्रांसि लेख करिति परिपूर्ण हर्षे ।
लोकोद्धरार्थ वसुधेवरि देव आले
दैवें हरीविधिसदाशिव हे उदेले ॥४२॥
यांलागि काय कथिजे तरि काय लोकीं
हे तों नव्हेति विधिकिंकर सद्विवेकी ।
लेहोनि पत्र करिं देत निवृत्तिनाथा
जो कां असे धरणिं तारक या अनाथां ॥४३॥
घेवोनि पत्र सकळां धरणीसुरांते
साष्टांग हे नमिति सादर बद्धचित्तें ।
घेवोनि सव्य द्विजवृंद सुखें निघाले
नेवासियास महिषासह शीघ्र आले ॥४४॥
॥ इति श्रीज्ञानेश्वरविजयग्रंथे प्रतिष्ठाननिवासमहिमाप्रदर्शनं
नाम चतुर्थोध्याय: ॥ श्रीसद्‍गुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP