चाल : साधारण ‘ चल अती आनंद ’

माझ्या जीवाचा आनंद हा ॥
मम जिवाचे सुख हे ॥
पाहता विठ्ठलाचे मुख ॥धृ॥
उत्सुकता मनी घेण्या दर्शन ॥
उचंबळे हृदय प्रेमानें भरून ॥१॥
दिसता मग तें मूर्ती ध्यान ॥
प्रेमानंदे स्थिरावले तेथ नयन ॥२॥
आकर्षीले सर्वस्व हरीने मन ॥
मुळी न उरलें मग कैचे भान ॥३॥
विठ्ठल विठ्ठल शब्द मुखांतून ॥
प्रेमाश्रूने मग भरले ते नयन ॥४॥
सखा माझा पाहिला डोळे भरून ॥
प्रेमादरे दासी करी साष्टांग नमन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP