मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २८ वा| श्लोक १६ ते १८ अध्याय २८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ अध्याय २८ वा - श्लोक १६ ते १८ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते १८ Translation - भाषांतर सत्यं ज्ञानमनंतं यद् ब्रह्मज्योतिः सनातनम् । यद्धि पश्यंति मुनयो गुणापाये समाहिताः ॥१६॥जे कां प्रकृतीहूनि पर । देहात्मकां केंवि गोचर । देहावच्छिन्न विधि हर सुर । त्या अगोचर जें धाम ॥६१॥सत्यस्वरूप सन्मात्र ब्रह्म । ज्यावरी अध्यारोप असद्भ्रम । माया ऐसें जयासि नाम । कैवल्यधाम तद्रहित ॥६२॥नेतिमुखें शोधितां श्रुति । अवशिष्ट अबाधित जे स्थिति । असोनि न फवे करणांप्रति । ते निश्चिती सन्मात्र ॥६३॥माया असत्य बाध्यमान । सत्य सन्मात्र सनातन । ज्ञान म्हणिजे चैतन्यघन । येर अज्ञान जड मूढ ॥६४॥जडा अजडत्वें वर्तवी । मिथ्या सत्यत्वें प्रवर्तवी । स्वसान्निध्यें उठवाठेवी । गोवूनि उगवी तें ज्ञान ॥१६५॥अनंत म्हणिजे अपरिच्छिन्न । दिक्कालादिव्यवस्थाशून्य । अंतवर्जित अनंत पूर्ण । अमृत म्हणोन श्रुति गाति ॥६६॥कालत्रयीं अबाधित । शुद्ध शाश्वत जें संतत । बृहत् म्हणिजे अपरिमित । इत्थंभूत परब्रह्म ॥६७॥मननशील जे कां मुनि । इंद्रियग्रामातें नियमूनी । शमदमसंपन्न एकासनीं । गुणशोधनीं प्रवर्तलें ॥६८॥ज्योति म्हणिजे स्वसंवेद्य । स्वप्रकाश अचल आद्य । अक्षय अच्छेद्य । वंद्य स्वानंद सर्वगत ॥६९॥नेत्रद्वारें विश्वाभास । विश्वाभिमानें चिदावेश । स्फुरोनि वाढला देहाध्यास । तो निःशेष शोधिती ॥१७०॥बाह्य दृश्य भौतिकमेळ । पिंडब्रह्मांड सारिखें स्थूळ । विषयरूप जड केवळ । इंद्रियमेळ जें रुचवी ॥७१॥लक्षचौर्यांशीमाजि जे जीव । एकमेकांचे जे अवयव । अवघ्राणार्थ धरिती हांव । तो आविर्भाव गंधाचा ॥७२॥पृथ्वी संपूर्ण गंधवती । भूतमात्रीं तदाविष्कृति । परस्परें गंधाप्रति । प्राणवृत्ति संघटे ॥७३॥एका ठायीं गंधरूपें । एका वेधी घ्राणस्वरूपें । ऐसी पृथ्वी विविधा कल्पें । विषयप्रतापें उभारी ॥७४॥तैसेचि समस्त देहभास । एकमेकांचे होती रस । रसरसज्ञा एक जलांश । हा दृश्यांश माजवी ॥१७५॥तेज तैसेंच सर्वां देहीं । रूप चक्षु द्विविध पाहीं । होऊनि दृश्याच्या प्रवाहीं । बाह्यविषयां उभारी ॥७६॥सर्वदेहीं सदागति । त्वक्स्पर्शातें आणी व्यक्ति । परस्परें विषयासक्ति । बाह्यप्रवृत्ति प्रकाशी ॥७७॥तसेंचि सर्वांघटीं गगन । परस्परें शब्दश्रवण । होऊनि विषयां साचपण । दावी भवभान नाथिलें ॥७८॥नेत्रीं प्रकाशे विश्वाकार । विश्वाभिमानें आविष्कार । आकारमात्रका ते साचार । प्रथम चरण प्रणवाचा ॥७९॥इतुकें प्रकाशी जागृदवस्था । तिचा निरास करूनि पुरता । फिरूनि इंद्रियां विषयासक्तां । निजएकांतामाजिवडें ॥१८०॥घ्राण उपरतविलें त्रिकूटीं । रसना मुरडूनि लाविली श्रीहरीं । नयन गोवूनियां गोल्हांटीं । औटपीठीं प्रवेशिलें ॥८१॥पुण्यगिरीमाजि वारा । भरतां त्वगिंद्रिया निवारा । भ्रमरगुंफेमाजि थारा । श्रवणपसारा साठवणें ॥८२॥ब्रह्मरंध्रीं ठेवितां मन । झालें स्वतःसिद्ध उन्मन । स्थूळीं मोडतां जागृतिभान । विषयस्मरण मग कोण्हा ॥८३॥ऐसा आकारमात्रशोध । करूनि दृश्या केला बाध । उपरमें करणां लावूनि वेध । प्रवृत्तिरोधे तद्योगें ॥८४॥ब्रह्माग्नीचे तुटती ज्वाळ । तेंवि जे कल्पनाकल्लोळ । तेणें प्राण प्रवाहशील । इंद्रियें सकळ टवटविती ॥१८५॥तेजें कल्पना अशेष । उदानवायु कंथदेश । वसवी अभिमान तैजस । याचा निरास आदरिला ॥८६॥त्रिकूटीं नहटूनि लावितां घ्राण । दार्ढ्यें स्थिरावतां आसन । आधार सोडूनि अपान । स्वाधिष्ठानीं समरसे ॥८७॥आधारशक्तीसि होतां चळ । गुदेंद्रिय सोडी आपुलें स्थळ । शिश्नेंद्रियांसी करूनि मेळ । होय पांगुळ क्षरणत्वा ॥८८॥अस्ता जातां गगनींचा तरणि । असतां दृष्टि न दिसे नयनीं । तेंवि उपरमतां ज्ञानकरणीं । होय वोहटणी कर्मेंद्रिया ॥८९॥श्रीहटीं स्थिरावितां रसना । शिश्नेंद्रिय ये स्वाधिष्ठाना । अपान समरसे समाना । सांडी क्षरणा समत्वें ॥१९०॥चक्षु गोल्हांटीं पवाडे । तैं पादेंद्रियाचें मेट पडे । समानें सहित ऊर्ध्व चढे । प्रवेश निवाडे अनाहतीं ॥९१॥औटपीठाच्या आंगणीं । नेत्रीं उजळे अमोघ तरणि । तैं प्राणापाना होऊनि मिळणी । रिघती उदानीं पादेंद्रियें ॥९२॥त्वगिंद्रिय टाकी पुण्यगिरि । तैं पाणींद्रिय विशुध अंतरीं । प्राणचतुष्टयीं एकसरी । ग्रंथि साजिरी चहूं करणां ॥९३॥येथूनि उदान बहिर्मार्गें । चारी घेऊनि गगनीं रिगे । व्यान आकर्षूनि ने वेगें । तेव्हां मागें स्थूळ पडे ॥९४॥प्रारब्धक्षयाच्या प्रसंगें । लिंगशरीरप्राणादिवर्गें । सहित विवश होऊनि निगे । तैं भंगे मागें स्थूल तनु ॥१९५॥तैं न चुकतां जन्ममरण । उच्चावचा गतिभ्रमण । नाभ्यासितां प्राणिगण । जनन मरण पावती ॥९६॥उदान जेव्हां अभ्यासकर्में । विशुद्ध सांडूनि उपरमे । द्विदळीं व्यानासमागमें । वागिंद्रियें समरसे ॥९७॥भ्रमरगुंफेच्या पोकळी - । माजीं श्रवणेंद्रियांच्या मेळीं । दशविध प्राण करणजाळीं । त्याची मोकळी येकवटें ॥९८॥ सहस्रदळीं मनोन्मनीं । अवघीं सांठवती जाऊनी । तेव्हां पिंड बाह्यज्ञानीं । विमुखपणीं अचेष्ट ॥९९॥मनामाजीं अहंता चित्त । कल्पना साक्षिबुद्धिसहित । ज्यातें म्हणती भेद स्वगत । उरे उर्वरित ते ठायीं ॥२००॥लयविक्षेपभेदां तया । आतुडविती दुःखालया । गुरुभजनें त्यां चुकवूनियां । स्थाना तुरीया टाकावें ॥१॥गुरुभक्तीच्या प्रसादबळें । तुर्येमाजि साधक मिळे । नातरी लयें तमीं मावळे । कां भवीं कोसळे विक्षेपें ॥२॥विक्षेपाचें अधिष्ठान । उपकारमात्रा विपरीतज्ञान । विरूढवी तैजसाभिमान । कल्पूनि स्वप्नअवस्था ॥३॥निसरडा विक्षेप चुकवूनि ऐसा । मकारतमाचा कडवसा । लयात्मक जो सुषुप्तिफांसा । प्राज्ञासरिसा निरसूनी ॥४॥ब्रह्मरंध्री ब्रह्माकार । तुरीयत्वें वृत्तिपदर । अर्धमात्रा ध्वनीचा गजर । प्रत्यगात्मा उर्वरित ॥२०५॥ब्रह्मावबोधें स्थिरावतां । ध्वनि समरसे नभापरता । शुद्धलक्ष्यांशीं ऐक्यता । निरसे वार्ता भेदाची ॥६॥ऐसियापरी समाहित । गुण निजरसें वृत्तिरहित । तेंचि सत्य ज्ञानानंत । पाहती संतत मद्भाम ॥७॥रजोगुणेंर्शीं स्थूळतनु । सत्त्वें लिंगदेह निरसून । लंघूनि तमेशीं कारण ब्रह्मनिर्वाण टाकिती ॥८॥तें या गौळियां वनौकसां । पहावया उपजला धिंवसा । भाग्यें जोडलों यां कुवांसा । तरी कृपेनें आशा पुरवीन ॥९॥साधनें नसती यांचें पदरीं । मी परमात्मा असतां शिरीं । कायसी योगांची अवसरी । तमःपरपारीं न्यावया ॥२१०॥यांचिया अनंत सुकृतगुणें । घरीं परब्रह्म खेळणें । तरी यां मद्धाम दिव्य नयनें । कृपाळुपणें दावीन ॥११॥ऐसें विवरूनि मानसीं । समस्तां बल्लवां हृषीकेशी । नेऊनि बह्मह्रदाशीं । दाखवीं त्यांसी निजधाम ॥१२॥ते तु ब्रह्मह्रदं नीता मग्नाः कृष्णेन चोद्धृताः । ददृशुर्ब्रह्मणो लोक यत्राक्रूरोऽध्यगात् पुरा ॥१७॥येथ ब्रह्मह्रदपदव्याख्यान । द्विविध श्रोतीं कीजे श्रवण । एक ब्रह्म सनातन । अपर गौण यमुनेंत ॥१३॥जें परब्रह्म अचिंत्यानंद । अगाध म्हणोनि बोलिजे ह्रद । तेथ निमग्न बल्लववृं । केला स्वानंदसुखलाभें ॥१४॥दृश्यापासूनि प्रत्यगात्मत्व । त्रिगुणें सहित विशुद्ध सत्व । निरसूनि केवळ सन्मात्रत्व । सुख स्वयमेव त्यां केलें ॥२१५॥कृष्णें कृपेनें अवलोकून । प्राणेंद्रियेंशीं अंतःकरण । कार्यें करणीं उपरमोन । केलें निमग्न परब्रह्मीं ॥१६॥ऐसा कृष्णें बल्लवगण । ब्रह्मह्रदीं केला निमग्न । तेथ साक्षित्वादि भेदभान । गेले हारपोन दृश्येंशीं ॥१७॥तेथ स्वानंदाच्या समरस डोहीं । भोक्तृप्रत्यया ठाव नाहीं । मां विशेष विज्ञान कैंचें कायी । कोणे ठायीं नाथिलें ॥१८॥एवं होतां ब्रह्माकार । शुद्धसत्त्वादि प्रणवांकुर । विरोनि पूर्ण निर्विकार । ब्रह्म साचार एकरस ॥१९॥ब्रह्मह्रदीं केले मग्न । त्यांएं केलें हें व्याख्यान । तुशब्दार्थें पुन्हां कृष्ण । करी व्युत्थान तेथुनी ॥२२०॥सद्गुरु जैसा शक्तिपात । करूनि पुन्हा तुरीय आंत । आणूनि साक्षित्वा भेटवीत । भेद स्वगत जागवूनी ॥२१॥मग त्या अनुभूत सुखानुभवें । त्रिताप सांडूनि जीव निवे । काय कैसें शब्द न फवे । परी हेलावे आनंद ॥२२॥तैसा ब्रह्मह्रदीं मग्न । कृष्नें केला बल्लवगण । पुन्हा त्याचें उद्धरण । करून स्वभुवन दाविलें ॥२३॥परब्रह्मचि ब्रह्मलोक । नोहे हिरण्यगर्भात्मक । जें काम विशुद्ध वैकुंठाख्य । कृष्ण सम्यक त्यां दावी ॥२४॥स्वगत माया अंतःपाती । केवळ चिन्मत्रैक जे दीप्ति । ते वैकुंठदर्शनावाप्ति । बल्लवांप्रति हरी करी ॥२२५॥पूर्वार्धें हा मुख्यार्थ कथिला । यावरी गौणार्थ वाखाणिला । ध्वनितार्थ जो श्रीशुक वदला । तो परिसिला पाहिजे ॥२६॥बल्लव ब्रह्मीं निमग्न केले । पुढती कृष्णें उद्धरिले । मग ब्रह्मलोकातें दाखविलें । हें अघटित ऐकिलें म्हणाल ॥२७॥तरी पुरा म्हणिजे पूर्वीं सर्व । जेथ मग्न केले बल्लव । तेथ अक्रूर नामा यादव । देखे स्वयमेव ब्रह्मलोक ॥२८॥पुरा यत्र यमुनाप्रांतीं । नेले ब्रह्मह्रदाप्रति । मग्न केले ब्रह्मस्थिति । दाविला पुढती ब्रह्मलोक ॥२९॥चकारें द्वितीयान्वयकृत । यत्राक्रूरोऽधगात् । म्हणिजे अक्रूरेंही त्याचि ह्रदांत । देखिला समस्त ब्रह्मलोक ॥२३०॥ब्रह्मीं निमग्न झालियावरी । लोकदर्शनीं कायसी थोरी । ऐसी आशंका कीजेल चतुरीं । ते यावरी परिसोत ॥३१॥कृष्णानिमित्त अक्रूरासी । स्नेह झळंबतां मानसीं । तेणें तन्मोहपरिहारासी । स्वैश्वर्यासी प्रकटिलें ॥३२॥कृष्णानिमित्त कळवळा कैसा । अध्यायीं एकोनचत्वारिंशा । निरूपिजेल तो परियेसा । येथ अल्पसा कथिजेल ॥३३॥व्रजीं कृष्णाचें अद्भुत कर्म । ऐकोनि कंसासी होती श्रम । अक्रूर प्रेषूनि कृष्ण राम । आणवी स्वधाम दावावया ॥३४॥धनुर्यागाचें करूनि मिष । दोघां वधावें हें रहस्य । न प्रकटूनि व्रजपुरास । अक्रूरास पाठविलें ॥२३५॥तेणें घेऊनि येतेकाळीं । रथीं देखोनि रामवनमाळी । झणें प्रेरूनि मल्ल बळी । बाळें कोवळीं वधी कंस ॥३६॥कृष्ण लावण्याची राशि । कृष्ण प्रियतम त्रैलोक्यासी । मी पापात्मा या बाळासी । काळापाशीं नेतसें ॥३७॥ऐसा मानसीं करूनि तर्क । म्हणे मज होतील घोरनरक । विश्वासघाताचा संपर्क । घडतां पुण्यार्क लोपेल ॥३८॥कृष्णानिमित्त अंतःकरणीं । ऐसा अर्कूर कळवळूनी । ब्रह्मह्रदीं यमुनावनीं । स्नानालागूनि रिघाला ॥३९॥कृष्ण जाणोनि हें अंतरीं । निरसावया मोहलहरी । निमज्जतां जलांतरीं । प्रकटकरी निज महिमा ॥२४०॥हें आख्यान पुढें असे । येथ आशंकापरिहारवशें । कथिलें श्रोतयां मानसें । निमित्त कैसें उमजावया ॥४१॥कृत्य असतां निमित्तभूत । कायसी साधनांची मात । अक्रूर पावला अकस्मात । जें अप्राप्त सुरवर्यां ॥४२॥एवं पुढें अक्रूरासी । कृष्णें प्रकटिलें ऐश्वर्यासी । पूर्वीं तेचि ह्रदीं गोपांसी । स्वलोकांसी दाखविलें ॥४३॥यमुनेमाजीं होऊनि मग्न । नंदें देखिलें वरुणभुवन । गोपांपाशीं करितां कथन । तिहीं श्रीकृष्ण विनविला ॥४४॥त्यांसि प्रत्यय बाणावया । यमुनेमाजीं नेलें तयां । ब्रह्मह्रदीं कौरववर्या । वैकुंठनिलया दावी त्यां ॥२४५॥चिन्मात्र प्रकृतिअंतःपाती । अचिंत्यैश्वर्यें श्रीपती । करूनि स्वलोकां अभिव्यक्ति । गोपांप्रति दाखविलें ॥४६॥जया वैकुंठमाझारी । सर्वां समान स्वानंदलहरी । कल्पतरु दारोदारीं । घरोघरीं महर्द्धि ॥४७॥तापत्रयाची वार्ता नाहीं । विषयप्रलोभ कैंचा कायी । पूर्णकाम सर्वां ठायीं । सर्वां नवायी प्रेमाची ॥४८॥कमलेसमान सर्व नारी । पुरुष कमनीय जैसे हरि । शंखचक्राब्जगदाधारी । पीतांबरीं भूषाढ्य ॥४९॥जेथींचे प्राकाररत्नमणि । तेजें लोपिती कोटि तरणि । जागृत्स्वप्नादि अवस्था तीन्ही । नेणती कोण्ही जे लोकीं ॥२५०॥नवयौवनें सर्वां आंगीं । सर्वदा संपन्न सर्वभोगीं । नुठे कल्पना वाउगी । सर्व हरिरंगीं संतुष्ट ॥५१॥परमामृता सरिता सरे । सच्चिदानंद सर्वां स्फुरे । सामान्यविशेषाच्या पदरें । लाहनें थोरें नातळती ॥५२॥यून युवति सकामुक । कीं स्तन्यालागीं जेंवि बाळक । तैसा प्रेमा नैसर्गिक । निजाधिकारीं सर्वांचा ॥५३॥जैशा घृताचिया कणिका । भिन्न दिसोनि एकात्मका । तेंवि अभेद प्रेमा जेथींच्या लोकां । जगत्पाळकासान्निध्यें ॥५४॥शिवविरिंचिशक्रादि अमर । त्यांसि दर्शन दुर्लभतर । ब्रहत्सामें पक्षी सुस्वर । गाती वनचर हरिप्रेमें ॥२५५॥जेथें मूर्तिमंत श्रुति । सगुण निर्गुण प्रतिपादिती । अगाध जाणोनि अभेदभक्ति । मौनावती सलज्ज ॥५६॥जेथ मुक्ति वाहती पाणी । अपवर्गातें न पुसे कोण्ही । अभेदभक्तीची शिराणी । सर्वांलागूनि हरिप्रेमें ॥५७॥देवभक्तां अभ्यंतरीं । भक्त देवा आंतबाहेरीं । ऐसा प्रेमा परस्परीं । सर्वोपचारीं सर्वत्र ॥५८॥नाहीं उदय अस्तमान । नाहीं करणजनित ज्ञान । नेत्र गात्र प्राण घ्राण । नेणें स्पंदन जे लोकीं ॥५९॥तेथ कैंची कालोत्पत्ति । दिग्विभाग दिवसरती । जेथींच्या सुखा नाहीं च्युति । अच्युतगति ज्या नांव ॥२६०॥ऐसें बल्लवां दिव्यनयनीं । स्वधाम दावी चक्रपाणि । हें अघटित न म्हणिजे कोण्ही । अतर्क्य करणी कृष्णाची ॥६१॥अचिंत्यैश्वर्यसंपन्ना । घडे अघटित संभावना । येरा विरिंच्यादि सामान्यां । असंभावना म्हणों ये ॥६२॥वत्साहरणीं ब्रह्मयातें । अचिंत्यैश्वर्य रमाकांतें । प्रकटिलें तें संभावनेतें । जाणे निरुतें विरंचि ॥६३॥येथ येरांची काय गणना । कोण पुसे प्राकृतां जनां । कृष्णमहिमेची संभावना । वितर्क अनुमाना कवळाव्या ॥६४॥म्हणोनि भगवंतीं सर्व घडे । शुकें कथिलें तें नव्हे कुडें । श्रोतीं न मनूनि वांकुडें । ऐकिजे पुढें हरिचरिता ॥२६५॥पुढें तैसेचि यमुनेआंत । ब्रह्मह्रदीं रमाकांत । अक्रूरा ऐश्वर्य अचिंत्य । बोधी एकांत प्रकटूनी ॥६६॥नंदादि गोप देखोनि ऐसें । निर्भर जाले उत्कट तोषें । कोण कोडें काय कैसें । भेद मानसें विसरले ॥६७॥नंदादयस्तु तं दृष्ट्वा परमानंदनिर्वृताः । कृष्णं च तत्र च्छंदोभिः स्तूयमानं सुविस्मिताः ॥१८॥स्वऐश्वर्यें चक्रपाणि । सालंकृत पार्षदगणीं । विराजमान सिंहासनीं । वैकुंठभुवनीं श्रुति स्तविती ॥६८॥हें देखोनि नंदादिक । विस्मित म्हणती एका एक । आम्ही मानूं निज बाळक । परी हा निष्टंक परमात्मा ॥६९॥कृष्ण ईश्वरा परमेश्वरु । आम्ही मानूं निज लेकरुं । आजि हरला मोहांधकारु । चमत्कार जाणोनि ॥२७०॥ऐसे विस्मित अवघे गोप । म्हणती कृष्ण कैवल्यदीप । तंव कृष्णें ऐश्वर्या करूनि लोप । आणिले पशुप देहभावा ॥७१॥मग ते व्रजपुराभीतरीं । गोप गोपीं परस्परीं । कृष्णैश्वर्याची थोरी । बहुधा वैखरी वर्णीती ॥७२॥कृष्ण केवळ परब्रह्म । कृष्णें दाविलें वैकुंठधाम । कृष्णा स्तविती सुरसत्तम । कृष्ण सप्रेम श्रुति गाती ॥७३॥कृष्ण वरुणलोका गेला । वरुणें श्रीकृष्ण पूजिला । नंद सन्मानें सोडविला । प्रेमें स्तविला गोविंद ॥७४॥इंद्र वर्षतां शिळाधारीं । गोवर्धन धरिला करीं । तळीं वांचविली व्रजपुरी । सप्तरात्री श्रीकृष्णें ॥२७५॥इंद्रादि अमरीं पूजिला कृष्ण । कृष्णें केलें दावाग्निपान । कृष्णें केलें कालियमथन । हें वदला महिमान मुनिवर्य ॥७६॥ऐसे गोपीगोपगण । विस्मयें वर्णिती श्रीकृष्णग्ण । पशुपांसमान नोहे कृष्ण । म्हणती भगवान् प्रत्यक्ष ॥७७॥ऐसा निश्चय बाणल्यावरी । वैष्णवी माया प्रकटीं हरि । मोहें झळंबूनि अंतरीं । पूर्विल्यापरी मानिती ॥७८॥नंदानयन वैकुंठदर्शन । ये अध्यायीं केलें कथन । पुढें रासार्थ गोपीभाषण । अंतर्धान हरि करी ॥७९॥ऐसें भागवत महापुराण । परमहंसाची संहिता पूर्ण । अष्टादशसहस्र विस्तीर्ण । नोहे कथन प्रवृत्तीचें ॥२८०॥ते भागवतींचा दशमस्कंध । कृष्णबाळलीला अगाध । शुकपरीक्षितिसंवाद । अध्याय विशद अठ्ठाविसावा ॥८१॥एकनाथाची चरणधूळी । चिदानंद चर्चितां भाळीं । वर्षला स्वानंदरसकल्लोळीं । ते घेतली नव्हाळी गोविंदें ॥८२॥गोविंदाचें श्रीपादजळ । जगत्पूज्य पावन अमळ । तेणें दयार्णव केवळ । भरला निश्चल निजबोधें ॥८३॥येथ श्रवणें मननें निदिध्यासें । जे सेविती प्रेमोत्कर्षें । साक्षात्कारें त्यां गोपां ऐसें । स्वधाम संतोषें हरि दावी ॥८४॥( श्रीमद्भागवत दशमस्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्ययप्रसिद्ध अष्टविंशति ॥८५॥ )इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां वरुणलोकान्नंदानयनवैकुंठदर्शनं नामाष्टाविंशतितमोऽध्यायः ॥२८॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥१८॥ टीकाओव्या ॥२८४॥ एवंसंख्या ॥३०२॥ ( अठ्ठाविसावा अध्याय मिळून एकूण ओवीसंख्या १४१५६ ) अठ्ठाविसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP