मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नागोशीकृत सीतास्वयंवर| पदे ४०१ ते ४१५ नागोशीकृत सीतास्वयंवर पदे १ ते ५० पदे ५१ ते १०० पदे १०१ ते १५० पदे २५१ ते ३०० पदे ३०१ ते ३५० पदे ३५१ ते ४०० पदे ४०१ ते ४१५ प्रस्तावना. पदे ४०१ ते ४१५ ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली. Tags : nagoshisitasvayamvarनागोशीमराठीसीतास्वयंवर पदे ४०१ ते ४१५ Translation - भाषांतर शोभे फारसि आरसी घडविले नानाप्रकारची सळे ।पायांचे नग आयका दशरथे सीतेसि जे आणिले ॥वाकी पैजण घागर्या घुळघुळा जोडी कडी साजती ।साजे जे हर सुंदरा गुजरिया वाळे पहा वाजती ॥४०१॥रत्ने जोडविली महा अनवटी ते जोडवी साजिरी ।पोळ्हारोहि इरोलिया दिसतसे घोट्यास शोभा बरी ॥नाना वस्त्र जरी विशाळ घडिया साड्या अनेकपिरी ।नाना कंचुकि का अचाट तगटी त्या चादराही जरी ॥४०२॥गृहांतोन पुरोहिते निजहते सीते पहा आणिले ।चौरंगावरि बैसवोन तिजशी पूजेस आरंभिले ॥तो तेथे द्विज फार भांडति अती आधी गणेश स्थिती ।कोणी ते ह्मणती महा कळस जो आधी तयाची गती ॥४०३॥एकामेक अती सरोष नयने गालिप्रदाने किती ।श्वासें उश्वसती परस्पर महा वर्मेही उच्चारिती ॥मूर्खा माजि परस्परा लघुतरा गाधा हिच्या माढवा ।कोठे तूं पढलास सांग मजला शास्त्रार्थ हा तो नवा ॥४०४॥बोले आणिक बोल तेहि न कळे तूं का उगा भुंकसी ।ओनामहि न जाणसी तरि कसा एकाक्षरी बोधसी ॥खाटे हे अवघे कसा वदसि तूं स्थूळास कां पाहसी ।मूर्खा माजि कुजाति तूंच अससी मिथ्या नव्हे मानसी ॥४०५॥मूळाधार गणेश देव वरदा आधार सर्वास हा ।यातें सांडुन थोर पोर कळसा मांडीतसे हा पहा ॥पूर्वी पूज्य गणेश होय कळसा पूजा तदा नंतरे ।राजा तो---------------क्षिति सुरा दे दक्षिणा सत्वरे ॥४०६॥श्रीरामा मधुपर्क आधि जनके पूजा तशी स्थापली ।आतां सावध चित्त लग्नघटिका जोशाप्रती स्थापली ॥आधि स्थापन बोहल्यावरि करी श्रीराम मंत्रोत्तरी ।सीताराम उभी करी द्विज मधे त्या अंत्रपाटा धरी ॥४०७॥आली लग्नघडी तुह्मी हलपला सोडा महा गल्बला ।जोशी मंगल बोलतो निजघडीपाशी असे येकला ॥चित्ती एकच सावधान बसला कैसा पहा निश्चळ ।साधो लग्नघडी तशी बहुबळें कुर्यात्सदा मंगळं ॥४०८॥विघ्ना वारितसे सुखी करितसे विद्या सदा देतसे ।शुंडादंड विशेष चाळवितसे जो दाखवी भावसे ॥शेंदूरानन तुंड ज्यास विलसे मोरेश्वरी जो वसे ।श्रीमन्मंगळ मूर्ति तो बहुबळे कुर्यात् सदा मंगळ ॥४०९॥सृष्टीचा रचिता श्रुती पढियता चारी मुखे बोलता ।ब्रह्मांडा जनिता चराचर विता सत्ता अशी स्थापिता ॥सर्वीही वरता धरी अमरता तो चिंतिजे तत्वता ।सावित्रीसहवर्तमान विधि तो कुर्यात सदा मंगळ ॥४१०॥भक्तालागिं कृपा करी नरहरी जो दान्वा संहरी ।भारी वेश धरी नृपालन करी वेदास जो उध्दरी ॥ज्यासी कोण करी सरी अमर तो भूभार जो आंवरी ।तो लक्ष्मीसहवर्तमान सकळं कुर्यात् सदा मंगळं ॥४११॥कैलासी वसतो विभूति धरितो दुष्टास संहारितो ।भोळा तो असुरासुरास स्फुरतो जे मागती देत तो ॥रामाला स्मरतो सदा रसिक तो चित्तांस तो बैसतो ।तो गौरीसहवर्तमान सकळं कुर्यात् सदा मंगळ ॥४१२॥लक्ष्मी माधव चिंतिजे परिसिजे चित्तैक्य कां होइजे ।वाजंत्री बहुसावधान सुदृढा अंतर्पटा साधिजे ॥देवीला स्मरिजे करा कलश जो आधी करी घेइजे ।आतां सावध सावधान इति ओ कुर्यात्सदा मंगळ ॥४१३॥पृथ्वीदानसमान पुण्य ह्मणती तें आजि होतें पहा ।कन्यादान करी विदेह विभवें दे दक्षिणेते महा ॥आव्याला पुजिलें द्विजासि नमिलें अग्नीस संतोषिले ।नागेशे रचिलें स्वयंवर भलें विद्वज्जनां मानले ॥४१४॥गणेशासि आधी नमस्कार केला ।तया नंतरें प्रार्थिलें शाग्देला ॥करा जोडुनी वंदितो सद्गुरुसी ।कवित्वास विस्तार व्हावा त्वरेसी ॥४१५॥समाप्त N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP