राग - पाहाडी
चाल : पांडवा सम्राट पदाला

प्राण पोपट उडून जातां । देह पिंजर्‍यांतून ॥
मृण्मय पिंजरा राही । मग इथेच पडून ॥धृ॥
जन सोयरे म्हणती । उचला, त्वरें घरांतून ॥
माया ममता सर्वही विलया । जाई मनांतून ॥१॥
कोण कुणाचे नव्हेरे प्राण्या । घे उमज मनी ॥
रात्रंदिन लावी वळण । मना हरि - चिंतनी ॥२॥
संकटी हरीविण दुजे । तारक नसे जगती कुणी ॥
भक्तीभावें भजा हरीसी । जना सांगे दासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP