राग - भैरवी
चाल : “ कुणी दावा हो हरि ”

हृदयीच्या हरीप्रेम वेलीला ॥
भावनामय बहर आता आला ॥धृ॥
शब्दकळ्यांनीं अती बहरला ॥
चोहिकडे मग सुगंध पसरला ॥१॥
निवडूनी काढीले शब्द पुष्पांला ॥
बनविण्या सुंदर पद्यमाला ॥२॥
अती प्रेमे घेतली गुंफण्या माला ॥
आदरें हरी चरणी अर्पिण्याला ॥३॥
प्रेमभाव दासीचा त्यांत गुंफीला ॥
श्रीकृष्ण चरणी अर्पी पद्य माला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP