अभंग २
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - ललत
चाल : पीया पीया करत पपीयरा
काळ येतसे समीप पहा क्षणोक्षणी ॥
त्वरा करा तनमन लावा हरि कारणी ॥धृ॥
आलो एकटे जाणार एकटे विचार करा मनीं ॥
इथेच राहील सर्व प्रपंच आणा हे ध्यानीं ॥१॥
हरिनाम हेच एक शेवट करी गोड ॥
हरिपूजन भजन लावी मना आवड ॥२॥
हेंच उपयोगी होय शेवट जाणा मनीं ॥
हळू हळू काढा मन आपुले या मोहांतूनी ॥३॥
सतत प्रयत्नें मन हे लावा हरिचिंतनी ॥
दासी म्हणे सुख सर्व आहे श्रीहरिचरणी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP