मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६१ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ६१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ६१ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर संग्रामजिद्बृहत्सेनः शूरः प्रहरणोऽरिजित् । जयः सुभद्रो भद्राया वाम आयुश्च सत्यकः ॥१६॥संग्रामजित बृहत्सेन । शूर अरिजित् आणि प्रहरण । वाम सुभद्र जयवान । आयुष्मान सत्यक पैं ॥१०५॥अष्टमहिषींची संतति । कथिली एकमादि भूपती । रोहिणीचिये जठरशुक्ती । माजी जन्मले ते ऐक ॥६॥दीप्तिमांस्ताम्रतप्ताद्या रोहिण्यास्तनया हरेः ॥दीप्तिमंत ताम्रतप्त । इत्यादि जे रोहिणीसुत । आदिशब्दामाजीच गुप्त । दशकसंकेत मुनि वदला ॥७॥अष्टमहिषींहूनि रोहिणी । म्हणाल नववी हे कोठोनी । शैब्यानामका हेचि म्हणोनी । श्रीधरी व्याख्यानीं भागवतीं ॥८॥प्रसिद्ध वैदर्भी ते रुक्मिणी । जाम्बवती ते ऋक्षयोनि । सात्राजिती भामाभिधानी । चौथी तारनि कालिन्दी ॥९॥मित्रविंदा अवंतिभवा । सत्या नाग्नजिती या द्वय नांवा । वाहे कोसलनृपोद्भवा । जे वैरी केशवा वृष मथितां ॥११०॥केकयदेशसंभवा भद्रा । वासुदेवभागिनेयी सुन्दरा । संतर्दनादि सहोदरा । सादर जाणोनि हर पर्णी ॥११॥मद्ररायाची कुमारी । यंत्र भेदूनि स्वयंवरीं । हरिता झाला कैटभारि । शुभलक्षणा लक्ष्मणा जे ॥१२॥यांमाजी शैब्या कथिली नाहीं । म्हणोनि नववी म्हणतां पाहीं । परिमित संख्येचिया ठायीं । विरोध येतो मूळार्थीं ॥१३॥विष्णुपुराणींचिये व्याख्यानीं । जाम्बवती तेचि रोहिणी । ऋक्षत्वास्तव कामरूपिणी । ऐसा टिप्पणीं लेख असे ॥१४॥तथापि पुत्रगणना पृथक । वदला भागवतीं श्रीशुक । एवं संदिग्ध संशयात्मक । स्पष्ट विवेक उमजेना ॥११५॥विष्णुपुराणींचिये टिप्पणीं । शैब्याचि मित्रविंदा म्हणोनी । वदला तथापि संतानकथनीं । पूर्वापर विरोधोक्ति ॥१६॥कोणी म्हणती रोहिणी पृथक । कृष्णभार्या असती अनेक । संतानवृद्धींचा विवेक । वदला सूचक पराशर ॥१७॥संमतविष्णुपुराणोक्त । अन्यासां चैव भार्याणां समुत्पन्ना निचक्रिणः ।अष्टायुतानि पुत्राणाम सहस्राणां शतंतथा ॥१॥प्रद्युम्नः प्रथमस्तेषां सर्वेषां रुक्मिणीसुतः ।असो ऐसें हरिसंतान । त्यामाजी मुख्य जो प्रद्युम्न । रुक्मिणीचा ज्येष्ठ नंदन । तत्संतान अवधारा ॥१८॥प्रद्युम्नाच्चानिरुद्धोभूद्रुक्मवत्यां महाबलः । पुत्र्यां तु रुक्मिणो राजन्नाम्ना भोजकटे पुरे ॥१७॥प्रद्युम्नाची पूर्वभार्या । आणिली शंबर वधूनियां । त्यानंतरें रुक्मितनया । प्रणिली जाया रुक्मवती ॥१९॥प्रद्युम्नवीर्यें तिचे जठरीं । अनिरुद्ध जन्मला भोजकटनगरीं । महाबळिष्ठ प्रतापी क्षत्री । जेणें अंतुरी उषा केली ॥१२०॥सर्व स्त्रियांचीं संततिनांवें । पौत्रप्रपौत्रादि आघवें । तत्संततिविवाहविभवें । कथितां नागवे ग्रंथ नभीं ॥२१॥यालागीं संकेतसंग्रहें शुक । बोलिला तो ऐका श्लोक । बीजामाजी जैसा रुख । तेंवि विवेक जाणावया ॥२२॥एतेषां पुत्रपौत्राश्च बभूवुः कोटिशो नृप । मातरः कृष्णजातानां सहस्राणि च षोडश ॥१८॥साष्ट सशत षोडशसहस्र । श्रीकृष्णाचें अंतःपुर । त्यांचे पोटीं जन्मले कुमर । तत्पुत्रपौत्र कोटिशः ॥२३॥कृष्णौरसांचिया माता । षोडश सहस्र म्हणाल उक्ता । चकारार्थें साष्ट शता । शुकसंकेता जाणावें ॥२४॥ऐसा नृपातें बादरायणि । संग्रहरूपें वदला वाणि । अकोनि कौरवचूडामणि । बहु थोदेनि समजला ॥१२५॥पुढती सिंहावलोकनें । रुक्मिकन्या वरिली मदनें । तिये कथेच्या श्रवणावधानें । शुककारणें प्रश्न करी ॥२६॥राजोवाच - कथं रुक्म्यरिपुत्राय प्रादाद्दुहितरं युधि । कृष्णेन परिभूतोऽसौ हंतु रंध्रं प्रतीक्षते ॥१९॥एतदाख्याहि मे विद्वन्द्विषोर्वैवाहिकं मिथः ॥२०॥राजा म्हणे बादरायणि । वक्तायांमाजी चातुर्यखाणी । संशय गमला निरूपणीं । तन्निरमनीं मम प्रश्न ॥२७॥कृष्ण वधावयाकारणें । समय संधि लक्षी मनें । तो केंवि पुढती कन्यादानें । स्नेहवर्धना प्रवरे ॥२८॥पूर्वीं कृष्णें रुक्मिणीहरणीं । विटंबिला भीभत्सवपनीं । पराभविला समराङ्गणीं । तें तो मनीं शल्य स्मरे ॥२९॥भुजंग हाणीतला चरणें । तो न विसरे जिता मरणें । छिद्र लक्षी घ्यावय उसणें । अंतःकरणें हा तैसा ॥१३०॥पुढती कृष्णाचिया सुता । केंवि देता झाला दुहिता । परम विस्मय हा गमला चित्ता । तो मज आताम निरूपिजे ॥३१॥परस्परें द्वेषनिष्ठ । घात करूं इच्छिती स्पष्ट । ऐसे वैरी तेचि प्रकट । केंवि संतुष्ट वैवाहिकें ॥३२॥विद्वान् म्हणिजे ज्ञानवंत । श्रेष्ठ असती ब्रह्माण्डांत । तांमाजी शुक समर्थ । कीं तूं ओगिचूडामणि ॥३३॥योगसिद्धीची ऐश्वर्यखाणी । देदीप्यमान जैसा तरणि । मम प्रश्नाच्या निरूपणीं । समर्थ जाणोनि प्रार्थितसें ॥३४॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP