अष्टक

श्री रामानंद स्वामी रचित दीप रत्नाकर.


ज्याच्या कृपेचा बहु लाभ झाला ॥ जन्मांतरींचा गुरुराज आला ॥
श्रीदत्त ऐसा मज बोध केला ॥ विसरूं कसा मी गुरुपादुकांला ॥१॥
अखंड माझ्या हृदयांत आहे ॥ सबाह्य देहीं परिपूर्ण पाहे ॥
टाकूनि मजशीं पाहींच गेला ॥विसरूं०॥२॥
स्वरूप माझें मज दाखवीलें ॥ देहींच माझें मज हीत केलें ॥
ऐसा जयानें उपकार केला ॥विसरूं०॥३॥
संसार - व्याळषं मज डंखियेलें ॥ परमार्थ बोधें विष ऊतरीलें ॥
माझ्यावरी हा उपकार केले ॥विसरूं०॥४॥
शुकादिकांला सुख प्राप्त झालें ॥ तसेंच तूं रे मजलागिं दीलें ॥
मातापिता तूं बंधूही मजला ॥विसरूं०॥५॥
निजात्मरंगें मज रंगवीलें ॥ स्वानंदलेणें मज लेववीलें ॥
बोधोनि ऐसा परिपूर्ण केला ॥विसरूं०॥६॥
सचखात्मडोहीं मज बुडवीलें ॥ घेवोनि हस्तें सचख दाखवीलें ॥
विवेक पुरतां भवताप गेला ॥विसरूं०॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP