आहूय कांतां नवसंगमह्रिया विशंकितां कंकणभूषिते करे ।
प्रगृह्य शय्यामधिवेश्य रामया रेभेऽनुलेपार्पणपुण्यलेशया ॥६॥

कृष्णसंगम नव अपूर्व । सशंक सलज्ज धुकधुकी जीव । मुग्धेङ्गितीं नव अवयव लपवी सर्व संकोचें ॥११५॥
धरूनि कंकणमंडित करीं । वोढूनि घेतली शय्येवरी । गंधानुलेपनपुण्यावारीं । भोगी मुरारि सुखशयनीं ॥१६॥
गंधार्पणाचा पुण्यलेश । तेणेंकरूनि जगदधीश । यथास्वइच्छा परमपुरुष । भोगिला रमेश रमणीनें ॥१७॥
तया भोगाची कैसी रीति । वदली शुकाची सद्भारती । तें परिसावें चतुरीं श्रोतीं । पदपदार्थीं व्याख्यान ॥१८॥

साऽनंगतप्तकुचयोरुरसस्तथाऽक्ष्णोर्जिघ्रंत्यनंतचरणेन रुजो मृजंती ।
दोर्भ्यां स्तनांतरगतं परिरभ्य कांतमानंदमूर्तिमजहादतिदीर्घतापम् ॥७॥

मग ते कवळूनि कमळाकांत । बहुतां जन्मीं श्रवतां प्राप्त । नेत्रहृत्कुच अनंगतप्त । निववी सुरतप्रसंगें ॥१९॥
प्रेमें पसरूनि उभयभुज । गाढ आळंगी अधोक्षज । कंदर्पदर्प तेणें नीरुज । शीतळ सहज सर्वांग ॥१२०॥
सच्चिदानंदपदत्रयी । अभेद त्रिपदें एके ठायीं । ते श्रीमूर्ति आनंदमयी । संदर हृदयीं आळंगी ॥२१॥
जैंहूनि जीवदशा प्राप्त । तैंहूनि वियोगविरहें तप्त । आकल्प दीर्घ ताप तो समस्त । त्यागूनि स्वस्थ निवाली ॥२२॥
पादांबुजें अवघ्राण । करितां निवाले दशधा प्राण । कृष्णमूर्तीचें लावण्यपान । करूनि नयन निवाले ॥२३॥
जोंवरी साक्षित्वदशेचा वास । तंववरी संगसुख अशेष । अनुभवी तो सुखसंतोष । लाहूनि गगनास कवळीतसे ॥२४॥
ग्राम्यविषयभोगाअंतीं । यूना आलिंगूनि यूवति । भुक्तसुखाची उपरमवृत्ति । अष्टधा रमती उत्तरांगीं ॥१२५॥
तैसी नोहे भगवद्गति । उभय चैतन्या ऐक्यताप्राप्ति । संभोगसाक्षित्वा निवृत्ति । अमृतावाप्ति कीं ना ते ॥२६॥
तये ठायीं दीर्घ ताप । टाकिती झाली ऐसा जल्प । करणेंचि न लगे अल्पस्वल्प । साक्षित्वलोप पावलिया ॥२७॥
सुरतामाजि कैवल्यसुख । ऐसा ग्रंथीं नाहीं लेख । ऐशी शंका करिती मूर्ख । तरी हा उत्तर श्लोक अवधारा ॥२८॥

तैवं कैवल्यनाथं तं प्राप्य दुष्प्रापमीश्वरम् । अंगरागार्पणेनाहो दुर्भगेदमयाचव्त ॥८॥

प्राकृत पति तो प्राणनाथ । प्रानरक्षणपोषणार्थ । कृष्ण केवळ कैवल्यनाथ । कुब्जा सननथ तद्भोगीं ॥२९॥
ऐसी कैवल्यसुखाची गोडी । विषयसंभोगाचिये मोडी । कुब्जेसि दावूनि क्रीडावडी । पुढती निवडी साक्षित्वें ॥१३०॥
ऐशिया प्रकारें ते रमणी । साक्षात् ईश्वर चक्रपाणि । त्यातें भोगूनि स्वानंदशयनीं । सनाथ होऊनि संस्पदें ॥३१॥
ईश्वरांचा जो ईश्वर । कैवल्यनाथ परमेश्वर । त्याची प्राप्ति दुर्लभतर । सुरवर मुनिवर न लाहती ॥३२॥
अंगरागार्पणसुकृतलेशें । भोगीं लाहूनि मन्मथावेशें । बुद्धि अशिक्षित साधनाभ्यासें । म्हणोनि ऐसें याचितसे ॥३३॥
दुर्भगा म्हणोनि कुब्जेप्रति । वदली मुनींद्रवरभारती । येथिंचा अर्थ व्यवसितमति । सावध श्रोतीं जे विवरावा ॥३४॥
ऊर्जित ऐश्वर्य या नाम भग । दुर्गम कुब्जेचें महाभाग्य । अंगरागार्पणें श्रीरंग । जे भोगी सांग सुखशयनीं ॥१३५॥
अनुलेपार्पणपुण्यलेश । तेणें भोगिला श्रीपरेश । याचि मार्गें आणिकांस । पावावयास दुर्गमता ॥३६॥
मृगयामिसें जागतां रजनीं । व्याधा जोडला शूलपाणि । तेंवि न करितां साधनश्रेणी । गंधार्पणें हरिप्राप्ति ॥३७॥
म्हणोनि दुर्गम कुब्जाभाग्य । कोण्ही पावावया अयोग्य । श्रीधरस्वामीचा व्याख्यानमार्ग । तोही चांग अवधारा ॥३८॥
गोपी अनन्यभावें निरता । प्राकृतभावे न मागती सुरता । कुब्जा भोगूनि कैवल्यनाथा । याची प्राकृतसम रमणा ॥३९॥
अमृत प्राशूनि धणीवरी । पुन्हा म्हणे मज अमर करीं । तैसी कुब्जेची वैखरी । प्राकृतापरी आतुरत्व ॥१४०॥
लेंकुरें रंगती जेंवि बहिरंगा । तेंवि ते लाहूनि अंतरंगा । यांची प्राकृतमन्मथसंगा । म्हणोनि दुर्भगा म्हणिजे ते ॥४१॥
अमोघैश्वर्यसंपन्नहरि । त्यातें याची कवणेपरी । ते हे शुकाची वैखरी । श्रोतीं चतुरीं परिसावी ॥४२॥

आहोष्यतामिह प्रेष्ठ दिनानि कतिचिन्मया । रमस्व नोत्सहे त्यक्तुं संगं तेंऽबुरुहेक्षण ॥९॥

रसाळ साधुत्वीं उत्कर्ष । जैसें बोलिजे पीयूष । तैसा प्रियतम हृषीकेश । पूर्ण परेश परमात्मा ॥४३॥
त्यातें म्हणे भो प्रेष्ठतमा । इतुकें प्रार्थितसे मी तुम्हां । कांहीं दिवस निजसंगमा । देऊनि कामा पुरवावें ॥४४॥
येथें रहावें कांहीं दिवस । मजसीं रमवावें सावकाश । त्यागूं न शकें तम संगास । मम मानस जलजाक्षा ॥१४५॥
एवं याची विषयसंग । न मगे कैवल्य अभंग । परि तो प्रणतकल्याण सांग । करी श्रीरंग नेच्छितां ॥४६॥
रक्षा भाविला पावक । परि तो स्वभावेंचि दाहक । तेंवि कुब्जेसि विषयसुख । याचितां अचूक कैवल्य ॥४७॥
कुब्जा भोगूनि चक्रपाणी । पुढती याची विषयग्लानि । न रमे कैवल्यनिर्वाणीं । दुर्भगा म्हणोनि बोलिली ॥४८॥
तथापि अक्षयप्राप्तीसि उणें । झणीं मानाल तीकारणें । कैवल्यनाथपदव्याख्यानें । व्यासनंदनें सुचविलें ॥४९॥
स्पर्शसान्निध्यें कांचन । कीं काष्ठ पालटी चंदन । कैवल्यनाथ भोगूनि कृष्ण । केंवि निर्वाण न पवे ते ॥१५०॥
असो हा अगाध वस्तुमहिमा । पूर्ण करोनि कुब्जाकामा । तदुचित वस्तु ज्या प्रियतमा । हेमललामा वसनादि ॥५१॥

तस्यै कामवरं दत्वा मानयित्वा च मानदः । सहोद्धवेन सर्वेशः स्वधामागमदर्चितम् ॥१०॥

एवं तये कुब्जेकारणें । अभीष्टवरातें देऊनि कृष्णें । सम्मानूनि वरसम्मानें । मानदें तेणें गौरविली ॥५२॥
उद्धवासहित सर्वेश्वर । पावता जाला स्वमंदिर । महासिद्धि अर्चनपर । स्वर्चित सुंदर तें धाम ॥५३॥
इतुकें कथूनि कुब्जाख्यान । साधकहितार्थ विस्मयापन्न । होऊनि वदला मुनि सर्वज्ञ । कुरुभूषणक्षितिपेंसीं ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP