राग - खंबावती
( चाल : साधारण अंजनी गीताप्रमाणे )

मंजुळ मंजुळ बोल कन्हैया ॥
अति सुख वाटे बोल ऐकाया ॥धृ॥
गोड सत्य तव मधुर भाषण ॥
पटे जिवाला क्षणोक्षण ॥१॥
हसत मधुर हें तव भाष्य ॥
कानीं पडता अती संतोष ॥२॥
अमृतासम हरी तुझे बोल ॥
जिवन आमुचे करी सफल ॥३॥
बोल बोल प्रभू कृष्ण कन्हैया ॥
अनन्यभावें दासी लागे पायां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP