४२ चे चळवळीचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


चौक १
(चाल - धन्य धन्य शिवाजी महाराज)
रजकुंड पेटले प्रचंड जग्ल व्याळ । देशार्थ मृत्युमुखि कैक सोशिली हाल । पर गार काय दास्यान तुम्हास सवाल गांधिचा सवाल ऎकून । ऎकून तरुण खडबडन । झाला जागृत व्याघ्र वित्र्काळ ॥
जा सोडुनि आमचे हिंदुस्थान । आम्हि करु शत्रूपासून देश रक्षण । नको त्याचि चिंता, तुम्ही करा इथून पलायन । साम्राज्याशाहिने युध्द । हे युध्द नव्हे लोक युध्द, निशाण बंडाचे रोविले छान ॥
चाल- काँग्रेस सभा मुंबईस । गांधिनी दिला संदेश मरु किंवा होऊ स्वतंत्र । करू नष्ट इंग्रजी यंत्र ॥
मनि धरा अहिंसा मंत्र । सांभाळिन मी ते तंत्र ॥
चाल २- तात्काळ पकडिले सर्व पुढारि लोकास । हरताळ, सभा मिरवणूक बंदी सर्रास । खवळला तरुण देशार्थ प्राणास देण्यास । किती मोर्चे नेले सरकारि कचेरी कोर्टास । उखडिले रुळ तोडिल्या तारा निखालस । गोळिबार चिडूनि सरकारने बहुत गावास । जालियन बागे सम कत्तल केली सर्रास हजारो लोक नि:शस्त्र प्राणास । बाँब हल्ले नि:शस्त्र प्रजेवर खास । इतकेचि करुनि थांबले नाहि चिमुरास ।
चाल मोडते- गोर्‍यांनी कितिक बायका केल्या तेथे भ्रष्ट सरकार आहे असे हे खरोखर दुष्ट । भनसाळीव धावले दूर करण्या अरिष्ट । पाहुनि अमानुष छळा हो छ्ळा तरुण खवळला म्हणती हे राज्य करुया नष्ट ॥
रावन गेला सिते पायी यमसदनास । तसा दु:शासन खास मुकला कीचक प्राणास । ओढी द्रौपदी वसनास । तशी दुर्बुध्दी गोर्‍यास । ओढी हिंदभू वसनास अशी अनिती जिथें होणार हो ते राज्यलया जाणार ॥
भगवान धावून गेले भगिनीचे रक्षणास । तसे मनसाळीं चिमुरास । गेले अण्याकडे खास । द्या येऊ द्या तुम्हास । भगिनीची म्हणे त्यास । त्याची चौकशी करण्यास । नेमा पंचायत खास । आता चला चिमुरास । परि दया कशी येणार हो म्हणे विरुध्द आहे सरकार ॥
चाल १ भनसाळी गेले खवळून । प्राणांत केले उषोषण ॥
लावीले धसा प्रकरण । सरकार गेले हादरून ॥
आला समय मोठा दारुण । चिंतेत सर्व हिंदुस्थान ॥
चाल ४- रमाबाई तांबे जाऊन । चिमुरास स्वत: होऊन । भगिनीचे दु:ख दारुण । त्यानी पाहून, जाहिर केले धैर्याने ॥
तो खरा भाऊ ती भगिनी । संकटी जाते धावूनी प्राण ही पणा लावूनि भगिनी रक्षणा । जो करी कवटाळुनी मरण । शरिराचे स्वत: होऊन । तिळतिळ रक्त खाऊन । असें करीत सोडणें प्राण फ़ार हें कठिण । असा गेला जतींद्र होऊन ॥
असष्ट दिवस संपूर्ण भनसाळींचे झाले उषोषण । सरकार शुध्दिवर येऊन । दिले अश्चासन । चौकशी करु संपूर्ण ॥
असा बिजय जाहला पूर्ण । बेअब्रु सरकारची करुन । पार पडले दिव्यातून । ख्यात होऊन गाजले महात्मा म्हाणून ॥
चाल - वणव्यापरी चळवळ भारी जाहली जोरात । लहान थोर आले त्यात स्त्रिया कित्येक तुरुंगात । भीती नाही ह्णद्यांतं हिंदूभूसाठी मरणार । हो स्वातंत्र्य म्हणती घेणार ।
चौक ३
तरुणांनी काँलेज सोडून । एकजूट करून जोरात । युध्द विरोधाची चळवळ जोरात लागली होड एकमेंकात । निपुण जे झाले गनिमी काव्यात ॥
सरकार महायुध्दात । आहे संकटात । याच मोक्यात । करु जर हल्ला आता जोरांत । इंग्रजी यत्रं तोडू झटक्यात । स्वातंत्र्य ज्योत पेटे ह्नद्यांत ॥
चाल १- किती तरुणतरुणी तत्काळ जाहले शत्रूचे काळ । पैशाची पडली रास, उत्साह आला कार्यास । लागला एक मनीं ध्यास शत्रूचा करावा नाश । देशार्थ देह देण्यास । पातले तरुण समयास ॥
चाल २- लाभले पुढारी गुप्त काम करण्यास । अच्युत, अरुणा लोहिया याच कार्यास । जयप्रकाश आला फ़ोडुनिया तुरुंगास । किसनवीर पांडू मास्तस बहादूर खास । नांना पाटील कासेगांवकर वीर निखालस । इंग्रजा हातीं तुरी दिधल्या त्यांनी खास । शिवाजीने जसे फ़सविले औरंगजेबास । स्टँलिनने फ़ोडिले तुरुंग कैक वेळेस । केले चकित सुभाषचंद्राने तसे इंग्रजास, कोणी दाढी काढुनी मुल्ला जाहले खास, कोणी मुंडण करुनी घेती येती वेशास, कोणी साहेब जणु उतरले आता मंबईस, अशा कैक युक्त्या योजिती गनिनी काव्यास, शिपायाच्या पुढुनी जातात फ़सवुनी त्यास स्त्री वेष कुणी येता शोधास, अशी फ़जिती केली सरकारची कैक वेळेस, चिडुनिया गेले सरकार पाहुनी शौर्यास ॥
चाल मोडते - लढा आला असा रंगाला । तरुण सिध्द झाला । स्वार्थत्यागाला । मारुनी लाथ घरदारास । स्त्रियाहे कैक याच युध्दास । स्वातंत्र्य तृष्णा लागली ज्यास ॥
गोळिबार चिडून सरकारन । होऊन बेभान । केला जोरान । चहुकडे हाहा:कार झाला । मुंग्यापरी लोक ठार झाला । काळिमा इंग्रज राज्याला । चाल दांगड- वडुजला झाला गोळीबार । घारगे पुढीयार सर्वाना प्यार । हजारो तरुण गोळा केला । अपुर्व स्फ़ूर्ति लोकाला । मोर्चा सरकारी कचेरिला । झेंडा घेऊनी चालला । शांतपणे मोर्चा पुढे गेला । गांधीचा जयजयकार झाला । काँग्रेसचा जय जयकार केला । रोखिला लोक तोंच सगळा, पोलिसानी दादा ॥
कटाव २- तो‍र्‍यात फ़ौजदार आला । जा परत म्हणे लोकाला । बावळट कशाला इथे आला । चलेजाव म्हणे घारग्याला । ना तरी करीन ठार तुला । बेअकली बेंडगिरी त्याला । काय ठावे देशप्रेम त्याला । द्या कशी येईल साम्राज्याशाही दगडाला ॥
घारग्याचे ऎका उत्तरा । चले जाव तूच फ़ौजदारा, देशाचा वैरी तू खरा । देशाचा वैरी तो गोरा । मालक आम्ही फ़त्तरा । नाहि भीत तुझ्या गोळीबारा । फ़िरणार नाहि माघारा । धैर्याचा मेरु तो खरा । वय अवघे त्याचे आठरा । अहिंसेचे कवच सभोवरा । वरी धरी सूर्यं छत्तरा । धरणी दे खाली आसरा । हिंसेशी देण्या टक्करा । सिध्द तो पुढारी खरा । बांधावे त्याचे मंदीरा । अद्‍भूत प्रसंग सारा । वर्णवे कुणाची गिरा । झेंड्याला करुनी नमस्कारा । केला पुन्हा गांधी जय जयकार । त्यांचा नाद प्रचंड घुमुनि राहिला अंबरा ॥
चाल २- गर्जना ऎकुनी अंकली चिडूनिया गेला, नि:शस्त्र लोकावर त्याने गोळीबार केला, स्वार्थांध होऊन हाहा:कार उडवीला पोटार्थ देशावर त्याने निखार ठेवला, लागत गोळी घारग धरणीला पडला, परि झेंडा त्याचे हातुनीं नाही तो सुटला जगिं अमर म्हाणुनि घारगे वंद्य जाहला, गोळीबार असा इसलामपूरी जाहला, पंड्या वीर गोळीबारांत ठार जाहला कुलाब्याचे कोतवालाचा डंका गाजला, बाबू गेनू नाहीका असा चमकुनी गेला असे कैक बळी आजवरी इंग्रज गोळीला, जालियन बाग ती उभी अशा साक्षीला ॥
चौक ४ था
(चाल दांगड) गांधीना कळले तुरुंगात । गोळीबारात कैक गेले त्यात । खलिता त्यांनी लिहिला व्हाइसरायाला । काँग्रेस नाही जबाबदार याला । अत्याचार ठाव नाही आम्हाला । पुढरी पकडूनी आरंभ केला । चिडविले तुम्हीच लोकाला । गोळीबार त्यांचे वर केला । चिडल्यावर कोण शांततेला । तरुण कवटाळुनी बसेल बोला । सांगा तुम्ही दादा ॥
व्हाँईसराय म्हणे गांधीला । खलिता पाहिला चवताळुनी गेला । तुम्हीच म्हणे जबाबदार याला । चळवळ घ्या मागे म्हणे त्याला । संकटी पाहूनी सरकारला । अडविता तुम्ही खात्री आम्हाला । शत्रुला जाऊन काय मिळाला । ठराव घ्या मागें मग बोला । ना तरी दडपू चळवळीला । अशा ताठ्यात व्हाँइसराय बोलला । त्यावेळी दादा ॥
चाल मोडते- गांधीनी उपोषण केले, एकोणीस दिवस झाले, मृत्युमुखी चालले, परी सरकार आपल्या ताठ्यात, सोडणार नाही म्हणे तोर्‍यात, दया दगडाच्या कशी ह्नद्यात ॥
गांधींनी उपोषण करुनी, एकवीस दिवसानी, विजयी होऊनी, जाहले पूर्ण जगीं विख्यात, झाला आंनद सर्व जगतात, नोकरशाहीच्या धडकी ह्नदयांत ॥
चाल १- उपासाने गांधीचे कथन । जगतास पटले संपूर्ण ॥
नोकरशाही हट्टी म्हणून । सर्वाना कळले छान ॥
चहूकडून आले दडपण । गांधीना द्यावे सोडून ॥
परि मस्त राज्य महान । जनमत तुडवीले त्याने ॥
चाल २- चहूकडून अशी बेअबू सरकारची झाली । गांधी भेट विख्यात मुंबईत झाली । लागले जगाचे डोळे जमली मंडळी । काँग्रेस लीग एकीची परि खांडोळी । देशाची साडेसाती अजूनी नाही संपली । त्यावेळी टीका जगतात बहूत झाली । ऎक्यार्थ सप्रु योजना पुढे हो आली । योजना संघणेसाठी त्यांनी काढीली । त्याकडे गांधींची आज लागली । भुलाभाई आदी समेटार्थ हलू लागली । काँग्रेस ऎक्याची आशा दाटू लागली । आशेचा किरण सुटली पुढारी मंडळी । समेटार्थ सिमल्याला सर्व जमली मंडळी । वेव्हेल योजना विचारार्थ पुढें आली । परी हट्टी जिनांनी त्याची केली खांडोळी । ऎक्यार्थ शर्थ काँग्रेसने केली त्यावेळी परि व्यर्थ गाढवा पुढे गीता वाचली ।
चाल मोडते- तळहाती घेउ जर शीर । स्वातंत्र्य वीर । गाठू धरा धिर । स्वातंत्र्य नाहीं फ़ारसें दूर । विनवी आत्माराम तनय शाहीर । काँग्रेस सेवक असें जांहीर ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP